Monday, 27 September 2021

Market funda

 *🌼 🌼 नवरात्र व मार्केटिंग फंडे 🌼🌼*


सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन अाज एका महत्वाच्या व वादग्रस्त विषयाला स्पर्श करणार आहे. हिंदूच्या सणवारात हल्ली जी विकृती वाढीला लागली आहे त्या अनुषंगाने व पौरोहित्य करताना मातृवर्गाद्वारे ज्या समस्या मांडल्या जात आहेत त्याच कारणाने हा लेखन प्रपंच करावासा वाटतोय.


काल प्रसिध्द हिंदुत्ववादी लेखक तसेच भागवत व रामायणाचे अभ्यासक डॉ.सच्चिदानंद शेवडे व गणकप्रवर सिध्दांति ज्योतिषरत्न डॉ. गौरव देशपांडे या दोन मान्यवरांशी चर्चा करुनच आज हा विषय मांडत आहे.


परवा पासुन चार पाच महिलांनी दुरध्वनीद्वारे माझ्याशी संपर्क केला व एक विचारणा केली की "गुरुजी, नवरात्रात प्रत्येक दिवशी विविध रंगी साड्या नेसाव्यात  आणि देवीची व नवग्रहांची कृपा प्राप्त करुन घ्यावी असे मेसेज सोशल मिडिया द्वारे प्रसारीत होत आहेत. हे सत्य आहे का?"


काही महिलांनी तर नऊ दिवस कोणत्या मँचिंग बांगड्या, कानातले - गऴ्यातले अलंकार हवेत व कोणते दागीने घालावेत व त्यांनी देवीची कशी कृपा होते याचेही मेसेज आपणास आले आहेत असे सांगीतले. धर्मशास्त्रात असे काही दिलय का? असे विचारले.


गरबा व दांडिया खेऴ हाच देवीला आवडतो व तो खेऴलात कि "लक्ष्मी प्राप्त" होईल अशाही चर्चा होताहेत. यात सत्यता आहे का? गुरुजी धर्मशास्त्रात हे दिलय का? असा प्रश्न आज मातृवर्ग विचारतोय.  


मुंबई येथील सौ. सावंत नावाच्या महिलेने सांगीतले कि त्यांच्या ऑफीस मध्ये नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या व त्याला अनुसरुन मँचींग बांगड्या कानातले वगैरे अलंकार घालावेत असं ठरतेय.  "मी गरीब आहे. शिपाई पदावर काम करते. नवरा सतत आजारी असतो. मी एवढा खर्च करु शकत नाही तेव्हा मी काय करु ? देवीचा कोप होईल का माझ्या कुटुंबावर?"  हा प्रश्न ऐकुन मात्र मी हादरलोच व मनाशी ठाम ठरवले की यावर एक लेख द्यावाच.


चार वेद, चार उपवेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे व उपपुराणे, भगवद्गीता, रामायण, महाभारत, दुर्गासप्तशती व दुर्गा उपासनेचे ग्रंथ,  जवऴपास साठ स्मृतिग्रंथ यांत कोठेही नवरात्रात नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या परीधान करा  अस दिलेले नाही. धुतलेले स्वच्छ वस्त्र परीधान करा. सकच्छ म्हणजे नऊवारी साडी असेल तर उत्तम असे दिले आहे. जे तुमच्या जवऴ अलंकार असतील ते घाला. त्यांत मँचींग हवंच अस नाही.


मार्केटिंग कंपन्यांनी विविध कल्पना वापरुन हल्ली प्रत्येक क्षेत्रात पाय पसरण्यास आरंभ केलाय व त्यामुळे सणांचे पावित्र्य जाऊन त्यात बिभत्सपणा आलाय. 


प्रत्येक प्रांताची एक विशेष संस्कृती असते ती जपली गेली पाहिजे. उदा.महाराष्ट्रात "घटस्थापना " ही प्रधान असते . त्याच सोबत अखंड नंदादिप, त्रिकाऴ पूजन, सप्तशती पाठ वाचन, सुवासिनी पूजन, कुमारीका पूजन व भोजन व माऴा बांधणे इत्यादी पध्दतीने नवरात्र होते. ललीता पंचमी, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे), अष्टमीचे होम हवन, सरस्वती आवाहन पूजन असेही धार्मिक विधी महाराष्ट्र व गोवा प्रांतात असतात.

कर्नाटकात दसरा मोठा असतो. 

कच्छ - सौराष्ट्र - गुजराथ प्रांतात देवीची प्रतिमा पूजन करुन रात्री जागरण, गरबा तसेच होम हवन वगैरे पध्दतीने हा उत्सव करतात.

प.बंगाल मध्येही हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो.


इव्हेंट मँनेजमेंट कंपन्या यात बरीच गडबड करतात - सरमिसळ करतात व नवीनच पध्दत निर्माण करतात. ज्याला कोणताही पाया नसतो, शास्त्रीय आधार नसतो व त्यात देवीची उपासना हा सर्वात महत्त्वाचा व मुख्य भागच नसतो.


प्रत्येक प्रांताचे एक वैशिष्ट असते - परंपरा असतात, त्या जपल्याच  पाहिजे. अन्यथा काही वर्षांनी आपली मुले व नातवंडे नवरात्र याचा अर्थ डिजे लावून गरबा दांडिया खेऴणे एवढाच घेतील. मातृशक्तीचा उत्सव हा त्यांना कऴणारच नाही. मी हिंदू आहे म्हणजे माझे आचार, विचार, संस्कृती, माझ्या धार्मिक परंपरा याचा मला  एकदा विसर पडला की गळ्यात क्रॉस घाला किंवा सुंता करा काहीच फरक पडणार नाही. माझे धर्मांतर करणे अगदी सहज सोपे व सुलभ होणार. नेमकी हिच नस या इव्हेंट व मार्केटिंग कंपन्यांनी जाणली आहे. यात काहीहि झाले तरी लाभ परधर्मीयांचाच आहे.


एखाद्या गरीब भगिनीला हे "हाय फाय" नवरात्र जमणार नाही. ती देवी पूजन करणार नाही. म्हणजे हऴुहऴु ती नास्तिक होईल. यांच धर्मांतर करण अगदीच सोपे. 

श्रीमंती, धर्मशिक्षणाचा अभाव व मौजमजा करायला मिळाल्याने तरुण पिढी या "डिजे व गरबा दांडियाला"  नवरात्र समजतील कारण यांनाही नवरात्र म्हणजे देवी उपासना हे माहितीच नाहीय. यांचेही धर्मांतर करणे सोपे जाईल.

थोडक्यात काय तर पराभव हा हिंदूंचाच होईल व याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिंदू समाजच कारणीभूत आहे.


काही वर्षांपूर्वी "डे "संस्कृती भारतात नव्हती. जेव्हा  "गिफ्ट वस्तुंच्या कंपन्या व ग्रिटिंग कार्ड कंपन्या " आपल्या देशात आल्या तेव्हापासून हे "डे "च खूऴ डोक्यात शिरलय. चॉकलेट डे,वेलेंटाईन डे, रोज डे वगैरे. या दिवसांत करोडोंची उलाढाल या कंपन्या करताहेत. आज अशी अवस्था आहे कि मुलांना गणपती, गोकुळाष्टमी कधी आहे हे सांगाव लागते पण हे "डे " मात्र ते पक्के लक्षात ठेवतात.

गोकुळाष्टमी ही राजकीय पुढारी मंडळींच्या कृपेने अशीच "डिजे व मद्यमय "झाली आहे. किमान आईचा उत्सव असा होता कामा नये असे वाटतेय.


चंड मुंड, शुंभ निशुंभ, रक्तबीज वगैरे राक्षसांना मारुन त्यांचा उत्पात शमन करुन जगदंबेने जी  विश्रांती घेतली त्याचा काऴ हा नवरात्र आहे. या युध्दाचा शिण घालवण्याकरता देवीने नृत्य केले असा उल्लेख पुराणात आहे. (आपण युध्द करतच नाही - केवऴ नाचतो) 

या काळात महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या तिन्ही रुपांतील देवीची सेवा करणे. आपल्या परंपरेनुसार नंदादिप, माऴ बांधणे वगैरे आचार करावेत. मुलांकडुन सरस्वतीची उपासना ही विद्या व बुध्दि करता करुन घ्यावी. धनधान्य सुबत्तेकरता महालक्ष्मी उपासना करावी व शत्रू संहार सामर्थ्यप्राप्ती करता महाकालीची उपासना करावी.


मुलींनी दांडिया खेळण्याकडे अधिक लक्ष न देता विद्या मिऴवुन उत्तम मार्गाने धन जोडणे व छेडछाड करणार्या बदमाशांना चार फटके देण्याचे सामर्थ्य अंगी यावे या करता देवीचे माहात्म्य व पराक्रम वाचावेत तसेच ऐकावेत. आज काऴाची ही गरज आहे. हिरॉईनसारखे नाचण्यापेक्षा महाकाली सारखा, झाशीच्या राणीसारखा, कित्तुरच्या चिन्नमा, जिजाबाईं सारखा पराक्रम दाखवण्याची ही वेऴ आहे व आज गरज त्याचीच आहे. नाचणारे खूप झालेत पण पराक्रमी मात्र कमी होताहेत.

या दांडिया व गरब्याच्या काऴात "संतति नियमनाच्या साधनांची" विक्री दुप्पट होतेय व नंतर शालेय व कॉलेज तरुणींचॆ गर्भपात प्रमाणही वाढतेय. या बाबत काही सेवाभावी संस्थानी सर्व्हे करुन अहवाल सादर केलेत.


लव्ह जिहाद याच काऴात फोफावतो आहे. तेव्हा आपल्या मुला मुलींना या धोक्यांची जाणीव करुन देणे हे कर्तव्य आपले आहे.


तेव्हा या मार्केटिंग व इव्हेंट फंड्यांना बऴी न पडता सात्विकपणे आनंदाने आपल्या परिस्थितीनुरुप जगदंबेची सेवा करा व देवीची कृपा प्राप्त करावी हि विनंती.

वरील माहितीत काही चुकीचे असेल तर क्षमस्व!


वेदभूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ले 9404170656


(वरील लेख लेखकाच्या नावागावा सहित अन्य समुहावर देउ शकता याने तात्विक समाधान लाभेल व चौर्यकर्म पातक लागणार नाहि)

##Cp

 *अतिशय गहन अर्थ आहे....!*


*" चिटी  चावल  ले  चली,*

*बीच  में  मिल  गई  दाल।*

*कहे  कबीर  दो  ना  मिले,*

*इक ले , इक डाल॥"* 👌🏻


अर्थात : 


"मुंगी "तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है  देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.


तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'


तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान डाळीने हिरावून घेतलं.


माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधान क्षणात हिरावून घेतात. 


साधं मोबाईलचं उदाहरण घ्या ना! एखादी व्यक्ती बचत करुन कसाबसा आवडीचा मोबाईल घेते, नि आठवडाभरातच त्याचं लेटेस्ट मॉडेल बाजारात येतं आणि त्याने घेतलेल्या मोबाईलचा आनंद, एका आठवड्यातच संपुष्टात येतो. तो मनाशी म्हणतो, 'इतके दिवस थांबलो होतोच, आणखी आठवडाभर थांबलो असतो, तर काय बिघडलं असतं.'


विकल्प माणसाच्या डोक्यात बिघाड निर्माण करतात. हे मर्म लक्षात घेऊन शोषण /शासन व्यवस्था विकल्पांची लयलूट करतात.


ती बघून, 'घेशील किती दोन करांनी'  अशी माणसाची अवस्था होते. त्याचं डोकं काम करेनासं होतं. अशी माणसं शोषण,शासन व्यवस्थांना हाकायला खूप सोपी पडतात. 


पूर्वी आजोबा-पणजोबांच्या काळातल्या वस्तुही, पुढील पिढ्या आनंदाने वापरत. त्यांना त्या जुन्या वाटत नसत. कारण तेव्हा इतके विकल्प नव्हते (आणि ऐपतही नव्हती.)


आज असंख्य विकल्पांनी, वस्तुंचा जुन्या होण्याचा कालावधीच क्षणिक करुन टाकला आहे. परिणामी लोक चांगल्या वस्तुही भंगारात टाकू लागले आहेत.


भौतिक वस्तुंचा हा नियम मानवी नातेसंबंधांनाही लागू झाला आहे, कारण माणूसही भौतिकच आहे. *नातं, मैत्री यांची नाळही, कधी नव्हे इतकी कमजोर झाली आहे.*


देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर *एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावं,* यासाठी आहेत. *नुसतंच घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो.*


म्हणून देवघेव सुरु राहिली पाहिजे. देवघेवीमुळे "समतोल" तर टिकून राहतोच, माणसाचं "समाधान आणि आनंद"ही त्यामुळे टिकावू बनतो. 


*कबीरांच्या या दोह्यात असा मोठा "अर्थ "दडला आहे.*


*चला तर मग आनंदी जगुया....*

*🌷🌷श्री स्वामी समर्थ🌷🌷*

 कृषी उत्पन्न वाढीसाठी मागेल त्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन

           -कृषी मंत्री दादाजी भुसे


            मुंबई, दि. 26:- कृषी उत्पन्न वाढीसाठी तसेच मातीचा पोत सुधारण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या कृषी  क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणावे. मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी विभागामार्फत ठिबक सिंचन यंत्रणा दिली जाईलअसे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

किन्हई येथे श्री. भुसे यांच्या हस्ते पिक स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार महेश शिंदेप्रा. नितीन बानुगडे-पाटीलजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, राहूल बर्गे तसेच शेतकरी उपस्थित होते.

             श्री. भुसे म्हणालेसेंद्रीय शेतीचे प्रमाणिकरणासाठी कृषी विद्यापीठांना सोबत घेऊन कृषी विभागात स्वतंत्र कक्ष कार्यान्वीत करण्यात येईल. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी  खंबीरपणे उभे असून शेतकरी गटमहिला बचत गट यांना कृषी विभागामार्फत आवश्यक मदत केली जाईल. शेतकरी महिलांसाठी कृषी विभागाच्या 30 टक्के योजना आहेत त्याचाही महिला शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
            कोरोना संसर्गामुळे देशासह राज्यात निर्बंध घालण्यात आले होते. या निर्बंधाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था संभाळण्यामध्ये शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या अनेक योजना असून त्यांचा प्रत्येक शेतकऱ्याने लाभ घ्यावा. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जे-जे शक्य आहे ते शासनाकडून केले जाईल, अशी ग्वाही कृषी मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिली.

            आमदार श्री. शिंदे म्हणालेसातारा जिल्ह्यात कृषी विभागाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. शेतकऱ्यांनी शेतीपुरक व्यवसायाकडेही वळले पाहिजे. शेतकऱ्यांनी शेततळे घेऊन त्यात मस्त्य शेती करावी.
            यावेळी श्री.बानुगडे पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

  000


 

 

 *अहंकार आणि*

    *गैरसमज , या दोन गोष्टी*

        *माणसाला त्याचा मिञ*

    *आणि आप्तेष्टापासून दूर*

              *करतात*

    *गैरसमज त्याला सत्य ऐकू*

    *देत नाही आणि अहंकार*

    *त्याला सत्य पाहू देत*

             *नाही !!!*


      🌹 *सुप्रभात*🌹

Daughter's day


 

Daughters day

 


Daughter's day


 

Featured post

Lakshvedhi