Monday, 16 August 2021

 हीरक महोत्सव व्याख्यानमालेद्वारे

राज्याच्या उज्ज्वल भविष्याचा वेध घेण्याचा उत्तम प्रयत्न

-सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे

        नवी दिल्ली, दि.१५ : महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेच्या माध्यमातून राज्याच्या विविध क्षेत्रांचा इतिहास जागवत, उज्ज्वल भविष्याचा वेध घेण्याचा उत्तम प्रयत्न महाराष्ट्र परिचय केंद्राकडून झाल्याचे गौरवोद्गार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज काढले.

        महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचा समारोप आज डॉ. पांढरपट्टे यांच्या भाषणाने झाला. या व्याख्यानमालेचे अंतिम ६१वे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.   

           यावर्षी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला ६१ वर्ष पूर्ण झाली तसेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रालाही ६० वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोन्ही घटनांचे औचित्यसाधून दिल्लीतील महाराष्ट्राचे दूतावास असणाऱ्या महाराष्ट्र परिचय केंद्राने महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचा अभिनव उपक्रम राबवून एकूण ६१ व्याख्याने आयोजित केली. राज्याचे समाजकारणराजकारणतर्कवाद अशा विविध विषयांना या व्याख्यानमालेच्या माध्यमातून उजाळा देण्याचे कार्य झाले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुलेछत्रपती शाहू महाराजडॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार व कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. ज्येष्ठ संपादक गिरीष कुबेरखासदार कुमार केतकर, डॉ.रामचंद्र देखणेडॉ.शरण कुमार लिंबाळे,डॉ.विजया वाड,राजू परुळेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी साहित्य,संस्कृती,कलाशिक्षणअशा विविध विषयांवर आपले विचार मांडले. या व्याख्यानमालेद्वारे राज्यातील विविध क्षेत्रांच्या इतिहासाला उजाळा देवून भविष्याचा वेध घेणारी महत्वपूर्ण मांडणी करण्यात आली व  ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. 

           महाराष्ट्राला संतांची मोठी पंरपरा आहे. संतांनी भक्तीमार्गासह राज्याच्या पुरोगामी वाटचालीचे बीज रोवले. परिणामी, संतांपासूनच महाराष्ट्राच्या प्रागतिक वाटचालीला सुरुवात झाली. महाराष्ट्राने निर्मितीपासूनच पुरोगामित्वाची कास धरली आहे. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला प्रागतिक, पुरोगामी व विज्ञाननिष्ठ दृष्टीकोण दिला. हा वारसा आपण पुढे नेत आहोत. राज्य काही बाबतीत पुढारलेले असले तरी काही बाबतीत आपल्याला बराच पल्ला गाठायचा असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

                   सामाजिक अभिसरणाच्या चळवळीची दीर्घ पंरपरा हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. सामाजिक अभिसरणातून महाराष्ट्रात  झालेल्या विविध वैचारिक चळवळीचे सार मांडतांना कवीश्रेष्ठ सुरेश भटांचा शेर

 “ जगाची झोकुनी दु:खे ,स्वत:शी भांडतो आम्ही !

 स्वत:च्या झाकुनी भेगा मनुष्य सांधतो आम्ही!!

            त्यांनी उद्धृत केला. राज्याच्या सामाजिक अभिसरणात सहभागी मंडळींनी जगातील सर्व दु:खे आपल्याकडे घेतली व प्रसंगी प्राणाची आहूती दिली. या थोर मंडळींचा आत्मविश्वास व्यक्त करणारा,कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यारा आम्हाला, तिथे नांदतो विठू जिथे झेंडा रोवतो आम्ही. ” हा शेरही त्यांनी यावेळी सादर केला.

            राज्यात झालेल्या वैचारिक क्रांतीमुळेच या मातीतील लोकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे. म्हणूनच राज्याने कोरोना महामारी,चक्रीवादळपूर परिस्थिती यांसारख्या संकटांना न डगमगता नेटाने सामना केला व परिस्थिती आटोक्यात आणली. संकटांचा सामना करण्याच्या महाराष्ट्रातील जनतेच्या धाडसा विषयी भावना व्यक्त कराताना “शौक से आये बुरा वक्त अगर आता हैहमको हर हाल में जीनेका हुनर आता है.” हा शेर उदृधृत केला.

                 महाराष्ट्राच्या निर्मितीपूर्वी व निर्मितीनंतरही सामाजिक अभिसरणाचे प्रयोग झाले. यात महात्मा  फुलेछत्रपती शाहू महाराजडॉ.बाबासाहेब आंबेडकरसानेगुरुजीगोपाळ गणेश आगरकर असे अनेक महापुरूष आहेत  व त्यांच्या विचारांचा मोठा वारसा राज्याला मिळाला. अंधश्रध्दा निर्मूलनाचा विचार व त्यातून उभे राहिलेले राज्यातील कार्य उल्लेखनीय आहे. राज्यात समाजातील सर्व स्तरांतील जनतेला न्याय देण्याचे काम झाले आहे. समाजातील घटक वंचित राहू नये याची खबरदारीही महाराष्ट्राने घेतली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंतांची मोठी फळी राज्यात निर्माण झाल्याचे सांगत  कृषीउद्योग, शिक्षण आदी क्षेत्रात महाराष्ट्राने मोठी प्रगती केली आहे व देशाला नेतृत्व दिल्याचे त्यांनी नमूद केले.

            राज्याच्या नाटकसंगीत,साहित्याच्या उज्ज्वल पंरपरेवरही त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. नाटक हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्ये असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठीत दर्जेदार नाटकांचे सादरीकरण होत आलेले आहे.  प्रायोगि‍क व व्यावसायिक रंगभूमीने मराठी नाटकांमध्ये नवीनता आल्याचेही त्यांनी नमूद केले. नाटकांप्रमाणेच मराठी साहित्यालाही मोठी पंरंपरा आहे. दया पवार यांच्या बलूतं या आत्मकथनाने मराठी साहित्यात क्रांती घडवली. थोर लेखक भालचंद्र नेमाडे यांनी मराठी साहित्याला वेगळी दिशा दिली. मराठी साहित्यात नाविन्यपूर्ण प्रयोग सुरु असून हे आश्वासक चित्र असल्याचे त्यांनी सांगितले.

                मराठी चित्रपटक्षेत्राने मोठी झेप घेतली आहे. देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये मराठी चित्रपट अग्रस्थानी असतात. मराठी चित्रपटांचा तांत्रिकदर्जा व गुणवत्ता वाढत आहे व ही परंपरा भविष्यात विस्तारेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

         महाराष्ट्रातील प्रसार माध्यमांची झालेली प्रगती भूषणावह असल्याचे त्यांनी सांगितले. लोकमान्य टिळकगोपाळ गणेश आगरकरप्र.के.अत्रे यांसारख्या थोर पत्रकारांची परंपरा राज्याला लाभली आहे. बहुतांश राजकीय नेते हे पत्रकारही  होते असा उल्लेखही त्यांनी केला. राज्यातील पत्रकारितेला कृतीशील विचारवंतांची परंपरा आहे. आजही मराठी पत्रकारितेचे  जनमानसात आदराचे स्थान असल्याचे त्यांनी सांगितले.

             महाराष्ट्र हे विविध क्षेत्रात प्रयोग करणारे व ते प्रयोग यशस्वी करणारे राज्य आहे. विविध क्षेत्रात कार्यरत राज्यातील जनतेनेही स्वत:च्या प्रगतीबद्दल संतुष्ट न राहता, आप-आपल्या क्षेत्रात उत्तमोत्तम कार्य करण्याचा शोध व वेध घेत रहावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

                 “उडवाच मान माझी माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे, मी वाकणार नाही.” अशा शब्दात त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानाची महती वर्णन केली. “धोका मला जरीही रस्त्यात दुश्मनांचा, मागे फिरावयाचा माझा विचार नाही.” या ओळींद्वारे महाराष्ट्र कोणत्याही संकटाला न डगमगता विविध क्षेत्रात आपले ध्येय प्राप्त करेल, असा विश्वास डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी  व्यक्त केला.

 महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी,

मराठी तरुणाला जगाच्या स्पर्धेत उभे करण्यासाठी पुढाकार घ्या

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

मराठी पाऊल पडते पुढेजगभरातील उद्योजकांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

एकमेकाला सहकार्य करत महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी करू

 

            मुंबईदि. 15 :- कृषीशिक्षणतंत्रज्ञानआरोग्य-औषध या क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठीमराठी तरुणांना जगाच्या स्पर्धेत उभे करण्यासाठी पुढाकार घ्या. आपण एकमेकास सहकार्य करत महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी करूअशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जगभरातील उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिली. अखिल आंतरराष्ट्रीय मराठी इंडियन्स (आमी) परिवारासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित संवादाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. 

            या संवादात उद्योग मंत्री सुभाष देसाईमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंहप्रधान सचिव विकास खारगेआमी परिवाराचे संयोजक संतोष करंडे (अमेरिका)संदिप देसले (इजिप्त)अलअदिल ट्रेडिंग कंपनीचे प्रमुखउद्योजक डॉ. धनंजय दातार (दुबई)उत्कर्ष बल्लाळ (ओमान)विशाल गायकवाड (रियाध)संजय पाटील (कतार)लेफ्टनंट कर्नल सचिन टिळेकर (ऑस्ट्रेलिया)तेजस्विनी डोळस (अबुधाबी)मृदुला जोशी (कॅनडा)धवल नांदेडकर (फुजैराह)प्रिती पाटील (युनायटेड किंगडम)प्रज्ञा आगवणे (शारजाह)ज्योती नेने-त्रिवेदी (केनिया)मोहम्मद नदीम (सऊदी अरेबिया)डॉ. अनघा कुलकर्णी (बहारीन)सुशांत सावर्डेकर (दोहा)उल्का नागरकर (शिकागो) सहभागी झाले होते. 

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणालेजगाच्या कानाकोपऱ्यातून जय महाराष्ट्र ऐकू येतो आहेहा अंगावर रोमांच आणणारा क्षण आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या जगभरातून आपण शुभेच्छा देत आहात. मराठी माणसाने जग व्यापून टाकले आहेहा अनोखा अनुभव आहे. आपण मायभूमीपासून दूर गेलातपण तुमची पाळेमुळे इथेच आहेत. मनाने इथेच आहातयाचा आनंद आहे. जगभरातील मराठी माणूस महाराष्ट्राच्या विकासासाठी पुढे येतो आहेहे आशा पल्लवित करणारे आहे. मराठी माणूस जगातील विविध क्षेत्रात मोठ-मोठ्या पदापर्यंत पोहचला आहे. आपल्या कौशल्याने त्या-त्या देशाच्या अर्थकारणाला हातभार लावतो आहे. तुम्ही आता जगभरात आपल्या बळावर स्थान निर्माण केले आहे. त्यांचा फायदा आपल्या मराठी मुलांनातरुणांना व्हावा. त्यांना संघर्ष करावा लागू नयेत्याची भविष्याची वाटचाल सुकर व्हावी यासाठी आपल्याला पुढाकार घेता येईल. विदेशात भविष्याची चाहूल लवकर लागते. त्यादृष्टीने पावले उचलली जातात. त्या अनुषंगाने आपला त्या-त्या क्षेत्रातील अनुभव- अभ्यास महाराष्ट्रालाही उपयुक्त ठरू शकतोअसेही त्यांनी सांगितले.

            महाराष्ट्रात शिक्षणकृषीतंत्रज्ञान आणि नवीन उद्योग संकल्पना यांच्या स्वागताचे धोरण आहे. त्यातून विदेशातील मराठी उद्योजकव्यावसायीकतज्ज्ञ यांच्या समवेत महाराष्ट्र शासन समन्वयासाठी प्रयत्न करेलअसे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले कीशिक्षणामध्ये आम्ही नवनवे प्रयोग करत आहोत. मुंबई मनपा शाळांच्या गुणवत्तावाढीमुळे आता प्रवेशासाठी रांग लागू लागली आहे. या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञाननव्या संकल्पनांचेही स्वागत केले जाईल. आपला शेतकरी निसर्गाच्या भरवशावर आपल्या आयुष्याची गुंतवणूकच शेतीत करतो. पण तो पावसाच्या अनियमिततेमुळे हताश होतो. त्याला कधी दुष्काळाचातर कधी अतिवृष्टीचा फटका बसतो. मेहनती शेतकऱ्याला या चक्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. त्याच्या मालाला हमी नव्हे तर हमखास भाव मिळेल. त्याच्यासाठी चांगली बाजारपेठ कशी उपलब्ध होईल. उद्योग जसा आखीव-रेखीव असतोतसेच त्याला संघटीत करण्याचा प्रय़त्न आहे. त्याला दर्जेदार-गुणवत्तेचे पीक घेण्यासाठी प्रशिक्षित करावे लागणार आहे. जागतिक तापमानवाढीचे दुष्परिणाम भोगतो आहे. हे रोखण्यासाठी आता आम्ही ई-व्हेईकल्सचे धोरणही आणले आहे. अशा कृषीशिक्षणतंत्रज्ञानआरोग्य सुविधाऔषध या क्षेत्रात आपल्याला एकत्र येऊन काम करता येईल. त्यासाठीच्या सूचनानव्या प्रकल्पसंकल्पांचे स्वागत आहे. मराठी माणूस काय करू शकतोहे तुम्ही दाखवून दिले आहे. आता महाराष्ट्राला अभिमान वाटेलअसे प्रयत्न करू. तुम्ही भरारी घेतली आहेआता नव्या पिढीतील तरुणांना गरुड भरारीसाठी पंख देण्यासाठी पुढे याअसे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी गत दिडवर्षातील महाराष्ट्रातील दिडवर्षांची कोविडशी झूंजवादळ आणि अतिवृष्टीमुळे कोकणपश्चिम महाराष्ट्राला बसलेला पूराचा फटका यांचा उल्लेख करूनया आव्हानांवर मात करून महाराष्ट्र पुढे जात असल्याचे सांगितले. 

            उद्योग मंत्री श्री. देसाई म्हणालेआपण सर्वांनी सातासमुद्रापार जाऊन महाराष्टाची मुद्रा उमटवली आहे. आप-आपल्या क्षेत्रात नाव कमावले आहे. जगभरातल्या आंतरराष्ट्रीय कंपन्याचे सीईओ भारतीय आणि महाराष्ट्राचे आहेतयाचा अभिमान आहे. त्या-त्या देशांच्या आर्थिक विकासासाठी मराठी बंधु-भगिनीचा हातभार लागतो आहेयाचे कौतुक आहे. तुम्ही तिथे प्रामाणिकपणे काम करतानामातृभुमीचे ऋणऋणानुबंध विसरलेला नाहीतहे महत्वाचे आहे. अनिवासी महाराष्ट्रीय म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहेत. कोरोनाचे मोठे संकट असतानामुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सावरण्याची जबाबदारी पार पाडली. मुख्यमंत्र्याच्या शब्दाखातर महाराष्ट्राने शिस्तअपेक्षासूचना तंतोतंत पाळल्या. त्यामुळे महाराष्ट्र खचला नाही. 

            उद्योगव्यापाराची चक्रे अविरत सुरु राहीली. ती कुठेही थांबली नाहीत. जगभर विखुरलेल्या उद्योजकांच्या कल्पनांचेसंकल्पनांचे स्वागतच आहे. उद्योगव्यापार आणि गुंतवणूकीसाठी आम्ही पायघड्या घातल्या आहेत. त्यासाठीच्या विविध धोरणांचीही मंत्री श्री. देसाई यांनी माहिती दिली. 

            उद्योजक डॉ. दातार यांच्यासह या संवादात सहभागींनी कोरोना संकटाच्या आव्हानात्मक परिस्थितीत मुख्यमंत्री. ठाकरे यांनी उत्कृष्ट काम केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. 

            या संवादाच्या दरम्यानच  केनियातून ज्योती नेने-त्रिवेदी यांनी त्यांचे वडील डॉ. नेने यांच्या बार्शी (जि. सोलापूर) येथील नर्गीस दत्त कॅन्सर रिसर्च रुग्णालयामध्ये सोयी-सुविधांमध्ये वाढ करूनहे रुग्णालय ग्रामीण जनतेच्या सेवेत रुजू करण्याबाबत विनंती केली. याबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी लगेचच या रुग्णालयाबाबत आढावा घेण्याचे निर्देश दिले. तसेच लवकरात लवकर हे रुग्णालय पुन्हा नव्या दमाने रुजू करण्यात येईलअसा विश्वास दिला.

       शारजातून मिलिंद विनोद यांनी एक शाळा दत्तक घेऊन ती अद्ययावत तंत्रज्ञानाने आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशी करण्याची तयारी दर्शविली. मुंबई महापालिकेकडून दादर येथील एका मार्गाला ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांचे नाव देण्यात आले आहे. या निर्णयाचेही त्यांनी कौतुक केले आणि आभारही मानले. 

००००

 शेतकऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषि संकुल असावे

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

        स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुलाचे ई-भूमिपूजन

 

            वाशिमदि. 15 (जिमाका) : राज्यातील शेतकरी आणि शेती हीच आपली प्राथमिकता आहे. शेतकऱ्यांसाठी नव्या संकल्पनेतून काम करण्यात येत आहे. वाशिम येथे उभारण्यात येत असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षणाच्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे कृषि संकुल असावेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. आज, 15 ऑगस्ट रोजी वाशिम येथील स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुलाच्या ई-भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

            कृषिमंत्री दादाजी भुसे दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाईजिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. शाम गाभणेखासदार भावना गवळीआमदार ऍड. किरणराव सरनाईकआमदार अमित झनकजिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंतपोलीस अधीक्षक वसंत परदेशीसहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांची मंचावर उपस्थिती होती.   

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणालेस्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतंत्र वाशिम जिल्ह्याचे वचन दिले होते. ते त्यांनी वाशिम जिल्ह्याची निर्मिती करून पूर्ण केले. त्याच वाशिम जिल्ह्यात आज राज्यातील पहिल्या अद्ययावत बहुउद्देशीय कृषि संकुलाचे भूमीपूजन होत आहेहा मोठा योगायोग आहे. विकेल ते पिकेल या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून बाजारपेठेत जे विकेल तेच पिकाविण्यावर आपला भर राहणार आहे. एक जिल्हाएक पीक या संकल्पनेनुसार प्रत्येक जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पिकाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

            कोरोना काळातही न थांबता शेतकरी शेतामध्ये राबराब राबत असल्याचे सांगून मुख्यमंत्री
श्री. ठाकरे म्हणालेशेतकऱ्यांच्या मेहनतीवरच राज्याचा विकास होत आहे. शेतकरी पिकवतो म्हणूनच आपण दोन घास खाऊ शकतो. शेतकऱ्याच्या कष्टाचे सोने व्हावेयासाठी महाविकास आघाडी सरकार एक-एक पाऊल पुढे टाकत आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यापासून ते आताचा ई-पीक पाहणी प्रकल्पासारखे अनेक निर्णयउपक्रम शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने यापुढेही शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहीलअसे त्यांनी यावेळी सांगितले.

            कृषिमंत्री श्री. भुसे म्हणालेवाशिम येथे उभारण्यात येत असलेले स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुल एक पथदर्शी प्रकल्प ठरेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार राज्यात प्रत्येक जिल्ह्यात याच धर्तीवर कृषि संकुलाची उभारणी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. राज्यातील शेतकरी चिंतामुक्त व्हावायासाठी राज्य शासन विविध योजनाउपक्रम राबवीत आहे. महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना 21 हजार कोटी रुपयांची कर्जमुक्ती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना शून्य टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देण्याची मर्यादा 1 लाखांवरून 3 लाख रुपये करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

            शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळावायासाठी कृषि विभागामार्फत विकेल ते पिकेल संकल्पना राबविण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांना शेतमालावर प्रक्रियासाठवण याविषयी मार्गदर्शन केले जात आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकाची नोंद ऑनलाईन स्वरुपात सातबारावर करता यावीयासाठी राज्य शासन व टाटा ट्रस्टच्या माध्यमातून राज्यात ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर पिकाची नोंद घेण्यासाठी तलाठ्याकडे वारंवार जाण्याची आवश्यकता राहणार नाहीअसे श्री. भुसे यांनी सांगितले.

            पालकमंत्री श्री. देसाई म्हणालेवाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा असून जिल्ह्यातील शेती निसर्गावर अवलंबून आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी जिल्ह्यातील शेतीतील उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषि क्षेत्रात अमुलाग्र बदल प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील सोयाबीन पिकाखालील क्षेत्र अधिक आहे. या पिकातून अधिक उत्पादन घेण्यासाठी संशोधन व्हावेशेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण मिळावे. त्याविषयीचे प्रात्यक्षिक पाहण्याची सुविधा उपलब्ध व्हावीयाकरिता स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुल उभारण्यात येत आहे. या संकुलासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 5 कोटी 44 लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. या संकुलात रायपनिंग चेंबरप्री-कुलिंग व शीतगृहाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. शेतमालाची प्रतवारी व पॅकिंगशेतमाल विक्रीकरीता स्वतंत्र दालनअद्ययावत प्रशिक्षण हॉल तसेच महीला व पुरुषांकरिता निवासाची स्वतंत्र व्यवस्था राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुलाविषयी माहितीचे व्हिडीओद्वारे सादरीकरण केले. आभार जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. तोटावार यांनी मानले.

 *वेळेवर जेवण न केल्याचे दुष्परिणाम* 


खुप काम आहे, असे म्हणत अनेकजण जेवण टाळतात. परंतु आरोग्यासाठी हे अतिशय घातक ठरू शकते. यामुळे शरीरात विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ शकता तसेच कार्यक्षमतेवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो काही व्यक्ती वजन कमी करण्यासाठी जेवण टाळात पण आरोग्यासाठी हे घातक आहे.


♦ *हे आहेत दुष्परिणाम* ♦


✅ 1. *वजन वाढते* 

वेळेत जेवण न केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडते. यामु फॅट्स शरीरात जमा होतात. यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते.


✅ *2. चक्कर येणे* 

भुकेले राहिल्याने अशक्तपणा येऊन अनेकदा भोवळ येते.


✅ *3.तणाव* 

भुकेल्या अवस्थेत शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होते. यामुळे तणाव जाणवतो.


✅ *4. अन्य आजार* 

वजन घटवायचे असल्यास पौष्टिक खा आणि काही वेळाच्या समप्रमाणात अंतराने खात राहा. अन्यथा विविध आजार शरीरात शिरकाव करू शकतात.


✅ *5.लठ्ठपणावर नियंत्रण* 

योग्य आहार आणि व्यायाम वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर योग्य-पौष्टिक आहार घ्या आणि व्यायाम करा.


✅ *6.मेंदूचे कार्य* 

ग्लुकोजच्या मदतीने मेंदूचे कार्य सुरू असते. यासाठी योग्य प्रमाणात आणि वेळेत जेवण करा. अन्यथा रक्तातील साखरेची पातळी खालावते. लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता कमी होते.


✅ *7.चिडचिड* 

भुकेमुळे जास्त चिडचिड होते. रक्तातील साखरेची पातळी खालावल्याने मेंदूप्रमाणे तुमच्या

 मूडवर याचा परिणाम होतो.

➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖

Sara speech

 https://photos.app.goo.gl/5FQTjXSJfHpqayZT8

Featured post

Lakshvedhi