Friday, 24 September 2021


 

 एकदा मी चालत घरी येत 

होतो. 

रस्त्यात एका विजेच्या खांबावर एक कागद लावला 

होता. 

जवळ जाऊन बघितलं तर 

त्यावर लिहिलं होतं,"ह्या 

रस्त्यावर काल माझी एक 

पन्नास 

रुपयाची नोट हरवली 

होती.

मला डोळ्यानं नीट्स दिसत नाहीये.

ज्याला कोणाला पन्नास 

रुपयाची नोट मिळाली असेल त्याने ती कृपया खालील 

पत्त्यावर 

आणून द्यावी.”

हे वाचल्यावर का कुणास 

ठाऊक त्या पत्त्यावर 

जाण्याची इच्छा 

झाली.

मी त्या पत्त्यावर गेलो,

घरात कोणी आहे का,

म्हणून विचारल्यावर 

एक म्हातारी काठीचा 

आधार घेत बाहेर 

आली.

घरात ती एकटीच राहत 

होती.

तिला डोळ्यानं नीट दिसत देखील नव्हतं.

मी तिला म्हटलं,"आज्जी,

तुमची हरवलेली ५० 

रुपयाची नोट मला 

मिळाली,

ती मी द्यायला 

आलोय.

घ्या तुमची ही नोट."

हे ऐकून म्हातारी रडू 

लागली.

म्हणाली,"बाळा,अजूनपर्यंत जवळजवळ ५०-६० लोक 

मला ५० रुपयाची नोट देऊन 

गेलेत. 

मी अशिक्षित आहे.

मला नीट दिसत देखील 

नाही.

माझी ही अशी अवस्था बघून मला मदत करण्याच्या 

उद्देशाने कोणी ते लिहिलंय 

मला 

माहित नाही."

खूप आग्रह केल्यावर 

आज्जीने पैसे 

घेतले.

पण मला एक विनंती 

केली 

की,"बाळा,ते मी नाही 

लिहिलंय.

माझी दया आली असेल 

म्हणून कोणीतरी 

लिहिलं 

असेल.

जातांना तू तो कागद फाडून टाक.”

मी हो म्हणून ते टाळलं खरं;

पण माझं अंतर्मन मला सांगू लागलं की हेच ५०-६० 

लोकांना 

पण तिने सांगितलं 

असणार.

अद्याप कोणीच तो कागद फाडला नाही. 

ज्याने कोणी त्या वृद्ध 

महिलेला मदत म्हणून हा 

उपाय शोधून काढला त्या व्यक्तीप्रती 

माझं मन कृतज्ञतेनं 

भरून आलं. 


एखाद्याला मदत करण्याचे 

अनेक मार्ग आहेत;

पण अशा प्रकारची सेवा करण्याची कल्पना 

माझ्या मनाला 

स्पर्शून गेली. 

मी देखील तो कागद न 

फाडता घरी गेलो.

मदत करण्याचे मार्ग 

अनेक आहेत;

फक्त कर्म करण्याची 

तीव्र इच्छा 

हवी.!


(माझ्या वाचनात आलेला सुंदर लेख मनात घर करून गेला.)

Adytmik


 

Inspirational


 

Tourism

 


Amazing sports art

 


Featured post

Lakshvedhi