Saturday, 21 August 2021

 *पुस्तके का वाचली पाहिजेत*


पुस्तकांनी काय शिकवलं ?

तुमच्याकडे दहा रुपये असतील तर आठ रुपये स्वतःच्या खर्चासाठी ठेवा . उरलेल्या दोन रुपयांपैकी एक रुपयाचं गुलाबाचं फुल घ्या आणि एक रुपयांचं पुस्तक घ्या अशी एक म्हण आहे , का जगायचं ते गुलाबाकडे पाहून कळेल आणि कसं जगायचं ते पुस्तक शिकवेल . पुस्तके अत्यंत मोलाची आहेत . त्यात मराठी साहित्य ही तर न संपणारी दौलत आहे. जितकी जास्त लुटाल तितकी ती वाढत जाते . एक *ज्ञानेश्वरी* जरी पुन्हा पुन्हा वाचली तर प्रत्येक ओवीचा अर्थ नव्याने कळतो . आपण मराठी माणसे खरोखर नशीबवान , आपल्याला जसा थोर इतिहास लाभला तशी साहित्याची मोठी परंपराही लाभली.

          मी पुस्तके वाचायला सुरुवात केली तेव्हा काय वाचायचं हे ठरवलं नव्हतं . सार्वजनिक वाचनयालात जे समोर येईल ते वाचत गेलो आणि हळहळू मराठी साहित्याचा मोठा खजिना हाती गवसला . सुरुवात झाली होती *पॅपिलॉन* नावाच्या पुस्तकापासून . हेन्री शॅरीयर नावाच्या एका फ्रेंच गुन्हेगाराने हे पुस्तक लिहिलं ,  हेन्रीला गुन्हेगारी जगतात *पॅपिलॉन* नावाने ओळखत असत . तो फार मोठा गुन्हेगार नव्हता पण त्याच्यावर खुनाचा खोटा आळ आला आणि त्याला फ्रेंच गियानामधील कुप्रसिद्ध जेलमध्ये धाडण्यात आलं. तिथे त्याला कठोर कारावास भोगावा लागला ,  आपल्यावर खोटा आळ टाकणार्‍यांना धडा शिकवायचा , त्यासाठी जेलमधून पळायचं आणि पुन्हा फ्रान्सला जायचं हे त्याने ठरवलं ,  त्याचा प्रवास सोपा नव्हता , तरीही अत्यंत जिद्द , धाडसाच्या बळावर तो पळाला ,  ही सगळी कथा त्याने स्वतः लिहिली आणि *रवींद्र गुर्जर* ह्यांनी ती मराठीत आणली . ह्या पुस्तकाने शिकवलं की जीवनात केव्हाही अडचणी येऊ शकतात आणि त्याला तोंड द्यायला साहस , दुर्दम्य आत्मविश्वास ह्याची गरज असते . संघर्ष हा दर पावलाला येत असतो आणि त्याला तोंड देत जिद्दीने लढायचं असतं .

साहस आणि दुर्दम्य आत्मविश्वासाचा विषय निघतो तेव्हा वीर सावरकरांचं *''माझी जन्मठेप''* पुस्तक विसरता येत नाही. सावरकरांना दोन जन्मठेपीच्या शिक्षा सुनावण्यात आल्या ,  एक जन्मठेप होती २५ वर्षांची. म्हणजे सावरकर ५० वर्षा नंतर जेलमधून बाहेर येणार होते ,  थोडक्यात जिवंत बाहेर येण्याची शक्यता नव्हती ,  तरीही शिक्षा ऐकून ते डगमगले नाहीत ,  त्यांनी ब्रिटिश सरकारला ऐकवले ,  तुम्ही फार काळ भारतात राहू शकणार नाही ,  त्यामुळे माझी शिक्षा लवकर संपेल , इतका दुर्दम्य आत्मविश्वास फक्त तेच दाखवू शकतात. *अंदमानच्या सेल्युलर कारागृहात* गेल्यावर त्यांची कठोर बारीशी गाठ पडली , शारीरिक - मानसिक यातनांना सुरुवात झाली ,  दिलेल्या भांड्यात संडास करावी लागे , स्वतःच्या कोठडीत लघुशंका केल्यावर त्याचा वास घुमत राही , दिवसाचे 16 तास कोलू चालवून शरीर भयंकर थकून जाई , इतकी भयंकर प्रतिकूलता असूनही ते हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याचं स्वप्न पाहत होते ,  जगताना आपल्यावर संकटे येऊ शकतात आणि आपण त्यांवर मात करू शकतो हे शिकायचं असेल तर *'माझी जन्मठेप'* वाचायलाच हवे. क्रांतिकारकांनी जे भोगले त्या तुलनेत आपल्या वाट्याला जर काही प्रतिकूल परिस्थिती आली तर ती काहीच नाही हे जाणवू लागते.

         जगायला शिकवणाऱ्या पुस्तकांची अनेक उदाहरणे आहेत ,  त्यातील मी वाचलेलं अजून  एक आहे *डेझर्टर!* गंथर बाहनमन हा जर्मन सैनिक होता ,  त्याची लिबियामध्ये नेमणूक झाली होती. हिटलरसाठी तो लढत असताना त्याच्या वडिलांना नाझी सैनिकांनी फासावर चढवले , म्हणून त्याने सैन्य सोडण्याचे ठरवले. जर्मनीला जाऊन आईला भेटायचे त्याचे स्वप्न होते पण त्याचा प्रवास सोपा नव्हता ,  सैन्यातून पळाल्यामुळे त्याला ठार केले जाऊ शकत होते , तरीही तो जर्मन आणि त्यांचे दोस्त असलेल्या इटालियन सैन्याला झुकांड्या देत पळत राहिला आणि अखेर शत्रूच्या म्हणजे ब्रिटिशांच्या तावडीत सापडला ,  ब्रिटिशांच्या कैदेत असताना तो इंग्लिश शिकला आणि त्याने हे पुस्तक लिहिले.

*विजय देवधरांनी* अनेक पुस्तकांचा अनुवाद केला. त्यापैकी बरीच पुस्तके साहसावर आधारित आहेत. ही सगळी पुस्तके आपल्याला धाडस करायला उद्युक्त करतात. *रवींद्र गुर्जरांनी* अनुवादित केलेल्या *'सत्तर दिवस'* पुस्तकाचाही आवर्जून उल्लेख करायला हवा. एक विमान दुर्गम पर्वतामध्ये कोसळले आणि त्यात जिवंत राहिलेल्या प्रवाशांनी जगण्यासाठी जी धडपड केली , ती ह्या पुस्तकात दिली आहे. ह्या प्रवाशांनी बर्फाळ प्रदेशात स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी मेलेल्या सहप्रवाशांचे मांस कापून खाल्ले . अखेरीस त्यांचा शोध लागला आणि त्यांची सुटका झाली. ज्यांना जीवनात अपयश आल्यामुळे आत्महत्या करावीशी वाटते त्यांनी जगण्याचा टोकाचा प्रयत्न कसा असतो हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावे . ही सत्यकथा आपल्याला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीही जगण्याची प्रेरणा देते ,  जगण्यासाठी अनेकांची कशी धडपड चालते हे जाणून घ्यायचे तर *'मला निसटले पाहिजे'* हे पुस्तकही वाचावे . रशियाने काही ब्रिटिश सैनिकांना बंदी बनवले होते . ह्या सैनिकांनी पळून जाण्यासाठी जे प्रचंड धाडस केले तो ह्या पुस्तकाचा विषय आहे . कैदेतून पळाल्या वर हे सैनिक रशियापासून भारतापर्यंत चालत आले ,  इथे ब्रिटिशांची सत्ता होती . भारतात आल्यावर ब्रिटिश आपल्याला पुन्हा इंग्लंडला पाठवतील , हे ओळखून त्यांनी अत्यंत थंड प्रदेशातून उपासतापास सहन करून भारतापर्यंत चालत प्रवास केला . भारताच्या सीमेवर ते ब्रिटिश सैन्याकडे आले आणि त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आले . स्वातंत्र्य मिळवण्यासाठी माणूस प्रसंगी जीवावर उदार होतो , असंख्य अडथळे पार करतो हे या पुस्तकातून शिकता येते . आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य किती बहुमोल आहे ते कळते ,  तसेच एक सैनिक देशासाठी किती झटत असतो तेही कळते .

भारता मध्येही अनेक चरित्रकथा लिहिल्या गेल्या. *'लंडनच्या आजीबाई'* हे पुस्तक त्यापैकी एक आहे. इंग्रजांच्या काळात विदर्भात राहणारी *राधाबाई वनारसे*  ही विधवा दारिद्र्य भोगत होती . मुलींचं पोषण करणं अशक्य झालं होतं . ती दुसरा विवाह करून इंग्लंडला राहायला गेली . दुर्दैवाने दुसऱ्या पतीचेही निधन झाले. पुन्हा दारिद्र्य आले . इंग्लिश भाषा येत नव्हती . ती अशिक्षित होती . तरीही इंग्लंडमध्ये राहून तिने खानावळ चालवली आणि लंडनमध्ये चार इमारती विकत घेतल्या . पु. ल. देशपांडे , अत्रे , यशवंतराव चव्हाण लंडनला गेले की तिच्या खानावळीत जात असत . अत्रेंनी तर तिचे कौतुक करताना म्हटले की त्यांच्यामुळे लंडनही महाराष्ट्राचा भाग व्हायला पाहिजे . हे पुस्तक वाचकाला आशावादी बनवते , संघर्ष करण्याची प्रेरणा देते . कितीही संकटे आली तरी श्रम करून संकटे दूर करता येतात , यश मिळवता येते , हे या पुस्तकातून शिकता येते.

काही पुस्तके जगायला शिकवतात तर काही पुस्तके का जगायचं हे शिकवतात. जीवनातील विसंगतीकडे पाहून हसता येते हे पु. ल. देशपांडेंची पुस्तके शिकवतात आणि असे दिलखुलास हसता येते हाच जीवनातील मोठा आनंद आहे हे या पुस्तकातून कळते . *"चाराणे खाल्ले तर चौकटीची टोपी घालून डिस्ट्रिक्ट जेलात घालतात आणि लाखो रुपये खाल्ले तर लोकनियुक्त प्रतिनिधी बनवतात''*  हा त्यांचा विनोद अनेक वर्षे उलटली तरी अजूनही खरा ठरतो. *''असा मी असामी''* आजही सामान्य माणसाचे प्रतिबिंब आहे . आचार्य अत्र्यांची पुस्तकेही अशीच हसवतात . द. मा. मिरासदार , रमेश मंत्री यांचीही पुस्तके करमणूक करतात . शं. ना. नवरे , व. पु. काळे छोट्या कथेमधून खूप काही सांगून जातात . व्यंकटेश माडगूळकर आणि रवींद्र पिंगे ह्यांचे ललित लेख तर फार वाचनीय असतात . माडगूळकरांनी त्यांच्या गावाचे खुमासदार वर्णन केले आहे आणि पिंगेंनी स्वतः केलेल्या भटकंतीवर विपुल लेखन केले आहे . हे लेखन आपल्याला आसपास पाहायला प्रवृत्त करते . जीवन चहूबाजूने खूप काही दाखवत असते . आपण आपल्या छोट्या समस्या , रोजचे रडे बाजूला सारून हा आनंद घ्यायला हवा हे त्यांची पुस्तके शिकवतात.

       कथा, चरित्रकथा अनेक शब्दातून व्यक्त होतात पण कविता मोजक्या शब्दातून खूप मोठा अर्थ सांगून जाते. आशावाद , सकारात्मकता कशी असावी हे मंगेश पाडगावकरांच्या *'या जन्मावर , या जगण्यावर'* च्या शेवटच्या कडव्यातून शिकता येते . पाडगावकरांनी लिहिले आहे ,

*या ओठानी चिंबून घेईन हजारदा ही माती,*

*अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी...*

*इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे,*

*या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे...*

आपण जगताना अनंत यातना सोसतो . प्रसंगी मरणही झेलून घेतो . तरीही पाडगावकर लिहितात की ज्याप्रमाणे श्रीकृष्ण पुरामध्ये पिंपळ पानावरुन तरून गेला तसे हे विश्वही तरणार आहे. आसपास अनेक नकारात्मक प्रसंग घडताना हा आशावाद मनाला खूप उभारी देतो . आपल्या मनाला उभारी देण्यासाठी आणखी एक गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या पाठीशी उभं राहणं . एखाद्याने नुसता धीर दिला तरी मोठ्या संकटांवर मात करता येते. *कुसुमाग्रजांची *"कणा"* कविता हेच शिकवते . कुसुमाग्रजांकडे त्यांचा एक विद्यार्थी आला आहे . त्याच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे त्याचं घर उध्वस्त झाले आहे. तो येतो आणि म्हणतो,

*"ओळखलत का सर मला?’ - 

*पावसात आला कोणी,*

*कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.*

*क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,*

*‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.*

त्याच्या घरात पुराचं पाणी शिरलं पण त्या पाण्याला नाव न ठेवता तो त्याला गंगामाई म्हणतो आणि पुढे सांगू लागतो , 

*"माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,*

*मोकळ्या हाती जाईल कशी , बायको मात्र वाचली ,*

*भिंत खचली , चूल विझली , होते नव्हते नेले ,*

*प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.*

*कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे ,*

*पडकी भिंत बांधतो आहे ,*

 *चिखलगाळ काढतो आहे"*

कुसुमाग्रजांनी त्याला मदत म्हणून काही पैसे देण्याचा विचार केला पण त्याने ते नाकारले ,  कुसुमाग्रज लिहितात,

*खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,*

*‘पैसे नकोत सर,*

*जरा एकटेपणा वाटला.*

*मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,*

*पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’!*

पूरग्रस्त झालेला हा विद्यार्थी खूप मानी आहे ,  त्याला पैसे नकोत , फक्त सरांकडून धीर हवा आहे ,  सरांनी *पाठीवर हात ठेवून फक्त लढा म्हणावे* इतकीच त्याची इच्छा आहे !! कुसुमाग्रजांची ही कविता अनेकांच्या स्मरणात राहिली ती फक्त हव्या असलेल्या धीरासाठी!

          मराठी पुस्तकांची ही खासियत आहे . ही पुस्तके जगायला बळ देतात . जणू पाठीवरती हात ठेवून लढ म्हणत असतात  ,म्हणून आपल्या संग्रही पुस्तके असावीत , आपल्या पुढच्या पिढीला संपत्ती देण्यापेक्षा पुस्तके द्यावीत , कारण *संपत्ती मिळालेली पिढी पंगू होते तर पुस्तके मिळालेली पिढी सक्षम बनते*. 

           पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित करणारी पाब्लो नेरुडाची कविता आहे,

*If you do not travel,*

*If you do not read,*

*If you do not listen* 

 *to the sounds of life,*

*You start dying* *slowly*

*जर तुम्ही प्रवास करत नसाल , पुस्तक वाचत नसाल , जीवनाचे रंग अनुभवत नसाल तर तुम्ही हळूहळू मरत आहात....*

.......

*वाचाल तरच वाचाल ,* 

आणि 

*दुनिया फिराल तरच जगाल !!*

🙏🙏

Friday, 20 August 2021

 Vaccination only alternative to defeat

Third wave of Corona pandemic – Chief Minister

·       Sadbhavana Jeevanrath vaccination vehicles handed over

·       Nagpur and Amravato division get 200 vaccination vehicles

·       Mission Vaccination campaign launched

            Nagpur, Aug 20 – Stating that since there was no effective drug available on Corona, vaccination was shield against Corona, chief minister Uddhav Thackeray said that taking in to account third wave of Corona pandemic in coming days, it was necessary to undertake vaccination of maximum citizens and we are ready to defeat Corona. Chief Minister Thackeray was speaking at handing over ceremony of 200 Sadbhavana Jeevanrath mobile vaccination vehicles.

            The online program held at divisional sports complex at Manakapur was organized by Vidarbha Sahayata Society and MahaGenCo. Chief Minister Thackeray was chief guest of the function.

            MSEDCL has given Rs 25 crore to Vidarbha Sahayata Society from its CSR funds for effectively running the vaccination campaign. A total of 200 mobile vaccination vehicles have been provided from this fund to Primary Health Centres in Vidarbha. The vehicles were handed over at the hands of Revenue Minister Balasaheb Thorat.

            Stating that safety of people was accorded highest priority while combating calamities like floods and excessive rains along with Corona, chief minister Thackeray said that more than five crore citizens from the state have been administered first and second dose of vaccine. He said that in a single day more than 9 lakh doses were given and all the citizens in state would be vaccinated as and when maximum doses are made available by the Union Government. He said that these mobile vaccination vehicles would prove helpful for those who can’t reach the vaccination centres for various reasons. He assured every possible help for vaccination and underlined necessity of the vaccination.

            Launching the vaccination campaign and handing over the mobile vaccination vehicles Revenue Minister Balasaheb Thorat said that Sadbhavana Jeevanrath vehicles are playing important role in reaching out to last person in remote areas and priority would be given to complete target of vaccination by reaching out to remote areas like Melghat, Gadchiroli by implementing the message of Sant Gadgebaba Maharaj. He pointed out that it was the first ever initiative by any power department in the country providing 200 mobile vaccination vehicles and this campaign was being launched on birth anniversary of Late Prime Minister of India Rajiv Gandhi which is Sadbhavana din.

            During his presidential remarks minister for power Dr Nitin Raut who is also Guardian Minister for Nagpur said that priority was given to provide necessary medical help including Oxygen to health department while combating first and second wave of Corona pandemic. He said that while preparing for third wave vaccination was necessary which is why MahaGenCo has made available Rs 25 crore through its Corporate Social Responsibility funds to Vidarbha Sahayata Samiti which would enable providing 2 vehicles for every Taluka in Nagpur and Amravati division. Power minister asked district collector to appoint control officer for judicious use and maintenance of the vehicles. He also asked divisional commissioner to regularly avail report of the vaccination drive.

            Floral tribute was offered to late Prime Minister Rajiv Gandhi to mark his birth anniversary to mark Sadbhavana Din in the beginning. The Sadbhavana Jeevanrat for vaccination were handed over by lighting lamp. Divisional commissioner Prajakta Lavangare-Varma handed over 128 vehicles while Guardian Minister for Amravati Guardian Minister Yashomati Thakur handed over 72 vaccination vehicles.

0000


 कोरोना की तीसरी लहर पर काबू पाने पर

टीकाकरण ही एकमात्र विकल्प है

                                                      - मुख्यमंत्री

·       सद्भावना जीवनरथ टीकाकरण वाहनों का हस्तानांतरण

·       नागपुर व अमरावती मंडलों को दो सौ टीकाकरण वाहन

·       मिशन टीकाकरण अभियान का शुभारंभ

            नागपुरदि. 20 :  कोरोना की मौजूदा समय में कोई प्रभावकारी दवा नहीं होने के कारण वैक्सीन ढाल के रूप में काम कर रही है। आने वाले समय में संभावित कोरोना‌ की तीसरी लहर को ध्यान में रखते हुए ज्यादा से ज्यादा नागरिकों का टीकाकरण करना आवश्यक है। कोरोना को शिकस्त देने के लिए हम तैयार हैं। यह बातें मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे ने सद्भावना जीवन रथ के दो सौ टीकाकरण वाहनों के हस्तांतरण कार्यक्रम के अवसर पर कहीं।

             मनकापुर के विभागीय क्रीडा संकुल के प्रांगण में विदर्भ सहायता सोसायटी और महापारेषण के साझे में सद्भावना जीवनरथ के 200 टीकाकरण वाहनों को सौंपेने का कार्यक्रम मुख्यमंत्री श्री ठाकरे की उपस्थिति में सोशल मीडिया प्रणाली के माध्यम से किया गया था। इस अवसर पर मुख्यमंत्री मार्गदर्शन कर रहे थे। 

             महापारेषण कंपनी की ओर से टीकाकरण मुहिम को प्रभावी रूप से चलाने के लिए 25 करोड़ रुपए सीएसआर निधि विदर्भ सहायता सोसायटी को उपलब्ध कराई गई है। इस राशि से विदर्भ के प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों को 200 टीकाकरण वाहन उपलब्ध कराए गए हैं। इन टीकाकरण वाहनों का हस्तांतरण राजस्व मंत्री बालासाहेब थोरात के हाथों किया गया।

            मुख्यमंत्री ने कहा कि कोरोना के साथ-साथ भारी बारिश और बाढ़ जैसे संकटों का सामना करते हुए लोगों की सुरक्षा को प्राथमिकता दी गई है। श्री ठाकरे ने आगे कहा कि राज्य में 5 करोड़ से अधिक नागरिकों को कोरोना वैक्सीन की पहली और दूसरी खुराक दी जा चुकी है। एक दिन में 9 लाख से अधिक लोगों को खुराक दी गई है और केंद्र सरकार की ओर से जितनी अधिक खुराक मिलेगी उसके अनुसार सभी का टीकाकरण किया जाएगा। जो लोग टीकाकरण केंद्रों तक नहीं पहुंच सकते ऐसे नागरिकों को दो सौ टीकाकरण वाहन घर-घर जाकर टीका लगाने के काम आएंगे। उन्होंने इस अवसर पर कहा कि टीकाकरण के लिए पूर्ण सहायता प्रदान की जाएगी और अधिक से अधिक नागरिकों को टीका लगाना आवश्यक है।

              टीकाकरण वाहनों का हस्तांतरण और अभियान की शुरुआत करते हुए राजस्व मंत्री बालासाहेब थोरात ने कहा कि सद्भावना जीवन रथ के माध्यम से विदर्भ के आखिरी व्यक्ति तक पहुंचने में टीकाकरण वाहन महत्वपूर्ण भूमिका निभा रहे हैं।

              संत गाडगे महाराज के संदेश पर अमल करते हुए मेलघाटगडचिरोली जैसे अ‍तिदुर्गम क्षेत्रों में पहुंचकर टीकाकरण का उद्देश्य पूरा करने की प्राथमिकता होगी।  ऊर्जा विभाग की ओर से दो सौ टीकाकरण वाहन उपलब्ध कराना यह देश और राज्य का पहला उपक्रम है। उन्होंने कहा कि यह कार्यक्रम राजीव गांधी के जन्म दिवस यानी सद्भावना दिवस पर आयोजित हो रहा है।

            अपने अध्यक्षीय भाषण में ऊर्जा मंत्री तथा पालक मंत्री डॉ. नितिन राऊत ने कहा कि कोरोना की पहली और दूसरी लहर का सामना करते हुए स्वास्थ्य विभाग को ऑक्सीजन सहित आवश्यक मेडिकल सुविधा उपलब्ध कराने को प्राथमिकता दी गई है। तीसरी लहर का सामना करते हुए टीकाकरण अति आवश्यक है। इसके चलते महापारेषण कंपनी की ओर से 25 करोड़ रुपए सीएसआर निधि के माध्यम से विदर्भ सहायता समिति को राशि उपलब्ध कराई गई है। इसके माध्यम से नागपुर और अमरावती विभाग की हर तहसीलों को दो-दो इस हिसाब से कुल 200 वाहन दिए जा रहे हैं। इन वाहनों का सदुपयोग हो और वाहनों की देखभाल करने के लिए जिलाधिकारी द्वारा नियंत्रण अधिकारी को नियुक्त किया जाना चाहिए। इसके अलावा ऊर्जा मंत्री ने विभागीय आयुक्तों को टीकों के उपयोग पर नियमित रिपोर्ट लेने का भी निर्देश दिया है।

            शुरुआत में सद्भावना दिवस के मौके पर पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी की प्रतिमा पर माल्यार्पण कर उनका अभिवादन किया गया। दीप जलाकर दो सौ सद्भावना जीवनरथों का हस्तांतरण किया गया। नागपुर विभाग के लिए 128 टीकाकरण वाहनों का हस्तांतरण विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा और अमरावती विभाग के लिए 72 टीकाकरण वाहनों का हस्तांतरण महिला एवं बाल कल्याण मंत्री श्रीमती यशोमती ठाकुर को किया गया।

0000


 

सूचना प्रोद्योगिकी क्षेत्र में उत्कृष्ट कार्य करनेवाली संस्थाओं को

राजीव गांधी सूचना प्रोद्योगिकी पुरस्कार देकर सम्मानित किया जाएगा

सूचना प्रोद्योगिकी राज्य मंत्री सतेज पाटिल

पुरस्कार की कार्यपद्धति और समयसारिणी घोषित

        मुंबई दि.२० : - राज्य के सूचना प्रोद्योगिक क्षेत्र की उपक्रमशीलता बढ़ानेउत्कृष्ट कामकाज करनेवाले सूचना प्रोद्योगिकी समुहों को सन्मानित कर समाज में उनकी पहचान स्थापित करनेसमाज में  सूचना प्रोद्योगिकी का उपयोग गतिमान होने के लिए प्रोत्साहन देनेसूचना प्रोद्योगिकी का उपयोग कर अधिकाधिक रोजगार निर्माण करने पर ज़ोर देनेसूचना प्रोद्योगिकी का उपयोग कर पर्यावरण का संरक्षण एवं संवर्धन करना ऐसे  विविध क्षेत्र में उत्कृष्ट कार्य करनेवाली संस्थाओं को राज्य सरकार की ओर से राजीव गांधी सूचना प्रोद्योगिकी पुरस्कार देकर सम्मानित किया जाएगायह जानकारी सूचना प्रोद्योगिकी राज्य मंत्री सतेज ऊर्फ बंटी डी पाटिल ने आज पत्रकार परिषद में दी।

             राज्यमंत्री श्री. पाटिल ने जानकारी में बताया कि सूचना प्रोद्योगिकी क्षेत्र के आयटी इंजिनियरींग सर्विस सॉफ्टवेअरआयटी एनेबल्ड सर्विस  (बीपीओ/केपीओ)आयटी इंफ्रास्ट्रक्चर (डेटा सेंटर)मोस्ट प्रॉमिसींग स्टार्टअप और स्पेशल अवार्ड फॉर कॉन्ट्रीब्युशन टु महाराष्ट्र ऐसे  ५ भागों में इस पुरस्कार का चयन होगा।  साथ ही मानचिन्ह व प्रमाणपत्र यह इस पुरस्कार का स्वरूप है।

पुरस्कार की समयसारिणी

            इस साल के पुरस्कार की समयसारिणी इस तरह है - २० अगस्त२०२१ को नामांकन के लिए आवेदन दाखिल करने के लिए विज्ञापन प्रकाशित किया जाएगा और १५ सितंबर२०२१ यह  नामांकन दाखिल करने की अंतिम तारीख होगी। २७ सितंबर२०२१ को प्राप्त आवेदनों की छानबीन होगी। ३० सितंबर२०२१ को  छाननी समिति की प्राथमिक बैठक होगी और २० अक्टूबर२०२१ को छाननी समिति की अंतिम बैठक होगी।

          अक्टूबर माह के अंतिम में पुरस्कार की  घोषणा की जाएगी और पुरस्कार का वितरण समारोह आयोजित किया जाएगायह जानकारी राज्यमंत्री सतेज पाटिल ने दी।

           देश के  सामाजिक एवं आर्थिक विकास के लिए विज्ञान और प्रोद्योगिकी का उपयोग यह आधुनिकीकरण का केंद्रबिंदू है।  स्व. श्री राजीव गांधी ने विज्ञान प्रोद्योगिकीसूचना प्रोद्योगिकी का  प्रसार व राष्ट्रीय विकास में उसका परिणामकारक उपयोग करने पर ज़ोर दिया था। इसी से ही हर साल  २० अगस्त यह दिन पूर्व प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी का जन्मदिन सूचना प्रोद्योगिकी दिन के रूप में राज्य सरकार की ओर से मनाया जाता है।

00000


 

Best performing institutes in Information Technology sector to be honored with Rajiv Gandhi Information Technology Award

– Minister of state for Information Technology Satej Patil

Procedure and Schedule of Award announced

 

      Mumbai, Aug 20: The State Government will honor the best performing institutions with Rajiv Gandhi Information Technology Award that are working towards increasing state initiative in information and technology sector; to establish IT groups in the society by recognizing their contribution in the IT sector; to encourage for speedy use of information technology; to use IT for generating maximum job creation; and to preserve and protect environment by using information technology.

      This information was given by the Minister of State for Information Technology Satej alias Banti D Patil at a press conference here today.

      These awards will be given in five categories in the information technology sector such as IT Engineering Service Software, IT Enabled Service (BPO/KPO), IT Infrastructure (Date Centre), Most Promising Start Up and Special Award for Contribution to Maharashtra, Patil said. The award consists of a memento and citation, he added.

Schedule of Awards:

      The schedule for this year’s award will be as follows. The advertisement inviting nominations for the awards will be issued on August 20, 2021 and nominations can be submitted latest by September 15, 2021. The applications will be scrutinized on September 27, 2021 and first meeting of the scrutiny committee will be held on September 30, 2021 followed by its last meeting to be held on October 20, 2021.

      The announcement of the award will be made in the last week of October and the award distribution function will be organized, said MoS Satej Patil.

      Use of information technology for social and economic development of the country is the pivot of modernization. The Late Rajiv Gandhi had laid emphasis on expansion and use of information technology and its effective utilization in national development. The state government observes August 20 - the birth anniversary of former Prime Minister Rajiv Gandhi as Information Technology Day every year.

0000


 

 संजीवन वन उद्यानप्रकल्पाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

'संजीवन वन उद्यानऑक्सिजन पार्क म्हणून नावारूपाला येईल

-  उपमुख्यमंत्री अजित पवार

वारजे परिसरात 35 एकर वनविभागाच्या जागेवर साकारणार अनोखे वन उद्यान

 

         पुणे दि.20: पुणे महानगरपालिका व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात येणारे 'संजीवन वन उद्यानऑक्सिजन पार्क म्हणून नावारूपाला येईलअसे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले. पुणे महानगर परिसरात वनविभागाच्या टेकड्या व जागा आहेतत्याठिकाणीही वृक्षारोपण करताना देशी वृक्षारोपणाला प्राधान्य द्यावेअशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

            वारजे येथील डुक्कर खिंडीजवळ वनविभागाच्या 35 एकर जागेत पुणे महानगरपालिका व वन विभागमहाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने 'संजीवन वन उद्यानउभारण्यात येत आहेया प्रकल्पाचे भूमिपुजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणेपुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळनगरसेवक बाबुराव चांदेरेनगरसेवक दिलीप बराटेसचिन दोडकेनगरसेविका लक्ष्मी दुधानेप्रशांत जगतापबाबा धुमाळ यांच्यासह मनपा आयुक्त विक्रमकुमारअतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणारमुख्य वनसंरक्षक सुजय दोडलउपवनसंरक्षक राहुल पाटील उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले,  पुणे महानगरपालिका व वन विभागमहाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित 'संजीवन वन उद्यानएका देखण्या उद्यानात रूपांतर हे जैवविविधता संवर्धनाचे आदर्श उदाहरण ठरेल. जैवविविधता जोपासणारे हे उद्यान ऑक्सिजन पार्क म्हणून नावारूपाला येईल.  सौंदर्यीकरणप्रदूषण नियंत्रणाबरोबरच वारजेकोथरूड परिसरातील नागरिकांसाठी एक चांगला ऑक्सीजन पार्क तयार होईल. महानगरालगतच्या टेकड्या व मोकळ्या वनजमिनींवर वनविभागाने वृक्षारोपनाचे नियोजन करावे व अशा कामांना गती द्यावीतसेच वृक्षारोपन करताना देशी वृक्ष लागवडीला प्राधान्य द्यावेअसे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

            'संजीवन वन उद्यानप्रकल्पामुळे पर्यावरण संवर्धनास मदत होणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, 'संजीवन वन उद्यानामध्ये विविध प्रकारचे वृक्ष पाहण्यास मिळणार आहे. या उद्यानात येणाऱ्या नागरिकांना चांगली हवा मिळणार आहे. कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांनाच समजले आहे. त्यासाठी आपण अनेक ऑक्सिजन प्लांट्स तयार केले. मात्र हा नैसर्गिक प्लांट असून हे टिकवणे गरजेचे  आहे. अन्यथा भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे वृक्षारोपनासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचेळी त्यांनी सांगितले.

            प्रास्ताविक करताना विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ म्हणाल्यापुणे महानगरपालिका व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित 'संजीवन वन उद्यानवारजे व परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नागरिकांसह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारीलोकप्रतिनिधी उपस्थित होते.                 

00000

 पुणे जिल्ह्यात 70 लाख कोविड लसीकरणाचा टप्पा पार;

अधिकाधिक लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न

- उपमुख्यमंत्री अजित पवार   

 टास्क फोर्स तज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच शाळांबाबतचा निर्णय घेतला जाईल

 ग्रामीण भागात धडक सर्वेक्षण मोहिमेंतर्गत २ लाख ८३ हजार ३२७ नमुना तपासणी पूर्ण

 प्रत्येक तालुक्यात एक ऑक्सिजन प्लँट

 खाजगी रुग्णालयातील लसींवर प्रशासनाचे नियंत्रण

 जिल्ह्यात मागील चार आठवड्यांमध्ये रुग्ण संख्या कमी होतांना दिसून येत आहे

 तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरुन प्रशासन सज्जनागरिकांनीही नियमांचे पालन करावे

            पुणेदि. 20: जिल्ह्यात कोवीड प्रतिबंधक लसीकरणाचा ७० लाखांचा टप्पा पार झाला आहे. ग्रामीण भागात धडक सर्वेक्षण मोहिमेंतर्गत २ लाख ८३ हजार ३२७ नमुना तपासणी करण्यात आली आहे. ग्रामीण कार्यक्षेत्रातील हॉटस्पॉट गावांमध्ये कोविड योग्य वर्तन जनजागृतीशोध चाचणी उपचारकोविड केअर सेंटरशासकीय योजना व कोविड लसीकरण या पाच कृतीदलाच्या माध्यमातून कोविडमुक्त गाव अभियानास सुरुवात करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकंमत्री अजित पवार यांनी आज दिलीतसेच टास्क फोर्सच्या मार्गदर्शनानुसारच शाळा सूरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

          पुणे विधान भवनाच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हेगृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलराज्यमंत्री दत्तात्रय भरणेजि.प.अध्यक्षा निर्मलाताई पानसरेपुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ,  खासदार सुप्रिया सुळेखासदार श्रीरंग बारणेआमदार ॲड. अशोक पवारआमदार सुनील शेळकेआमदार सुनिल टिंगरेआमदार सिध्दार्थ शिरोळेतसेच विभागीय आयुक्त सौरभ रावयशदाचे महासंचालक एस चोक्कलिंगमपुणे मनपा आयुक्त विक्रम कुमारपिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटीलजिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुखजि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसादपोलीस आयुक्त अमिताभ गुप्तापिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशजिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुखआरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ.सुभाष साळुंखे आदिंसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

             यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेजिल्ह्यात मागील चार आठवड्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे.  कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी प्रशासन तयारी करत असून नागरिकांनीही नियमांचे पालन करावे. पुणे मनपामध्ये 10, पिंपरी चिंचवडमध्ये 3, पुणे ग्रामीण मध्ये 12 ऑक्सिजन प्लँट कार्यान्वीत झाले आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने अपेक्षीत ऑक्सिजनची गरज लक्षात घेता  जिल्हा ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण करण्यात येत आहे.

            जिल्ह्यात पहिल्या डोस आधी दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यात लसीकरणाचा वेग समाधानकारक आहे. जवळपास कोवीड लसीकरणाचा 70 लाखांचा टप्पा पूर्ण केला आहे. जास्तीत जास्त लस उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सूरु आहेत. खाजगी रुग्णालय लसीकरणावरही शासनाचे नियंत्रण आहे. तसेच खाजगी रुग्णालयाच्या वैद्यकीय देयकांचे लेखा परिक्षणही वेळोवेळी सुरु आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी चाचण्यांचे प्रमाण कमी केलेले नाही.

            सुपर स्प्रेडर सर्वेक्षण नमुना तपासणीमध्ये एम.आय.डी.सी. कारखाने क्षेत्रातील कामगार व मजूरबँक कर्मचारी तसेच सामाजिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आरटीपीसीआर नमुना तपासणी करण्यात येत आहे. धडक सर्वेक्षण मोहिमेमुळे हॉटस्पॉट गावांची संख्या १०९ वरुन ९५ पर्यंत कमी झाली आहे.  ग्रामीण भागातील हॉटस्पॉट गावांवरही विशेष लक्ष देण्यात येत आहे. शाळा सुरु करण्याबाबत टास्क फोर्सचे तज्ज्ञ जे मार्गदर्शन देतील त्यानुसारच निर्णय घेणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

            यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हेगृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलखासदार सुप्रिया सुळेखासदार श्रीरंग बारणे तसेच अन्य लोकप्रतिनिधींनीही महत्त्वाच्या सूचना केल्या.

              डॉ. सुभाष साळुंके म्हणालेलहान मुलांच्या पावसाळ्यातील आजारांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी कुटुंबातील व्यक्तींचे जास्तीत जास्त लसीकरण करुन घेणे आवश्यक असल्याचेही डॉ. साळुंके यांनी सांगितले.

             विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदरप्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनानागरिकांची नमुना तपासणीबाधित रुग्णरुग्णालयीन व्यवस्थापनलसीकरण सद्यस्थितीम्युकरमायकोसिसचा रुग्णदरमृत्युदरतिसऱ्या लाटेच्या तयारीच्या दृष्टीने ऑक्सिजन प्लँटची सद्यस्थिती बाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

           पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.

            जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण स्थितीबाबत व उपाययोजनेबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

0000

 एकमेकांच्या सहकार्याने राज्यातील जनतेसाठी काम करू

विकासकामात कोणताही अडथळा येऊ देणार नाही

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

 

            नागपूरदि. 20 : राज्य शासनाच्यावतीने विकासकामासाठी आवश्यक ते सहकार्य केंद्र शासनाला करण्यात येईल. विकासाच्या प्रत्येक पावलावर एकमेकांसोबत राहून राज्यातील जनतेसाठी काम करूहे करताना जनतेचे हित आणि राज्याच्या विकासाआड कुणालाही येऊ देणार नाहीअशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली.

            सिताबर्डी- झीरो माईल फ्रिडम पार्क-कस्तुरचंद पार्क सेक्शन आणि फ्रीडम पार्कच्या उद्घाटनाप्रसंगी ते (दूरदृष्यप्रणालीद्वारे) बोलत होते. ई-फ्लॅगद्वारे मेट्रो सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीपालकमंत्री डॉ. नितीन राऊत,  पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदारनगरविकास मंत्री एकनाथ शिंदेमहापौर दयाशंकर तिवारीविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसकेंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंह पुरी (दूरदृष्यप्रणालीद्वारे) तसेच  खासदार कृपाल तुमानेसर्वश्री आमदार ॲङ आशिष जयस्वालॲङ अभिजित वंजारीविकास ठाकरेकृष्णा खोपडेराजू पारवेविकास कुंभारे अन्य स्थानिक लोकप्रतिनिधीविभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारेजिल्हाधिकारी आर. विमलामहामेट्रोचे  व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीतकेंद्रीय सचिव श्री. दुर्गाप्रसाद मिश्रा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

           मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, प्रगती आणि विकासासाठी राज्यात मेट्रोमहामार्गांचे जाळे विणण्यात येत आहे. मेट्रोची ही कामे उन्नत मार्गाने पुढे नेत आहोत. त्या मार्गाखालचा भागही प्रकल्पाचा भाग समजून त्याचा विकास करावात्याचे सौंदर्यीकरण करून नागरिकांसाठी तिथे सोयी-सुविधा निर्माण करण्याबाबत महामेट्रोने विचार करण्याची सूचना यावेळी  मुख्यमंत्र्यांनी केली.

          महामेट्रोने नागपूरचा कायापालट केला आहे. मेट्रोचे कालबद्धतेने काम पूर्ण केले आहेअसे सांगून विकास कामे करताना राजकीय मर्यादा दूर ठेवण्याचा पायंडा नागपूरने पाडला असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.

            नागपूर शहराच्या सौंदर्यात व विकासात भर घालणाऱ्या महामेट्रोच्या या सेक्शनचे सद्भावना दिवशी लोकार्पण व्हावे हे चांगले औचित्य आहे. फ्रीडम पार्कच्या निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी परंपरेची गाथा प्रेरणा देत राहील. वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल. पालकमंत्री म्हणून विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे डॉ. नितीन राऊत यांनी आश्वस्त केले.        

            नागपूर मेट्रोच्या सर्वात व्यस्त आणि महत्वपूर्ण भागातील या वाहतूक व्यवस्थेमुळे सुमारे एक लाख प्रवाशी मेट्रोशी जोडले जातील. रस्त्यांवरून देशाची ओळख होत असल्याचे सांगून नगरविकास मंत्री  एकनाथ‍ शिंदे म्हणालेकोविडच्या संकट काळातही राज्य शासन विकासकामांना चालना देत आहे. विदर्भ-मराठवाड्यासह मुंबईला जोडणारा समृद्धी महामार्ग हा राज्याच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेलअसे मंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले. 

            केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी नागपूर महामेट्रोचा हा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचे सांगितले. या प्रकल्पाची विस्तृत माहितीही त्यांनी यावेळी दिली. फ्लोटिंग ट्रॅक स्लॅब टेक्नॉलॉजी’ अंमलात आणली आहे. आवाज आणि कंपन कमी होण्यास त्यामुळे मदत होईलअसे ते म्हणाले.

 

            सिताबर्डी-झीरो माईल फ्रीडम पार्क-कस्तुरचंद पार्क सेक्शनचे काम हे सर्वात अभिनव आणि अद्वितीय फ्रेंच वास्तूशास्त्रज्ञाने बांधलेले स्थापत्याचे उत्तम शिल्प असल्याची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. वीस मजली इमारत असलेले आणि चौथ्या मजल्यावरुन मेट्रो धावणारे हे नाविण्यपूर्ण राजपूत वास्तूकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. कॉटन मार्केटपासून सायन्स कॉलेजपर्यंत प्रवासी वाहतूक सुलभ व्हावी यासाठी अंडरपास रस्ता करण्याचे त्यांनी जाहीर केले. मेट्रोचे हे स्टेशन आणखी आकर्षक होण्यासाठी त्यांनी काही सूचना केल्या. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला रस्त्यांच्या कामासाठी निधी देण्याचे त्यांनी आश्वस्त केले. तेलंगखेडी-फुटाळा येथील महामेट्रोतर्फे करण्यात येत असलेले संगीत कारंजाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे  करण्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. विकासकामांना कायम सहकार्य ठेवण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

            विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक झीरो माईलला फ्रीडमपार्क व वीस मजली मेट्रोच्या इमारतीमुळे भव्यता येणार असल्याचे सांगितले. महामेट्रोने देशात वेगाने काम केले असल्याची प्रशंसाही त्यांनी केली.

            सुरुवातीला या विषयीची संपूर्ण माहिती देणारी दृकश्राव्य फितीचे सादरीकरण करण्यात आले. सर्व मान्यवरांनी या नवीन मार्गावरील प्रवासी सेवेचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती श्वेता शेलगावकर यांनी तर आभार ब्रिजेश दीक्षित यांनी आभार मानले.

 हृदयनाथ मंगेशकर हे त्यांच्या घरात लाडके! त्यांना सवय होती की जेवायला बसण्यापूर्वी व नंतर हात धुतले की ते माई मंगेशकरांच्या पदराला हात पुसत , लग्नानंतर पदराला हात पुसण्याचा शिरस्ता कायम राहिला फक्त पदर आईच्या ऐवजी पत्नीचा म्हणजे भारती मंगेशकरांचा झाला.

             शांताबाई शेळके ह्या मंगेशकरांना जवळच्या, एकदा मंगेशकरांकडे कोणत्यातरी कार्यक्रमाच्या निमित्ताने शांताबाईंना भोजनाच आमंत्रण होत.कार्यक्रम म्हणून भारतीताईं कशिदाकाम केलेली रेशमी साडी नेसल्या होत्या ; हृदयनाथांबरोबर शांताबाई जेवायला होत्या,हृदयनाथांचे जेवण आटोपल्यावर त्यांनी हात धुतले आणि शिरस्त्याप्रमाणे हात पुसायला मोहरा भारतीताईंकडे वळवला आता नवी साडी खराब होईल म्हणून माझ्या साडीला हात पुसू नका अस भारतीताईं सांगत होत्या तरीही हृदयनाथ त्यांच्या रोखाने जायला लागले मग भारतीताईं पुढे धावताहेत आणि हृदयनाथ लंगडत मागे असा पकडापकडीचा खेळ तिथे उपस्थित असलेल्या शब्दसम्राज्ञी शांताबाईंनी पाहिला आणि तिथल्या तिथे गाण जन्माला आल......।


रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी

कर्नाटकी कशिदा मी काढिला

हात नगा लावू माझ्या साडीला!

नवी कोरी साडी लाखमोलाची

भरली मी नक्षी फूलवेलाची

गुंफियलं राघूमोर, राघूमोर जोडीला

हात नगा लावू माझ्या साडीला!

जात होते वाटंनं मी तोऱ्यात

अवचित आला माझ्या होऱ्यात

तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला?

हात नगा लावू माझ्या साडीला!

भीड काही ठेवा आल्यागेल्याची

मुरवत राखा दहा डोळ्यांची

काय म्हणू बाई बाई, तुमच्या या खोडीला

हात नगा लावू माझ्या साडीला!

एका कार्यक्रमाला ही गोष्ट सांगतांना आशाताईं भोसले म्हणाल्या की मग त्या गाण्याला दीदीने चाल लावली, एके दिवशी मला दीदीने बोलवलं आणि सांगितलं आशा तुझ्यासाठी एक गाण बसवलय मग तिने ते मला गाऊन चाल शिकवायला सुरवात केली , तिच्या स्वभावाप्रमाणे अगदी मृदुमुलायम चाल! मी तिला म्हटल दीदी ही लावणी आहे की भजन ? मग दीदी म्हणाली मी अशी चाल लावली आहे तुला गायच तस गा मग एवढा privilege मिळाल्यावर आवश्यक बदल ,लावणीचा बाज ठेवत पहिल्या कडक ढोलकीसकट एक फर्मास अजरामर लावणी आशा ताईंनी सादर केली.

अशी एक अजरामर लावणी तयार झाली.

Featured post

Lakshvedhi