Tuesday, 17 August 2021

 वन्दे मातरम्

सुजलां सुफलाम्

मलयजशीतलाम्

शस्यश्यामलाम्

मातरम्।


शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्

फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्

सुहासिनीं सुमधुर भाषिणीम्

सुखदां वरदां मातरम्॥ १॥ 


सप्त-कोटि-कण्ठ-कल-कल-निनाद-कराले

द्विसप्त-कोटि-भुजैर्धृत-खरकरवाले,

अबला केन मा एत बले।

बहुबलधारिणीं 

नमामि तारिणीं

रिपुदलवारिणीं 

मातरम्॥ २॥


तुमि विद्या, तुमि धर्म

तुमि हृदि, तुमि मर्म

त्वम् हि प्राणा: शरीरे

बाहुते तुमि मा शक्ति,

हृदये तुमि मा भक्ति,

तोमारई प्रतिमा गडी मन्दिरे-मन्दिरे॥ ३॥


त्वम् हि दुर्गा दशप्रहरणधारिणी

कमला कमलदलविहारिणी

वाणी विद्यादायिनी,

नमामि त्वाम्

नमामि कमलाम्

अमलां अतुलाम्

सुजलां सुफलाम् 

मातरम्॥४॥


वन्दे मातरम्

श्यामलाम् सरलाम्

सुस्मिताम् भूषिताम्

धरणीं भरणीं 

मातरम्॥ ५॥

 [8/17, 6:15 AM] Gym Bhosalee: पतीचे डोके दाबून देत असताना, पत्नीने हळूवारपणे विचारले 

*"लग्नापूर्वी तुमचे डोके कोण दाबून देत होतं ?"*


 पतीने साधे हृदयस्पर्शी उत्तर दिले . . .

*"लग्नापूर्वी डोकेदुखी नव्हती . . ."*

🤪🤣😂😋

[8/17, 6:15 AM] Gym Bhosalee: मुलीकडचेः *मुलगा दारु पितो का ?*


मुलाकडचेः  *हो,रोज पितो.*


मुलीकडचेः *याचा अर्थ तो चांगलं कमावतो* 


हे *स्थळ आम्हाला पसंत* आहे.


*रिश्ता वही सोच नयी.* 😂😂

 जॉनी लिव्हर

अभिनेता

१४ ऑगस्ट १९५६


जॉनी लिव्हर यांचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशचे. त्यांचे वडील प्रकाशराव जानुमाला आणि आई करुणाम्मा हे मुंबईतील माटुंग्याच्या लेबर कॅम्प-धारावीमध्ये एका चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात राहायचे. जॉनीचे वडील गिरणी कामगार होते. वडिलांचे मोठे भाऊ व त्यांचे कुटुंब अशी एकूण आठावर माणसे एका घरात राहायची. त्यांच्या परिसरात दाक्षिणात्यबहुल वातावरण होते. पण मराठी माणसेही भरपूर होती. सतत काही ना काही चालायचे. सण-वार असायचे, पूजा असायच्या, बारशी असायची व लग्नेही असायची. त्यामुळे कुठल्या न कुठल्या निमित्ताने सदैव लाऊडस्पीकरवर दाक्षिणात्य भाषांतील, हिंदी, मराठीतील गाणी चालू असायची तो काळ रेकॉर्ड डान्सचा होता. ध्वनिमुद्र्का लावून गाण्यावर मुले-मुली नाचायची. रात्री कार्यक्रम असायचे. कधी कधी रात्री रस्त्यावर मधोमध पडदा उभा करून चित्रपट दाखवला जाई व जॉनी लिव्हर आणि मंडळी एकत्र बसून तो पाहात असत. या वातावरणाचा जॉनीवर नकळत परिणाम घडला. 


असे सारे ठीक सुरू असताना वडिलांचे दारूचे व्यसन वाढले व जॉनीच्या नशिबाचे चक्र फिरले. त्यांचे कुटुंब किंग्ज सर्कलच्या झोपडपट्टीत राहायला आले. जॉनी वडाळ्याच्या आंध्र एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमधे तेलुगू माध्यमाच्या शाळेत शिकत होते. सात रुपये फी होती तीही देणे परवडत नव्हते. महिनाअखेरीस बाकावर उभे राहायचे किंवा वर्गाबाहेर जायचे. कधी कधी वेताच्या छड्या मिळायच्या. त्या वयातच जॉनी लिव्हर यांना जबाबदारीची जाणीव झाली होती. ते नकला करायचे. रेकॉर्ड डान्स करायचे. पैसे मिळायचे, ते घरी आईला द्यायचे. त्यामुळे अर्थात रात्री घरी उशिरा पोचायचे. दुसऱ्या दिवशी शाळेत जायला उशीर होई. मग शिक्षक ओरडत. मग ते मित्र-मैत्रिणींना, शिक्षकांना नाचून वगैरे दाखवून खूश ठेवायचा प्रयत्‍न करीत. वर्गात अभ्यासात यथातथाच होते. पण मनात आले तर काहीही करायचे. नेहमी पहिला येणाऱ्या मुलाने रुबाब दाखवला, तेव्हा जॉनीने त्याला पुढच्या सहामाहीत भरपूर अभ्यास करून वर्गात दुसरा येऊन दाखवले. 


फीचे पैसे नसल्यानं जॉनीला अपमानास्पदरीत्या सातव्या वर्गात असतानाच शाळा सोडावी लागली. मग जगण्यासाठी त्याने काहीही केले. देशी दारूच्या गुत्त्यात पोऱ्या म्हणून काम केले. फडकी मारली, ग्लास धुतले, रस्त्यात उभं राहून बॉलपेनं, गोळ्या विकल्या. रोज दोन-तीन रुपये सुटायचे. त्यातल्या चौदा आण्यांचे डाळ-तांदूळ, दोन आण्यांचे कांदे-बटाटे, मसाला घरी आणायचो, तेव्हाच घरी जेवण बनायचे पुढे जॉनी बसस्टँडवर फेरीवाला म्हणून करू लागला. तो तेथे सिनेस्टार्सची नक्कल करत करत व्यवसाय करीत असे. वयाच्या सतराव्या वर्षी मी गल्लीतल्या गणपती उत्सवात पहिली जाहीर मिमिक्री केली. लोकांना ती खूप आवडली. तेव्हा तीस रुपये मिळाले. नंतर १८व्या वर्षी हिंदुस्थान लिव्हर या कंपनीत कामाला लागला. सातवी नापास मुलाला जे काम मिळणार तेच मिळाले- स्वीपरचे. झाडू मारणे फरशा पुसणे वगैरे कामे असायची. त्यात एक काम होते रसायनांचे ड्रम उघडण्याचे व ते साफ करून ठेवण्याचे. पहिल्याच वेळी जॉनीने ड्रम उघडला व तो पुसला, त्यात डोके घातलं व उगाच आवाज काढला. तो घुमला. त्याला गंमत वाटली. पुन्हा दुसरा आवाज काढला. नंतर अनेक आवाज काढले. रोजच तसे केल्यावर जॉनीला जाणवले की त्याच्या नकलांच्या आवाजावर चांगला परिणाम होतोय. वेगवेगळे आवाज काढायचो. एका कामगाराने तक्रार केली. मग त्याच्या सुपरवायझरने त्याला जाब विचारण्यासाठी बोलावले. त्याला जॉनीने तर्‍हे-तर्‍हेच्या नकला करून दाखवल्या. तर तो खूशच झाला आणि त्याने जॉनीला गेट्टुगेदरमध्ये संधी दिली. रंगभवनच्या त्याया संमेलनात शत्रुघ्न सिन्हा, राजेश खन्ना, अशोककुमार आदींची मिमिक्री करून जॉनीने सारे सभागृह दणाणून सोडले. एक हास्याभिनय केला. त्यानंतर जॉनी क्षणात लोकप्रिय झाला. मग त्याला कंपनीत जरा कमी कष्टाचे काम मिळू लागले 

दुपारच्या वेळात नकला करून जॉनी मित्रांना हसवायचे. एकदा तो कंपनीच्या आमच्या साहेब लोकांची नक्कल करत होते व कामगारमित्र तो साहेब कोण ते ओळखत होते. युनियनच्या लीडर, सुरेश भोसलेंनी ते पाहिले व ते म्हणाले, ‘अरे याने तर लिव्हरचा बॅण्ड वाजवला, आजपासून याला जॉनी नाही, जॉनी लिव्हर म्हणायचे.’ त्या दिवशी संध्याकाळच्या कार्यक्रमात जॉनीने स्वतःची ओळख जॉनी लीव्हर अशी करून दिली व तेव्हापासून तेच त्यांचे व्यावसायिक नाव झाले. 


यानंतर त्याने ऑर्केस्ट्रामध्ये काम केले. गाण्यांच्या मध्यंतरादरम्यान तो हास्याभिनय करीत असे. बाहेर कार्यक्रमांचे पैसे बऱ्यापैकी मिळू लागले म्हणून सात वर्षांनी जॉनीने नोकरी सोडली. त्यांच्या कार्यक्रमाची पहिली व्हिडीओ कॅसेट आली होती. नंतर तो कल्याणजी आनंदजी यांचे समवेत जगभर फिरला. 


अमिताभ बच्चन यांच्याबरोबर जॉनीने पहिल्यांदा अमेरिका पाहिली. एकदा, १९८० मध्ये कल्याणजीभाईंच्या येथे कॅरम खेळत अस्ताना. त्यांच्याकडे एक दाक्षिणात्य निर्माता आला. त्याला हिंदी चित्रपटासाठी एक मिमिक्री कलाकार हवा होता. कल्याणजीभाईंनी जॉनीकडे बोट दाखवलं. काही कळायच्या आत, जॉनीच्या हातात मद्रासचे विमानाचे तिकीट आले. मग रिहर्सलच्या वेळी त्याने दिग्दर्शकाला साधीशी मिमिक्री करून दाखवली. तर दिग्दर्शक ‘व्हेरी गुड’ म्हणाले. ‘आता दाखवलं ते व्हेरी गुड काय. मग माझ्याकडचं चांगलं दाखवतोच,’ असा विचार करून जॉनीने दुसरी नक्कल दाखवली. ते खूप खूष झाले. 


जॉनीची चित्रपटात एंट्री झाली, पण अनेक वर्षे ते मी मिमिक्रीच करायचे. त्यांना अभिनयाची संधीच मिळत नव्हती. ती एन. चंद्रांनी ‘तेजाब’मधून दिली. ती भूमिका कशी करायची, तिचे विविध पैलू त्यांनी समजावून सांगितले. त्यात जॉनीने त्याचे रंग भरले. त्यानंतर लोकांनी त्याला अ‍ॅक्टिंग कलाकार म्हणून स्वीकारले. पुढे त्याने 'दर्द का रिश्ता' या चित्रपटात काम केले. त्यानंतर मात्र त्याला अनेक चित्रपटात कामे मिळाली. या चित्रपटांची संख्या ४००हून खूप अधिक आहे. इ.स. १९९६-९७ पर्यंत जॉनी लिव्हर यांनी खूप कॉमेडी शोज केले. आणि मग १७ वर्षे विश्रांती घेऊन परत सुरू केले. मध्यंतरीच्या काळात अनेक पुस्तके वाचली, विनोदी आणि विनोदावरची पुस्तके वाचले, अनेक कलाकारांचे शोज पाहिले, टी.व्ही.वर अनेक चित्रपट पाहिले आणि मग परत चित्रपटांतही पुनरागमन केले. जॉनी यांनी बऱ्याच मराठी चित्रपटांमध्येही काम केलं. ‌‘भुताचा भाऊ’, ‘चंबू गबाळे’, ‘घायाळ’, ‘खतरनाक’ हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट.

Monday, 16 August 2021

 *नागपंचमीचा संबंध “नाग” या सरपटणा-या सापाशी (सर्प) नसून भारतात नाग हे “टोटेम” असणारे पाच पराक्रमी नाग-राजे•••* 


१• अनंत (शेष) नाग 

२• नागराजा वासुकी

३• नागराजा तक्षक

४• नागराजा कर्कोटक आणि 

५• नागराजा ऐरावत


ह्या पाच नागराजाशी संबधित आहे. ह्या पाच ही नाग-राजांचे स्वतंत्र गणतांत्रिक (republican) स्वरुपाची राज्ये होती. 


यामध्ये नागराजा अनंत हा सर्वात मोठा. जम्मू-काश्मीर मधील *अनंतनाग* हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते. 


त्यानंतर दुसरा नागराजा वासुकी नागराजा हा *कैलास मानसरोवरा पासून उत्तर प्रदेश क्षेत्राचा* प्रमुख होता.


तिसरा नागराजा तक्षक यानेच जगप्रसिद्ध *तक्षशिला* विश्वविद्यापीठ स्थापन केले. येथेच प्लेटो, अँरीस्टॉटल सारखे तत्वज्ञ शिकून गेलेत.


चवथा नागराजा कर्कोटकाचे *रावी नदीच्या शेजारील प्रदेशात* राज्य होते. 


पाचवा नागराजा ऐरावत (पिंगाला) भंडारा प्रांत आजही *पिन्गालाई* एरीया म्हणून ओळखला जातो.


ह्या पाच ही नागराजांच्या गणराज्याच्या सीमा ऐकमेकांच्या राज्याला लागून होत्या. पाच नागराजे मृत्यू पावल्यानंतर, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नागवंशीय लोक "नागराजे स्मृति अभिवादन" "नागपंचमी" म्हणून दरवर्षी साजरा करीत असत.


वैदिक ब्राम्हणी यज्ञवंशियांच्या लेखणीने नागराजाचे रुपांतर सरपटणाऱ्या सापात केले. श्रावण महिन्याच्या महतीतून नागपंचमीला लागणारा अनिवार्य 'नाग नरसोबा'चा कागद विक्रीस आला. हळुहळू हा प्रयोग यशस्वी झाला तशा लहानमोठ्या पोथ्या छापील आणि घाउक स्वरुपात येऊ लागल्या. आर्थिक परिस्थीतीमुळे गरिब बहुजन वर्ग ह्या कागदी नाग नरसोबा ट्रेंडकडे आकर्षीत झाला कारण त्यांच्यातून पुण्य मिळते हे बहुजनांच्या मनमेंदू मध्ये बिंबविण्यात वैदिक ब्राह्मण यशस्वी झाले त्याचाच परिणाम म्हणून 'नाग नरसोबा' आणि काही पोथ्या प्रसिद्ध झाल्या आणि नाग ही सापांची पंचमी झाली व नागलोकांची पंचमी लुप्त झाली. आज नागाला दुध पाजणे, त्याची पूजा करणे एवढाच नागपंचमीचा अर्थ उरला. तरीपण बहुजन समाज आजही घराच्या *भिंतीवर पाच नाग* काढणे विसरलेला नाही. *हे पाच नाग म्हणजेच आपले पाच नागराजे होत*.

 FROM :- MR. RAJENDRA NAIK


खासकरून सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी


माझ्या अमेरिकन मित्राच्या मुलाचा संदेश ज्याचा मुलगा स्वत: डॉक्टर आहे


 🙏

 वयाच्या 50 व्या वर्षानंतर

 आपण अनुभवू शकतो

 अनेक प्रकारचे आजार.🤔



 एक दिवस, माझा मुलाने मला सांगितले

 की त्याच्या एका डॉक्टर मित्राने

 त्याला जिभेचा एक व्यायाम शिकवला आहे.


 हा जिभेचा व्यायाम अत्यंत प्रभावी आहे तसेच या व्यायामाचे इतरही फायदे आहेत, जसे...


 * 1 * शरीराचे वजन संतुलित ठेवणे

 * 2 * रक्तदाब संतुलित ठेवणे

 * 3 * मेंदूत रक्त गोठण्याची शक्यता कमी करणे

 * 4 * दमा कमी करणे

 * 5 * जवळची दृष्टी चांगली करणे

 * 6 * कान गुंजने कमी करणे

 * 7 * घसा कमी खराब होणे  

 * 8 * खांदा / मान यांचा संसर्ग कमी होणे

 * 9 *  झोप चांगली लागणे


 व्यायाम अगदी सोपा आणि करण्यास सुलभ आणि सोप्पा आहे....


दररोज सकाळी, खाली दिल्या प्रमाणे व्यायाम करावा:

 

* आपली जीभ बाहेर काढा आणि 10 वेळा डावीकडे आणि उजवीकडे हलवा *


 मी दररोज हा व्यायाम करण्यास प्रारंभ केल्यापासून, माझ्या स्मरणशक्तीमधे सुधारणा झाली.


माझे डोके हलके आणि मला ताजेतवाने वाटायला लागले आणि इतर सुधारणाही जाणवायला लागल्या जसे की


    1 जवळचे नीट दिसायला लागले

    २ शरीराचे संतुलन राहायला लागले

    3. तब्येत व्यवस्थित राहणे

    4. चांगले पचन

    5. सर्दी खोकला कमी होणे


 मी अधिक सामर्थ्यवान आणि चपळ झालो.


 टिप


जिभेच्या व्यायामामुळे अल्झायमर नियंत्रित आणि प्रतिबंधित होण्यास मदत होते.


वैद्यकीय संशोधनात असे आढळले आहे की जिभेचा मोठ्या मेंदूशी संबंध आहे. जेव्हा आपण वृद्ध होतो आणि प्रतिकार शक्ती कमी होते, तेव्हा प्रथम चिन्ह दिसून येते की आपली जीभ ताठर होते आणि बर्‍याचदा आपण जीभ चावतो.


जिभेचा वारंवार व्यायाम मेंदूला उत्तेजित करेल,

आपले विचार संकुचित होण्यापासून कमी करण्यात आणि अशा प्रकारे एक स्वस्थ शरीर मिळविण्यात मदत करेल.


👱‍♂👱‍♂👱‍♂👨‍🔬वृद्ध मित्रानो 👱‍♂👱‍♂👱‍♂👨‍🔬🙏

"हा संदेश प्राप्त करणार्‍या प्रत्येक व्यक्तीस हे दहा लोकांकडे पाठविण्यासाठी प्रोत्साहित करतो , किमान एक जीव अल्झायमर होण्यापासून वाचेल ... मी माझा वाटा उचलला आहे, आशा आहे की आपण सुद्धा आपला वाटा उचलून इतरांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यासाठी मदत करू शकाल. धन्यवाद!🙏🙏

 *एका दर्दी मित्राची टिप्पणी,,,* 


*प्रत्यक्ष गांधीजींच्या सहवासात राहून देखील नेहरूंची दारू आणि सिगारेट सुटली नाही…*


*मग गांधी  जयंती दिवशी 'ड्राय डे' ठेवून सामान्य जनतेला वेठीस धरण्यात काय पॉइंट आहे?*


😂🥃😂🥃🤣

 *नागपंचमीचा संबंध “नाग” या सरपटणा-या सापाशी (सर्प) नसून भारतात नाग हे “टोटेम” असणारे पाच पराक्रमी नाग-राजे•••* 


१• अनंत (शेष) नाग 

२• नागराजा वासुकी

३• नागराजा तक्षक

४• नागराजा कर्कोटक आणि 

५• नागराजा ऐरावत


ह्या पाच नागराजाशी संबधित आहे. ह्या पाच ही नाग-राजांचे स्वतंत्र गणतांत्रिक (republican) स्वरुपाची राज्ये होती. 


यामध्ये नागराजा अनंत हा सर्वात मोठा. जम्मू-काश्मीर मधील *अनंतनाग* हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते. 


त्यानंतर दुसरा नागराजा वासुकी नागराजा हा *कैलास मानसरोवरा पासून उत्तर प्रदेश क्षेत्राचा* प्रमुख होता.


तिसरा नागराजा तक्षक यानेच जगप्रसिद्ध *तक्षशिला* विश्वविद्यापीठ स्थापन केले. येथेच प्लेटो, अँरीस्टॉटल सारखे तत्वज्ञ शिकून गेलेत.


चवथा नागराजा कर्कोटकाचे *रावी नदीच्या शेजारील प्रदेशात* राज्य होते. 


पाचवा नागराजा ऐरावत (पिंगाला) भंडारा प्रांत आजही *पिन्गालाई* एरीया म्हणून ओळखला जातो.


ह्या पाच ही नागराजांच्या गणराज्याच्या सीमा ऐकमेकांच्या राज्याला लागून होत्या. पाच नागराजे मृत्यू पावल्यानंतर, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नागवंशीय लोक "नागराजे स्मृति अभिवादन" "नागपंचमी" म्हणून दरवर्षी साजरा करीत असत.


वैदिक ब्राम्हणी यज्ञवंशियांच्या लेखणीने नागराजाचे रुपांतर सरपटणाऱ्या सापात केले. श्रावण महिन्याच्या महतीतून नागपंचमीला लागणारा अनिवार्य 'नाग नरसोबा'चा कागद विक्रीस आला. हळुहळू हा प्रयोग यशस्वी झाला तशा लहानमोठ्या पोथ्या छापील आणि घाउक स्वरुपात येऊ लागल्या. आर्थिक परिस्थीतीमुळे गरिब बहुजन वर्ग ह्या कागदी नाग नरसोबा ट्रेंडकडे आकर्षीत झाला कारण त्यांच्यातून पुण्य मिळते हे बहुजनांच्या मनमेंदू मध्ये बिंबविण्यात वैदिक ब्राह्मण यशस्वी झाले त्याचाच परिणाम म्हणून 'नाग नरसोबा' आणि काही पोथ्या प्रसिद्ध झाल्या आणि नाग ही सापांची पंचमी झाली व नागलोकांची पंचमी लुप्त झाली. आज नागाला दुध पाजणे, त्याची पूजा करणे एवढाच नागपंचमीचा अर्थ उरला. तरीपण बहुजन समाज आजही घराच्या *भिंतीवर पाच नाग* काढणे विसरलेला नाही. *हे पाच नाग म्हणजेच आपले पाच नागराजे होत*.

Featured post

Lakshvedhi