सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 18 August 2021
संगीत महाविद्यालयाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
· मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या कामाचा आढावा
मुंबई, दि. 17 : संगीताचा शास्त्रशुध्द अभ्यास, विकास, प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी सुसज्ज व अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबई विद्यापीठांतर्गत स्थापन करण्यात येत आहे. हे महाविद्यालय स्थापन करण्यासंदर्भात अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करण्यासाठी गठित केलेल्या समितीची आढावा बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या महाविद्यालयाचे काम आंतराष्ट्रीय दर्जाचे असावे या दृष्टीने कामाचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचना दिल्या.
वर्षा येथील समिती कक्षात या महाविद्यालयासाठी गठित केलेल्या समितीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रस्तावित महाविद्यालयाचे सादरीकरण केले. यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक डॉ.अभय वाघ, ज्येष्ठ गायिका तथा समिती सदस्य श्रीमती उषा मंगेशकर, सदस्य सचिव राजीव मिश्रा, समन्वयक मयुरेश पै आदी मान्यवर उपस्थित होते.
सादरीकरणात महाविद्यालयाची जागा निश्चिती, इमारत आराखडा, प्रवेश परिसर, सर्व अध्यापन सामग्रीसह सुसज्ज हवेशीर वर्गकक्ष, मुख्य सभागृह, वर्तुळाकार प्रेक्षकागृह, लघु सभागृह, ओपन थिएटर, प्रदर्शन आणि कलादालन, भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर संग्रहालय, परिषद सभागृह, ध्वनी मुद्रण कलागृह, संगीत कलागृह, जॅमिंग हॉल, वसतीगृह, ग्रंथालय, प्राध्यापक विश्रामगृह तथा अतिथी विश्रामगृह, शिक्षकवृंद, उपहारगृह सुविधा, दिव्यांग व असामान्य विद्यार्थ्यांसाठी उपाययोजना, संगीत महाविद्यालयात प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता, प्रायोजकत्वातून संगीत महाविद्यालयासाठी निधी उभारणे, करियरच्या संधी यासारख्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
0000
सिंबायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक शिक्षण विद्यापीठाला
राज्यपाल कोश्यारी यांची भेट
मुंबई, दि. 17 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी किवळे, पुणे येथील सिंबायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक शिक्षण विद्यापीठाला भेट दिली आणि विभाग प्रमुख व शिक्षकांशी संवाद साधला.
कौशल्य शिक्षण ही काळाची गरज असून युवकांना रोजगारक्षम, स्वयं-रोजगार निर्माते, व उद्यमशील बनविण्यासाठी राज्यातील पहिले कौशल्य विद्यापीठ असलेले सिंबायोसिस कौशल्य व व्यावसायिक शिक्षण विद्यापीठ अतिशय चांगले कार्य करीत असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. विद्यापीठाचे ध्येय्य प्राप्त करण्यासाठी सर्व अध्यापक मंडळींनी एकदिलाने योगदान दिले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
सिंबायोसिस विद्यापीठाचे कुलपती डॉ शांताराम मुजुमदार, प्र-कुलपती स्वाती मुजुमदार व कुलगुरु डॉ अश्विनी कुमार शर्मा यावेळी उपस्थित होते.
यावेळी राज्यपालांनी विद्यापीठाच्या रिटेल सेंटर, ब्युटी ॲण्ड वेलनेस सेंटर तसेच अभियांत्रिकी कौशल्य केंद्राला भेट दिली.
0000
Governor visits Symbiosis Skills and Professional University
Mumbai, 17 : Governor Bhagat Singh Koshyari visited the Symbiosis Skills and Professional University at Kiwale near Pune and interacted with deans and faculties of various departments on Tuesday (17th Aug).
Chancellor of Symbiosis University Dr. S. B. Mujumdar, Pro Chancellor Swati Mujumdar and Vice Chancellor of Skills University Ashwini Kumar Sharma were present.
The Governor visited the Retail Centre, Beauty and Wellness Centre and Engineering Skills Centre during the visit.
0000
पर्यटन विकासातून रोजगार निर्मिती,
अर्थव्यवस्थेला चालना मिळेल
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
· महाराष्ट्राचे पर्यटनवैभव जगासमोर आणण्यासाठी पर्यटन विभागाचा पुढाकार
· एमटीडीसीचे नवीन संकेतस्थळ, सिंहगड येथील नुतनीकरण झालेल्या पर्यटक निवासाचा तसेच गणपतीपुळे येथे बोट क्लबचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
· मेक माय ट्रीप, स्काय-हायसह विविध संस्थांसमवेत सामंजस्य करार
· सुलभ बुकींग सुविधा, साहसी पर्यटन तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला मिळणार चालना
मुंबई, दि. 17 : महाराष्ट्राला नैसर्गिक, ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक असे विविधांगी पर्यटनवैभव लाभले आहे. राज्यात जंगले, पुरातन गडकिल्ले, गुंफा, मंदिरे, समुद्रकिनारे, वन्यजीव असे पर्यटन वैविध्य असून हे जगाभरापर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यातून देशातील आणि जगभरातील पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होतील आणि त्याद्वारे राज्याचा पर्यटनविकास होऊन रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) विविध उपक्रमांचा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार-सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या प्राचार्य डॉ. अनिता मुदलीयार, मेक माय ट्रीपचे हरजित कुमार, स्कायहायचे रुद्र बंधू सोळंकी, हर्षिल कोरिआ आदी मान्यवर उपस्थित होते. परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, खासदार विनायक राऊत यांच्यासह पुणे आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
एमटीडीसीचे नवीन संकेतस्थळ, सिंहगड येथील नुतनीकरण झालेले
पर्यटक निवास आणि गणपतीपुळे येथे बोट क्लबचा शुभारंभ
एमटीडीसीने जलद आणि अधिक कार्यक्षम सेवा देण्यासाठी सुधारीत बुकींग इंजिन तसेच राज्यातील पर्यटनस्थळांच्या तपशीलवार माहितीसह नवीन संकेतस्थळ सुरु केले आहे. तसेच सिंहगड (जि. पुणे) येथील एमटीडीसीच्या पर्यटक निवासाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. गणपतीपुळे (जि. रत्नागिरी) येथे बोट क्लब सुरु करण्यात येत असून या तिन्ही उपक्रमांचा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते यावेळी शुभारंभ करण्यात आला.
मेक माय ट्रीप, स्काय-हायसह विविध संस्थांसमवेत सामंजस्य करार
एमटीडीसीच्या पर्यटक निवासांचे बुकींग अधिक सुलभ होणे आणि जगभरातील पर्यटकांसाठी ही बुकींग सुविधा उपलब्ध होण्यासाठी मेक माय ट्रीप आणि गो आय बीबो या नामांकित संकेतस्थळांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे एमटीडीसीची पर्यटक संकुले आता ही संकेतस्थळे वापरुन कोठुनही बूक करता येणार आहेत. महाराष्ट्रात स्काय डायव्हींग साहसी क्रीडा प्रकार सुरु करण्याच्या दृष्टीने स्काय-हायसोबत सामंजस्य करार करण्यात आला. तसेच एमटीडीसी कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्यासोबतही सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील आणि संबंधीत संस्थेच्या प्रतिनिधींनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
राज्यात पर्यटनाच्या अमोघ संधी
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, कोरोनामुळे सध्या पर्यटनावर बंधने असली तरी विविध धोरणे ठरविणे आणि पर्यटनस्थळाच्या पायाभुत सुविधा-सेवांमध्ये वाढ करण्याबरोबर राज्याच्या पर्यटन विकासासाठी पर्यटन विभाग घेत असलेले निर्णय कौतुकास्पद आहेत. आपल्याकडचे पर्यटन वैभव जगासमोर नेणे आणि त्यात नवनवीन पर्यटनस्थळांची, नवनवीन बाबींची भर टाकणे गरजेचे आहे. मुंबई हे पर्यटन वैविध्याने नटलेले शहर आहे. येथे समुद्रकिनारा आहे, वन्यजीवन आहे, प्राचीन मंदिरे-गुंफा आणि किल्ले आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारखे जंगल तर फ्लेमिंगो अभयारण्य देखील आहे. या सर्वांच्या सोबतीला आधुनिकतेची जोड आहे. आता मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय सुरु करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. आपले राज्यही अशाच पद्धतीने पर्यटन वैविध्याने नटले आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर आपण फक्त विठोबाचे दर्शन घेतो. पण हे मंदीर सुद्धा पाहण्यासारखे असून तिथल्या खांबांवर नक्षीकाम आहे, विविध पौराणिक प्रसंग त्यावर कोरण्यात आले आहेत. लोणार परिसरातील मंदीरेही अशाच पद्धतीची ऐतिहासिक आणि अप्रतिम आहेत. ॲमस्टरडॅमच्या टुलीप गार्डनच्या धर्तीवर आपल्याला सातारा जिल्ह्यातील कास पठारावर फुलांचे पर्यटन करता येईल, असे श्री. ठाकरे यांनी सांगितले.
सेवा-सुविधा उत्तम दर्जाच्या असाव्यात
एमटीडीसीने त्यांच्या पर्यटक निवासांच्या नूतनीकरणासाठी घेतलेल्या पुढाकाराचे मुख्यमंत्र्यांनी कौतूक केले. श्री.ठाकरे म्हणाले की, जगभरातील कोणताही पर्यटक जेव्हा बुकींग करेल तेव्हा त्याने एमटीडीसीच्या पर्यटक निवासाला प्राधान्य द्यायला हवे, अशा पद्धतीने चांगल्या दर्जाच्या सेवा-सुविधांची तिथे उपलब्धता करा. स्काय-हायसोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करारामुळे राज्यातील साहसी पर्यटनाला चालना मिळणार आहे. अशा सर्व माध्यमातून राज्यातील पर्यटनवैभव जगभरासमोर खुले करण्यासाठी यापुढील काळातही पर्यटन विभागाला सर्वतोपरी प्रोत्साहन देण्यात यईल, असे त्यांनी सांगितले.
पर्यटन विकासावर राज्य शासनाचे विशेष लक्ष : उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आज सुरु करण्यात आलेले सर्व उपक्रम राज्याच्या पर्यटनविकासाला मोठी चालना देणारे आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे तर महाराष्ट्र राज्य स्थापनेला 60 वर्षे झाली. देशाचा आणि महाराष्ट्राचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. हा इतिहास गौरवशाली आणि समृद्ध आहे. हा इतिहास योग्य पद्धतीने लोकांपर्यत गेला पाहिजे. त्यासाठी पर्यटनवाढीला चालना देण्याची गरज आहे. राज्याच्या पर्यटनवाढीसाठी आपण अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. पर्यटन विभागाला अधिकचा निधी देण्याची सरकारची तयारी आहे. कारण पर्यटन क्षेत्रात मोठी ताकद आहे. पर्यटकांच्या माध्यमातून देशाचा इतिहास जगभरात पोचतो. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतो. अर्थव्यस्थेला चालना मिळते. जगभरात अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. पर्यटनक्षेत्र सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र आहे, त्यामुळे राज्यातील पर्यटन विकासावर राज्य शासनाचे विशेष लक्ष आहे. त्याचाच एक भाग म्हणून पर्यटन दिनाचे औचित्य साधून राज्यातील आदरातिथ्य क्षेत्रातील घटकांबरोबर २ हजार ९०५ कोटी रुपयांचे सामंजस्य करार आपण केले. या सामंजस्य करारामुळे राज्यातील पर्यटनक्षेत्राला चालना मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.
पर्यटन साक्षरता हवी
एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमधील सेवा-सुविधांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा आणि स्वच्छतेवर अधिक भर देण्यात यावा. तसेच लोकांना पर्यटनसाक्षर करणे, पर्यटनस्थळी केरकचरा, प्लॅस्टीक न टाकणे, ऐतिहासिक वास्तुंवर काहीही न लिहीणे याबाबत पर्यटकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. याशिवाय एमटीडीसी आणि पर्यटन विभागाच्या वेबसाईटस् इंग्रजी आणि इतर परदेशी भाषांबरोबरच मराठीमध्येही उपलब्ध असाव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी केल्या.
राज्याला पर्यटनाचा समृद्ध वारसा - बाळासाहेब थोरात
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, एमटीडीसीच्या वेबसाईटसला एक व्यावसायीक अंग आहे. आता ही वेबसाईट अधिक दर्जेदार होत आहे. यामुळे राज्याच्या पर्यटन वैभवाची माहिती जगभरातील पर्यटकांसमोर प्रभावीरित्या पोहोचेल. कोकणामध्ये निसर्गाचा खजिना उपलब्ध आहे. अजिंठा-वेरुळ, घृष्णेश्वर, देवगिरीसारखी अनेक पर्यटनस्थळे देशातील आणि जगभरातील पर्यटकांची आकर्षणकेंद्रे आहेत. राज्यातील हा ऐतिहासिक आणि समृद्ध वारसा जगभरातील पर्यटकांसमोर नेण्यासाठी पर्यटन विभागाने घेतलेला पुढाकार आणि त्यासाठी सुरु करण्यात आलेले विविध उपक्रम कौतुकास्पद आहेत, असे त्यांनी सांगितले.
कोकण पर्यटनाला नवीन आयाम: उदय सामंत
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, गणपतीपुळे येथील बोट क्लब तसेच स्काय-हायसोबत करण्यात आलेल्या करारासारख्या उपक्रमांमुळे कोकणातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, साहसी पर्यटनासारखा नवीन उपक्रम कोकणात यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रासारखी पर्यटन समृद्धी इतरत्र कुठेही नाही - आदित्य ठाकरे
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून पर्यटन बंद असले तरी या क्षेत्राला चालना देण्याच्या अनुषंगाने विविध धोरणे आणि निर्णय या काळात घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या पर्यटनाच्या संधी आहेत, यासारखी पर्यटन समृद्धी अन्यत्र कुठे आढळून येत नाही. कृषी पर्यटन धोरण, बीच शॅक धोरण, कॅराव्हॅन पर्यटन धोरण, साहसी पर्यटन धोरण मंजुर करण्यात आले आहे. आदरातिथ्य क्षेत्राला चालना देण्यासाठी याला उद्योगाचा दर्जा देण्याबरोबरच यासाठी परवान्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात हॉटेल सुरु करण्यासाठी आता अनेकांकडून विचारणा होत आहे. राजशिष्टाचार विभागामार्फत नुकतीच मुंबईतील विविध देशांचे महावाणिज्यदूतांसमवेत बैठक झाली, त्यांनीही महाराष्ट्राचा पर्यटनवारसा समृद्ध असल्याचे सांगितले. आता सुरु करण्यात आलेल्या विविध उपक्रमे आणि सामंजस्य करारातून या क्षेत्राला अधिक व्यापक करण्यासाठी पर्यटन विभागाने पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
सुंदर कोकण जगासमोर आणूया - कु. आदिती तटकरे
पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्यासह कोकणाच्या पर्यटन विकासासाठी शासनाने मोठा पुढाकार घेतला आहे. यासाठी आजही काही उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. आपण कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याबाबत नेहमी बोलत असतो. पण कोकणाचा पर्यटनासह इतर सर्व क्षेत्रात सर्वांगिण विकास करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे कॅलिफोर्नियाने कोकणासारखे होण्याबाबत बोलले पाहिजे, अशा पद्धतीने कोकणाचा विकास करु. सध्या कोरोनामुळे ठप्प झालेल्या पर्यटन क्षेत्राला आज सुरु करण्यात आलेल्या उपक्रमांमुळे चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह यांनी प्रास्ताविक करुन पर्यटन विभागाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले, तसेच एमटीडीसीमार्फत सुरु करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
००००
पर्यटन विकासातून रोजगार निर्मिती,
अर्थव्यवस्थेला चालना मिळेल
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
· महाराष्ट्राचे पर्यटनवैभव जगासमोर आणण्यासाठी पर्यटन विभागाचा पुढाकार
· एमटीडीसीचे नवीन संकेतस्थळ, सिंहगड येथील नुतनीकरण झालेल्या पर्यटक निवासाचा तसेच गणपतीपुळे येथे बोट क्लबचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
· मेक माय ट्रीप, स्काय-हायसह विविध संस्थांसमवेत सामंजस्य करार
· सुलभ बुकींग सुविधा, साहसी पर्यटन तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला मिळणार चालना
मुंबई, दि. 17 : महाराष्ट्राला नैसर्गिक, ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक असे विविधांगी पर्यटनवैभव लाभले आहे. राज्यात जंगले, पुरातन गडकिल्ले, गुंफा, मंदिरे, समुद्रकिनारे, वन्यजीव असे पर्यटन वैविध्य असून हे जगाभरापर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यातून देशातील आणि जगभरातील पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होतील आणि त्याद्वारे राज्याचा पर्यटनविकास होऊन रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) विविध उपक्रमांचा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार-सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या प्राचार्य डॉ. अनिता मुदलीयार, मेक माय ट्रीपचे हरजित कुमार, स्कायहायचे रुद्र बंधू सोळंकी, हर्षिल कोरिआ आदी मान्यवर उपस्थित होते. परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, खासदार विनायक राऊत यांच्यासह पुणे आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
एमटीडीसीचे नवीन संकेतस्थळ, सिंहगड येथील नुतनीकरण झालेले
पर्यटक निवास आणि गणपतीपुळे येथे बोट क्लबचा शुभारंभ
पर्यटन विकासातून रोजगार निर्मिती,
अर्थव्यवस्थेला चालना मिळेल
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
· महाराष्ट्राचे पर्यटनवैभव जगासमोर आणण्यासाठी पर्यटन विभागाचा पुढाकार
· एमटीडीसीचे नवीन संकेतस्थळ, सिंहगड येथील नुतनीकरण झालेल्या पर्यटक निवासाचा तसेच गणपतीपुळे येथे बोट क्लबचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
· मेक माय ट्रीप, स्काय-हायसह विविध संस्थांसमवेत सामंजस्य करार
· सुलभ बुकींग सुविधा, साहसी पर्यटन तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला मिळणार चालना
मुंबई, दि. 17 : महाराष्ट्राला नैसर्गिक, ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक असे विविधांगी पर्यटनवैभव लाभले आहे. राज्यात जंगले, पुरातन गडकिल्ले, गुंफा, मंदिरे, समुद्रकिनारे, वन्यजीव असे पर्यटन वैविध्य असून हे जगाभरापर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यातून देशातील आणि जगभरातील पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होतील आणि त्याद्वारे राज्याचा पर्यटनविकास होऊन रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) विविध उपक्रमांचा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार-सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या प्राचार्य डॉ. अनिता मुदलीयार, मेक माय ट्रीपचे हरजित कुमार, स्कायहायचे रुद्र बंधू सोळंकी, हर्षिल कोरिआ आदी मान्यवर उपस्थित होते. परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, खासदार विनायक राऊत यांच्यासह पुणे आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
एमटीडीसीचे नवीन संकेतस्थळ, सिंहगड येथील नुतनीकरण झालेले
पर्यटक निवास आणि गणपतीपुळे येथे बोट क्लबचा शुभारंभ
राज्यातील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 6 वी ते 9 वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
मुंबई, दि. 17 : राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यान्वित असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या 39 एकलव्य मॉडेल रेसीडेंशियल स्कूलमध्ये सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6 वी ते 9 वी च्या वर्गात अनुसूचित/आदिम जमातीच्या विदयार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता https://admission.emrsmaharashtra.com ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांचे पालक / शिक्षक /मुख्याध्यापक यांनी या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेले आवेदनपत्र ऑनलाईन भरून प्रवेश घेण्याचे आवाहन महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटीच्या सदस्य सचिवांनी केले आहे.
आदिवासी विकास आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटीच्या वतीने राज्यातील 39 एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्व एकलव्य निवासी शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE),नवी दिल्ली यांचेशी संलग्न असून या शाळांमध्ये इ.6 वी ते 12 वी ( विज्ञान ) पर्यंतचे वर्ग नैसर्गिक वाढीने सुरू करण्यात येतात. एकलव्य रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रतिवर्षी इ.6 वी च्या वर्गात एकूण 60 विद्यार्थ्यांना (30 मुले + 30 मुली ) नवीन प्रवेश देण्यात येतो,तसेच इ.7 वी ते 9 वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागांचा अनुशेष भरून काढण्यात येतो.
या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्याचे मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करावयाचे आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी अर्जदार विद्यार्थ्याचा सरल पोर्टलवरील Student Id माहीत असणे आवश्यक आहे. राज्यातील विशेषत: शासकीय व अनुदानित आश्रमशाळेसह, जिल्हा परिषद,नगर पालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील अनुसूचित / आदिम जमातीचे विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.
शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता एकलव्य निवासी शाळेत इ.6 वी मध्ये प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे इ.5 वी चे गुणपत्रक ऑनलाईन आवेदन पत्रासोबत अपलोड करावे लागेल. राज्यातील कोणत्याही व्यवस्थापनाच्या शाळेत शिकत असलेल्या अनुसूचित /आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परिक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार, पालकांचा मूळ राहण्याचा पत्ता विचारात घेऊन गुणानुक्रमे नजिकच्या एकलव्य शाळेत प्रवेश देण्यात येईल.
राज्यातील अनुसूचित/ आदिम जमातीच्या ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रू. 6 लक्ष पेक्षा कमी आहे, अशा पालकांच्या पाल्यांना प्रवेशासाठी ऑनलाईन आवेदन पत्र भरता येईल. प्रत्येक एकलव्य निवासी शाळेत इ.6 वी च्या प्रवेशामध्ये अनुसूचित जमातीच्या दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 3% जागा तसेच आदिम जमातीच्या विद्यार्थ्यासाठी इ.6 वी च्या प्रवेशामध्ये एकूण 5 जागा आरक्षित राहतील.
प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांचे पालक,शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी प्रवेशासंदर्भातील अधिक माहितीसाठी नजिकच्या प्रकल्प कार्यालयास संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संत गाडगेबाबांच्या विचारसरणीवर काम करीत राहणार
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
· प्रबोधनकार ठाकरे लिखित 'श्री गाडगे बाबा' जीवनचरित्राच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन
· संत गाडगेबाबा यांचे विचार जगभर पोहचविण्याची गरज
मुंबई, दि. 17 : श्री गाडगेबाबा महाराजांच्या विचारसरणीनुसार आमचे सरकार काम करीत असून, त्यांच्या जीवनचरित्राचे विविध भाषांमध्ये भाषांतर करून त्यांचे कार्य जगभरात पोहचवले पाहिजे, त्यासाठी राज्यशासन आवश्यक ती सर्व मदत करेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
प्रबोधनकार ठाकरे लिखित 'श्री गाडगे बाबा' जीवनचरित्राच्या संत गाडगे महाराज मिशनच्यावतीने प्रकाशित दहाव्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याहस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे पार झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास महिला व बालविकास मंत्री तथा गाडगे महाराज मिशनच्या अध्यक्षा ॲड. यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार उल्हास पवार, इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार, मिशनचे चेअरमन मधुसूदन मोहिते- पाटील आदी उपस्थित होते.
संत गाडगेबाबांनी अंधश्रद्धेवर आघात करून खरा धर्म शिकवला, असे सांगून मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे म्हणाले, धर्म जगणे आणि धर्म जपणे यातील अंतर आपल्याला समजले पाहिजे. धर्म जगायचा असतो हे बाबांनी कृतीतून दाखवून दिले. भुकेल्याना अन्न, तहानलेल्याना पाणी, गरीब मुलामुलींना शिक्षण आदी दशसूत्रीतून हाच खरा धर्म आहे हे त्यांनी असंख्य व्याख्यानांतून जनतेपर्यंत पोहोचवले. त्यांनी कीर्तनातून लोकशिक्षण घडवले.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, आजोबा प्रबोधनकारांनी लिहिलेल्या आणि वडील बाळासाहेब ठाकरे यांनी मुखपृष्ठ चितारलेल्या या जीवनचरित्राचे प्रकाशन मुख्यमंत्री म्हणून करताना मला मनापासून आनंद होत आहे. प्रबोधनकार आणि संत गाडगेबाबा यांच्यात एक अनोखे नाते होते. गाडगेबाबांनी वक्तृत्वातून समाजातील अनिष्ठ प्रथांविरुद्ध लोकांचे प्रबोधन केले. त्यांनी केवळ कीर्तने केली नाहीत तर शाळा उभारल्या, अन्नछत्रे सुरू केली, धर्मशाळा बांधल्या. गाडगेबाबांचे विचार पुढे नेण्यासाठी मिशनने काम करत राहावे, महाराष्ट्र शासन मिशनच्या पाठीशी खंबीर उभे राहील, अशी ग्वाही श्री. ठाकरे यांनी यावेळी दिली.
महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, संत गाडगेबाबा हे कृतीमधील आणि विचारामधील स्वच्छता जोपासणारे संत होते. गाडगेबाबा, प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा देशामध्ये पोहोचवायचा असेल तर त्यांचे पुस्तकरूपी जीवनचरित्र प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था व्हायला हवी. धर्म, जातीभेदांमध्ये वाढ करणाऱ्या विभाजनवादी शक्तींबाबत जनजागृती करायची असेल तर हे पुस्तक उपयुक्त ठरेल. गाडगेबाबांची 2026 मध्ये 150 वी जयंती असून त्यानिमित्ताने मिशनमार्फत विविध उपक्रम हाती घेतले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. मंजुश्री पवार आणि श्री. उल्हास पवार यांनी मनोगतामध्ये प्रबोधनकार आणि संत गाडगेबाबा यांच्यातील विचार आणि कृतीतील साम्याविषयी भाष्य केले. जात-पात, धर्म यातील फोलपणा गाडगेबाबांनी आपल्या वाणीतून लोकांना दाखवून दिला. त्यासाठी लोकांच्या बोलीभाषेतून संवाद साधला. प्रबोधनकार, गाडगेबाबांचे विचार केवळ इतिहासाचे भाग नाही तर वर्तमानाला दिशा देणारे आहेत. वैयक्तिक हितसंवर्धनाशिवाय परिवर्तन होऊ शकते हे गाडगेबाबा आणि प्रबोधनकार यांनी सिद्ध केले, असेही सांगितले.
यावेळी मिशनच्यावतीने मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांना संत गाडगेबाबा यांची प्रतिमा आणि संदेश असलेले सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. तसेच डॉ. मंजुश्री पवार यांच्याकडून राजर्षी शाहूमहाराज पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ भेट देण्यात आले.
फ्लिपकार्टच्या राज्यातील प्रकल्पविस्तारामुळे
रोजगार, गुंतवणूक वाढेल
- उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई, दि. 17 : ई कॉमर्स क्षेत्रातील फ्लिपकार्ट कंपनीने आपल्या सेवाप्रकल्पांचा विस्तार केल्यामुळे राज्याच्या औद्योगिक प्रगतीस ते पूरकच ठरेल, याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल व गुंतवणुकीतही वाढ होईल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे व्यक्त केला.
कोविडमुळे मागील दीड वर्षांपासून अनेक उद्योगांचे विस्तार रखडलेले असताना फ्लिपकार्ट कंपनीने या संकटावर मात करत आपल्या प्रकल्पाचा विस्तार केला. ही बाब राज्याच्या प्रगतीसाठी महत्वाची आहे. राज्याला उद्योगक्षेत्रात पुढे नेण्यासाठी फ्लिपकार्टने उचलेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. याद्वारे गुंतवणुकीचा ओघ वाढेल, शिवाय बेरोजगार तरुणांच्या हाताला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, असे श्री. देसाई म्हणाले.
भिवंडी व नागपूर येथे प्रकल्प विस्तार करण्यात आला आहे. ग्राहकांची मागणी वाढू लागल्याने व वेळेत वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी हा प्रकल्पविस्तार करण्यात आला आहे. भिवंडी येथे सुमारे सात लाख चौरस फूट जागेवर हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. याद्वारे चार हजार जणांना रोजगारांची संधी मिळणार आहे. दुसरा प्रकल्प नागपूर येथे होणार आहे.
राज्यातील स्थानिक व्यापारी, विक्रेते व लघु, मध्यम उद्योगांमधून तयार होणाऱ्या वस्तुंना यामुळे बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास फ्लिपकार्टचे वरिष्ठ अधिकारी रजनीश कुमार यांनी व्यक्त केला.
००००
Subscribe to:
Posts (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...