Thursday, 30 May 2019

जनजागर


८.  आपलं सरकार
                www.aaplesarkar.maharashtra.gov.in
     मा. ना.मुख्यमंत्री कार्यालयाच्या पुढाकाराने दि २६/१/२०१५ रोजी आपले सरकार या वेबपोर्टल आणि मोबाईल अॅपचे लोकार्पण झाले असून तक्रार निरवारण, सहयोग, माहितीचा अधिकार असे विभागांतर्गत सर्वसामान्य नागरिक आपल्या समस्यांचे निवारण वा इतर अनुषंगिक माहितीसाठी सेवा उपलब्ध करुन घेऊ शकतो कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक ०२२-२२०२४४९४६, Email : dstraininggad@maharashtra.gov.in

९.   मोफत विजजोडणी-पं दिनदयाळ ग्रामज्योती योजना
     महावितरण १८००२००३४३५/१८००२३३३४३५
     दारिदय रेषेखालील, अतिदुर्गम क्षेत्रातील, पंतपधान आवास, शबरी, रमाई, अदिवासी, सौभाग्य योजने अंतगत येणा-या घरांसाठी सौरउर्जा अंतर्गत वीजपुरवठा देण्यात येतो. ही वीज जोडणी मोफत असून इतर लाभाथीना ५००/-रु शुल्क असून १० टप्यात भरावयाचे आहे. स्थानिक महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून मोफत विज जोडणीचा लाभ घ्यावा.

१०.  स्मार्ट प्रवेश - मंत्रालयात 
आपल्या विविध कामासाठी मंत्रालयात अनेक जावे लागते व त्यासाठी रांगेत ताटकळत उभ रहावे लागत असल्याने अपंग, महिला, वृध्द ह्यांना शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.हा त्रास टाळावा ह्यासाठी  दि १५ जानेवारी २०१५ पासून ऑनलाईन पास सुविधा www.maharashtra.gov.in ह्या वेबसाईटवर जनतेसाठी उपलब्ध करुन दिली आहे.

११   विमा घ्या सुरक्षित रहा
     १८००१८०१११ टोल फ्री
     प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत रु २.०० लाख ,१८ ते ७० वर्षे वयोगटासाठी अपघात विम्यासाठी रु १२/- तर जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत रु २.०० लाखाचे जीवन विम्यासाठी प्रतीवर्ष फक्त रु ३३०/- वय वर्षे १८ ते ५० वर्षे वयोगटासाठी असून नजिकच्या बँकेंत, बँक मित्र, विमा एजन्ट शी संपर्क साधावा.

१२  शेतीविषयक माहिती अॅपवर
     किसान कॉल सेंटर , १८००-१०-१५५१ टोल फ्री
     किसान सुविधा अॅप, अॅगीमार्केट पीकसुविधा अॅप,नवीन तंत्रज्ञान आणि पिकाची निगा ह्यासाठी पुसाकृषी, पीक विमा असे मोबाईल अॅप कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांनी कृषीविषयक माहिती उपलब्ध केले आहे. तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन प्राप्त करण्याच्या हेतूने किसान कॉल सेंटरला करा अथवा एसएसएसच्या सहायाने नोंदणी करावी. एसएसएस ५१९६९ किंवा ७७३८२९९८९९ या नंबरवर करावा.

दिनांक २६ जून - अंमली पदार्थ सेवन व बेकायदा व्यापार विरोधी दिन
     महाविदयालयीन तरुण तरुणींना केंद्रस्थानी ठेऊन अंमली पदार्थाच्या सेवनाची चटक लावून बेकायदा अंमली पदार्थाचा व्यापार करणारी टोळी महाविदयालयीन परिसरात लक्ष्य करते व त्यांचेकडून हवी तशी कामे करुन घेते.नशेच्या आहारी गेल्याने शारिरीक हानी तर होतेच. तथापी कौटुंबिक स्वास्थ्य पर्यायाने समाजाची ही हानी होते. हयासाठी महाविदयालयीन युवक युवतींनी आपल्या मित्र मैत्रणींवर लक्ष ठेऊन त्यांना प्रतिबंध करावा ,तसेच स्थानिक पोलिस यंत्रणेचीही मदत घ्यावी वा संपर्क- नाकोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई  कार्यालय, पत्ता -  ३ रा मजला, एक्सचेंज बिल्डींग, स्पोर्टी रोड, फोर्ट मुंबई ४००००१, बेलॉर्ड्‌ इस्टेट, ०२२-२२६२१५९३,०२२-२२६२०४२८,०२२-२२६२५१२६

रणरागिणी
     महिला व मुलींना कामानिमित,शिाक्षणानिमित्ताने, विविध कारणामुळे बाहेरगावी जावे लागते, अशावेळी रात्री दिवसा कोणत्याही वेळी समाजकंटकापासून संरक्षण करणेसाठी योजनेअंतर्गत स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यांत येतात. महिला मंडळे, क्रीडा युवा मंडळे,शाळा महाविदयालये यांनी ह्या प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणेसाठी लक्षवेधी रणरागिणी कार्यालयाशी संपर्क साधावा.

महात्मा गांधी तंटामुक्त गांव
     राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची १३८ वी जयंती पहिला आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्ताने तंटामुक्त गांव गांव. करण्याची शपथ घेण्यात आली. गांवागांवातून होणारे तंटे,भांडणे वाळीत टाकणे असे समाजविघातक तंटे सामोपचार मिटवून गांवामध्ये बंधुभाव व सद्‌भावना निर्माण होणेसाठी गांवातील सर्वाचे सहकार्य अपेक्षित आहे. ह्याकरिता महिला, युवक मंडळे, जेष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन सामोपचाराने तंटा निरसन करावे व गावामध्ये एकता, अखंडता निर्माण करावी.    

रोजगार व व्यवसाय प्रशिक्षण
     सुशिक्षित बेराजगारांमध्ये कुशलतेचा विकास व रोजगार उपलब्ध होणेसाठी भारत सरकारच्या सूक्ष्म व लधुउदयोग मंत्रालयाने औदयोगिक विकास केंद्र (आयडीईएमआय मुंबई) यांचे वतीने विविध कौशल्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शॉर्ट टर्म व लाँग टर्म चे विविध कोर्सेस प्रशिक्षण दिले जाते. अदिवासी युवक युवतींसाठी निशुल्क असून निवास व भोजनाची व्यवस्थ्‌ा शासनामार्फत करण्यांत येते.
संपर्क - आयडीएमआय, मुख्य, लघु व मध्यम उदयोग मंत्रालय, भारत सरकार, स्वातंत्र्यवीर तात्या टोपे मार्ग, चुनाभटटी, सायन, मुंबई ४०००२२, दुरध्वनी क्रमांक-०२२ २४०५०३०१ / २४०५०३०२ / २४०५०३०३ / २४०५०३०४ / ईमेल आयडी training@idemi.org

Wednesday, 29 May 2019

आमदार जयंत पाटील यांच्यावर करावाई करा

आमदार जयंत पाटील यांच्यावर करावाई करा या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील  पत्रकारांची  जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक


अलिबाग (प्रतिनिधी) ः अलिबाग येथील पत्रकार हर्षद कशाळकर यांना  मारहाण कारणारे शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील  यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी सोमावरी (दि. 27) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मार्चा काढला.

          लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या दिवशी (दि. 23)  मतमोजणी केंद्रात बेकायदा घुसून शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील तसेच त्यांच्या इतर साथिदारांनी मारहाण केली होती. याचा निषेध या मार्चात करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनाचे  पदाधिकरी व सदस्य या मार्चात सहभागी झाले होते.

          सकाळी 11.30 वाजता  पत्रकार भवन येथून हा र्चा निघाला. शिस्तबध्दपणे हा मार्चा पोस्ट ऑफिस-काँग्रेस भवन-स्टेट बँक -कोएसो शाळा-न्यायालय-पोलीस ठाणे  या मार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचेल.  हिराकोट तलाव येथे हा मोर्चा पोलीसांनी अडवला. त्यांनतर मार्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी हे निवेदन स्विकारले.

          निवडणूक आयोगाची परवानगी नसताना मतमोजणी केंद्रात बेकायाद प्रवेश केल्याबद्दल आमादर जायंत पाटील, आमदार पंडित पाटील तसेच त्यांच्या इतर साथीदारांवर निवडणूक निर्णय अधिकरी म्हणून आपण स्वतः गुन्हा दाखल करावा.  मतमोजणी प्रक्रीया पूर्ण झालेली नसताना मतमोजणी केंद्रात घुसून या प्रक्रीयेत  अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आमदार जयंत पाटील, पंडित पाटील यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करावा. या प्रकरणाची चौकशी जलदगतीने करावी .  आरोपपत्र तयार करून लवकरात लवकर न्यालायात खटला दाखल करावा  . पत्रकारावर हल्ला केल्या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा नोंदवावा. सीसीटीव्ही कॅकेराचे फूटेज मिळावेत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

सागरी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षणासाठी 20 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सागरी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षणासाठी 20 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

        मुंबई, दि. 29 : ‘सागरी मत्स्य व्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या 6 महिन्याच्या प्रशिक्षण वर्गासाठी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राकडे दि. 20 जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
          मत्स्यव्यवसायाचा विकास व विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून मत्स्य व्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थीना ‘सागरी मत्स्य व्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या 6 महिन्याचे प्रशिक्षण वर्सोवा येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये देण्यात येते. 2019-2020 या वर्षातील प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दिनांक 1 जुलै ते 31 डिसेंबर 2019 या 6 महिन्याच्या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक माहिन्यासाठी 450 रुपये तर दारिद्रय रेषेखालील प्रशिक्षणार्थीला दरमहा 100 रुपये इतके  प्रशिक्षण शुल्क आकारले जाते.
          प्रशिक्षणार्थी निवडीचे निकष याप्रमाणे आहेत. प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छीमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीचे वय 18 ते 35 या दरम्यान असावे. पोहता येणे आवश्यक आहे. किमान 4 थी इयत्ता उतीर्ण असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. बायोमेट्रिक कार्ड धारक किंवा आधार कार्डधारक असावा. संबंधित संस्थेच्या शिफारसीसह विहित परिपूर्ण अर्ज असावा. प्रशिक्षणार्थी दारिद्रय रेषेखालील असल्यास अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गट विकास अधिकाऱ्याच्या दाखल्याची साक्षाकींत प्रत जोडणे आवश्यक आहे.
          निकषांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक  मच्छीमारांनी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई-61 येथे दिनांक 20 जून 2019पर्यंत करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

सुविचार

"सृष्टी" कितीही बदलली तरी माणूस पूर्णत: सुखी होत नाही !! 
पण "दृष्टी" बदलली तर  नक्कीच सुखी होतो...
नियम सोपा असतो, तो अंमलात आणणे कठीण असते..
सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते.

जाहीर आवाहन


New Cabinet for BJP

New Cabinet for BJP

Sports minister- Gautam Gambhir

Foreign minister- Miss Smriti Irani

Finance minister: Jayant Sinha

Defence minister: Rajiv pratap Rudi

Home minister: Amit Shah

Commerce minister: Varun Gandhi

Railways minister: Piyush Goyal

Agriculture minister: Rajnath Singh

Human Resource minister: Mrs Nirmala Sitaraman

Transport minister: Nitish Gadkari

Industry minister: Arvind Sawant ( SS)

Parliament minister: Shahnawaz Hussain

Minority’s affair: Mukhtar Abbas Naqvi

Civil aviation’s: Pawan Varma (JDU)

Information broadcasts: Babool Supriyo

Petroleum minister: Kiran Rijiju

Energy minister: Dr Arvind

Family planning minister: Anantkumar Hegde

Rural development: Shivraj Singh Chouhan

Women empowerment: Minakshi lekhi

Urban development: Gopal Shetty

Law minister: Ravishankar Prasad

Food processing minister: Chirag Paswan ( LP)

Tourism minister: Anurag Thakur

Make in India minister: Dharmendra pradhan

Health: J P Nadda

Coal & mineral: Giriraj Singh

Skill India: Jajyavardhan Rathor

Environment: Sadanand Gawda

Science & Technology: Haripriya Suresh

Labor minister: Anupriya Patel (AD)

Panchayati Raj: Dushyant Singh

Textile minister: Miss Saroj Pande

Consumer affairs: Harkirat Kaur Badal

Namami gange: Rita Bahuguna Joshi

Chemical ministers: Dr Harshvardhan

New portfolio: Employment generation minister: : Ram Madhav

New president of BJP: Bhupendra Yadav

सायबर क्राईम


सायबर क्राईम

सायबर गुन्हे म्हणजे काय ?
     “फौजदारी गुन्ह्यांचे कोणत्याही स्वरुपातील उल्लंघन, ज्यामध्ये संगणकीय तंत्रज्ञानाच्या ज्ञानाचा वापर करुन तपास किवा अन्वेषण आणि खटला चालविण्याच्यसा कामकाजातील प्रक्रियांचा समावेश म्हणजे “सायबर गुन्हे होय. (उदा. बँक फ्रॉड, फेसबुक, व्हॉटस अप, टि्‌वटर, इन्स्टाग्राम इ. संदर्भातील गुन्हे).

सायबर गुन्ह्यांचे प्रकार :
     फिशींग, हॅकिंग, नायजेरियन फ्रॉड, सायबर बुलिंग, डेटा थेप्ट, क्रिप्टोग्राफी, सॉप­टवेअर पायरसी, सायबर स्टॉकिंग, पोर्नोग्राफी.

फिशींग :
     लोकांना फसवून त्यांची व्यक्तीगत खोटी माहिती, बँक अकाऊंट व क्रेडिट कार्डची माहिती वगैरे काढणे किंवा चोरणे, तसेच तुमचा पासवर्ड संस्थेच्या मूळ अधिकृत संकेतस्थळावर वापरुन तुमचे पैसे तुमच्या खात्यातून एका तात्पुरत्या बोगस खात्यात पाठवून नंतर लंपास करणे ह्या प्रकारच्या गुन्ह्याला “फिशींग गुन्हा असे म्हणतात.

हॅकिंग :
     संगणक, संगणक यंत्रणा आणि संगणक नेटवर्क यांचा मालक किंवा  त्यांची प्रभारी व्यक्ती यांच्या परवानगीशिवाय जर एखादी व्यक्ती संगणक, संगणकीय यंत्रणा व संगणक नेटवर्कमध्ये किंवा साधनांमध्ये प्रवेश करील किंवा प्रवेश मिळवेल त्यांस इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी कायदा, २००० प्रमाणे कलम ४३(अ) अनुसार “हँकिग गुन्हा असे म्हणतात.

नायजेरियन फ्रॉड ­
     काही परदेशात स्थायिक झालेल्या कंपनया किंवा व्यक्ती संगणक धारकांशी ई-मेलद्वारे संपर्क करुन त्यांना मोठ्या रकमेचे बक्षीस लागल्याचे सांगून किंवा त्या देशातील त्यांचे नातेवाईकाचे पैसे हस्तांतरीत करण्यासाठी मोठ्या रकमेचे आमिष दाखवून ते मिळविण्यासाठी आधी काही रक्कम जुजबी कामासाठी खर्च करण्यासाठी देण्यास किंवा पाठविण्यास भाग पाडून फसवणूक करणे म्हणजे “नायजेरियन फ्रॉड होय.

सायबर बुलिंग  (इंटरनेट माध्यमांद्वारे छळणे) :
     एखाद्या व्यक्तीची बदनामी करण्याच्या उद्देशाने किंवा मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने ई-मेल, इन्स्टंट मेसेजिंग, चॅट रुम्स, एसएमएस, मोबाईल सोशल नेटवर्किंग साईट, वेबसाईट, यांचा वापर करुन त्या व्यक्तीला घाबरवणे किंवा त्या व्यक्तीची बदनामी करणे, ह्या प्रकाराला “सायबर बुलिंग गुन्हा असे म्हणतात.

डेटा थेप्ट (डेटा चोरी करणे) :
     जर कोणी संगणक, संगणकीय यंत्रणा आणि संगणक नेटवर्कमधून कोणताही आधार सामग्री साठा किंवा माहिती उतरवून घेईल, नक्कल करील किंवा त्याचा गोषवारा घेईल तसेच काढून घेण्याजोगी साठवण माध्यमात, माहिती किंवा आधार सामग्री साठवून ठेवील त्यास इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी कायदा, २००० प्रमाणे ४३(ब) नुसार “डेटा थेप्ट करणे हा गुन्हा असे म्हणतात.

साफ्टवेअर पायरसी :
     सॉफ्टवेअर पायरसी म्हणजे अवैधरित्या नक्कल आणि अधिकृत पत्रकाशिवाय (लायसन्स) सॉफ्टवेअरचा वापर करणे. त्याचबरोबर एकदाच वापरात येणा­या अधिकृत पत्रकाचा वापर एकापेक्षा जास्त वेळा अवैधरित्या एकापेक्षा जास्त लोकांनी केला तर त्याला “ सॉफ्टवेअर पायरसी असे म्हणतात.

सायबर स्टॉकिंग :
     नेटवर सातत्याने एखाद्याचा पाठलाग करणे, पिच्छा पुरविणे किंवा पाठपुरावा करीत त्या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ हरपून टाकणे होय. बुलेटीन बोर्डवर काही संदेश पाठविणे, जे बळी ठरलेल्या व्यक्तीच्या अनुभवात वारंवार येतात, त्याचप्रमाणे चॅटरुममध्ये अनधिकृतरित्या शिरकाव करुन अशा व्यक्तीस हैराण करण्यांत येत असते. त्यांस “सायबर स्टॉकिंग असे म्हणतात.

पोर्नोग्राफी (अश्लिल छायाचित्रण) :
     अश्लिल छायाचित्रे, चित्रफिती (क्लीपींग), अश्लिल मासिके जी इंटरनेटचा वापर करुन करण्यांत येतात त्याला “पोर्नोग्राफी असे म्हणतात. (अश्लिल छायाचित्रे उतरविणे, उतरवून घेणे, छायाचित्रे अश्लिल स्वरुपात काढणे किंवा अश्लिल स्वरुपाचे लिखाण करणे इत्यादी).

सोशल मिडीया (फेसबुक, व्हॉट्‌स-अॅप, टि्‌वटर) :
     विवाह विषयक फसवणुक, बदनामी, पोर्नोग्राफी, अफवा पसरविणे, खोटी बातमी पसरविणे, पाठलाग करणे, ब्लॅक मंलींग.

विवाह विषयक फसवणूक :
     शादी डॉट कॉम, जीवनसाथी डॉट कॉम अशा मेट्रोमोनीयल वेबसाईटवर लग्नासाठी स्वत:चे प्रोफाईल तयार केले जाते व त्यानुसार वधू-वर शोधाशोध सुरु होते मग नंतर एखाद्या दुस­या देशातून एखाद्या परदेशी नागरिकांची फ्रेंड रिक्वेस्ट येते. मग दोघांमध्ये संवाद सुरु होतो. त्यानंतर एखादा बहाणा करुन पैसे उकळले जातात व आपण भावनेच्या भरात बळी पडतो. (उदा. हयात गिप­ट पाठवले आहे ते रिसिव्ह करायचे असेल तर करन्सी बदलावी लागेल, माझ्या आईला कॅन्सर झाला आहे. औषधोपचार करायचा आहे, अशा विविध प्रकारचे बहाणे करुन पैसे कधी कॅश डिपॉझिट तर कधी नेट बँकींगद्वारे भरायला सांगून नंतर संभाषण बंद करतात. आपण त्यात कसे गुंतत जातो याची आपल्याला कल्पना सुध्द्‌ा येत नाही).

बदनामी :
     बदनामी म्हणजे सायबर बदनामी जेव्हा संगणकाच्या वा इंटरनेटच्या मदतीने कोणातरी व्यक्ति, संस्था वा कार्य यांची बदनामी करण्यांत येते, तेव्हा त्यास “सायबर बदनामीम्हणतात. उदा. कोणीतरी व्यक्तीने कोणासाठी तरी अवमान, अपमानकारक असे वक्तव्य केले किंवा संकेतस्थळावर काही माहिती दिली जी त्या व्यक्तीबद्दल बदनामी करणारी असेल, किंवा असे काही ई-मेल पाठवले की ज्यात अवमानकारक माहिती ही व्यक्तीच्या सर्व मित्र मंडळीमध्ये पोहोचविण्यांत आली असेल.

अफवा पसरविणे :
     सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे सोपे असल्यामुळे अल्पावधीतच याची लोकप्रियता वाढली पण याचा वापर आता अफवा पसरविण्यासाठी अधिक होऊ लागला आहे. समाजात केवळ भिती पसरविणे आणि लोकांची फसवणूक करणे ही काही लोकांची मानसिकता झाली आहे. त्यातुनच असे संदेश तयार होत असतात. दंगली किंवा इतर घटनांवेळी समाज विघातक संघटना अशा प्रकारच्या अफवा पसरवत असतात. तरी नागरिकांनी अशा अफवांना बळी न पडता शांतता ठेवण्याचा प्रयत्न करावा.

खोटी बातमी पसरविणे :
     हल्ली जगात कुठेही अपघात, घातपात, हल्ले, बॉम्बस्फोट अशा कोणत्याही दुर्घटनांच वृत्त त्या घडल्याक्षणी सोशत मिडीयावर येतात. सोशल मिडीयासारख्या तात्काळ व्यक्त होणा­या माध्यमात वावरणा­या बहुसंख्य माणसांकडे पेशन्स असतातच असे नाही. कोणतीही गोष्ट पाहिल्या क्षणी किंवा आपल्याला समजता क्षणी जशी दिसत आहे तशीच फेसबुक, टि्‌वटर, व्हॉटस्‌ अॅपवर लवकरांत लवकर टाकण्यासाठी जणू काय स्पर्धा लागलेली असते, ङक्ष्घ्, निषेध, भावपूर्ण श्रध्द्‌ांजली अशा पोस्ट, कमेंटस सारख्या सोशल मिडीयावर दिसत असतात, त्यामुळे नागरिकांनी खरे काय घडले आहे याचा तपास करुनच बातम्यांवर विश्वास ठेवावा.

पाठलाग करणे :
     नेटवर सातत्याने एखाद्याचा पाठलाग करणे, पिच्छा पुरविणे किंवा पाठपुरावा करीत त्या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ त्या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ हरपून टाकणे होय. बुलेटीन बोर्डवर काही संदेश पाठविणे, जे बळी ठरलेल्या व्यक्तीच्या अनुभवात वारंवार येतात, त्याचप्रमाणे चॅटरुममध्ये अनधिकृतरित्या शिरकाव करुन अशा व्यक्तीस हैरान करण्यात येत असते. त्यास “पाठलाग करणे (सायबर स्टॉकिंग)” असे म्हणतात.

ब्लॅक मेलींग :
बँकिंग व इन्श्युरन्स संदर्भातील गुन्हे :
     अेटीएम संबंधीत गुन्हे, ओटीपी, डेबीट/क्रेडीट कार्ड नंबर, सीव्हीव्ही/पीन पासवर्डचे महत्व, फसवणूकीचे फोन कॉल्स, लॉटरी लागलेबाबतचे फोन, एसएमएस द्वारे फसवणूक, बिटकॉईन क्रिप्टाकरन्सी, मल्टिलेवल मार्केटींग

अेटीएम संबंधीत गुन्हे :
     आजकाल आपल्यातील प्रत्येकजण सोयीसाठी अेटीएम कार्ड आपल्याजवळ बाळगतो, पण या तंत्रज्ञानाच्या फायद्याप्रमाणेच त्यात काही धोकेही आहेत त्यामुळे अेटीएम वापरताना खालीलप्रमाणे काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरुन अेटीएम संबंधी गुन्ह्यांना आळा बसेल.
फसव्या कॉल्सपासून सावध रहा, एटीएम कार्डविषयी कोणतीही माहिती अज्ञात व्यक्तीला देवू नका.
·        तुमचा पिन नियमीतपणे बदला.
·        तुमचा पिन क्रमांक लक्षात ठेवा, तो कुठेही लिहून ठेवू नका, खास करुन तो कार्डावर लिहू नका.
·        तुमचे एटीएम कार्ड, पिन आणि इंटरनेट बँकींग यासंबंधीचा तपशील कोणत्याही देवू नका.
·        एटीएम बुथमध्ये कोणालाही आपल्याजवळ येऊ देवू नका किंवा एटीएम व्यवहारासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीची मदत मागू नका.
·        एटीएम मशीनला कोणतेही अज्ञात उपकरण किंवा संशयास्पद मशीन लावले आहे असे वाटल्यास तुमचे कार्ड स्वाईप करु नका.
·        तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करण्यासाठी तुमच्या शाखेला भेट द्या, बँकेच्या व्यवहारासंबंधी एसएमएस अलर्ट मिळवा.
ओटीपी, डेबीट/क्रेडीट कार्ड नंबर, सीव्हीव्ही/पीन पासवर्डचे महत्व (ओटीपी, डेबीट/क्रेडीट कार्डद्वारे फसवणूक) :
डेबीट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा पासवर्ड चोरुन एटीएम मधून पैसे काढणे, दुकानातून खरेदी करणे, इत्यादी गुन्हे करणे होय. डेबीट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा नंबर कार्डधारकाचे सर्व डिटेल्स वापरुन इंटरनेटवरती खरेदी करणे, कार्डधारकाचा नंबर व माहिती दुस­याला विकणे, कार्डचा उपयोग करुन परदेशात खरेदी करणे, बनावट डेबीट/क्रेडिट कार्ड बनविणे किंवा कार्ड बनविण्यासाठी बँकेला खोटी माहिती देणे अशाप्रकारे घडणा­या गुन्ह्यांना ओटीपी, डेबीट/क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक म्हणतात.

फसवणूकीचे फोन कॉल्स  :
लॉटरी लागलेबाबतचे फोन :
     आपणास लॉटरी लागली आहे अशा प्रकारचे फसवे कॉल्स/मेसेजेस आपणांस येऊ शकतात, लॉटरीत लागलेली कार, लॅपटॉप, मोबाईल, टिव्ही, फ्रिज अशा प्रकारच्या वस्तू सोडविण्यासाठी टॅक्स भरावा लागेल वगैरे अशी कारणे दाखवून पैसे लूटले जातात. अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका आपले कष्टाचे पैसे दुस­याच्या स्वाधीन करु नका.

एसएमएस द्वारे फसवणूक :
सायबर गुन्ह्यांचे स्वरुप :
     सायबर गुन्हे म्हणजे असे गुन्हे की ज्या गुन्ह्यात कॉम्प्युटर व नेटवर्क सामील आहे. गुन्हा घडल्यानंतर त्या ठिकाणी कॉम्प्युटर मिळणे किंवा कॉम्प्युटर द्वारा गुन्हा करणे म्हणजे सायबर गुन्हा होय. एखाद्याच्या खाजगी माहितीचा गैरवापर करणे, माहितीची चोरी करणे म्हणजे कॉम्प्युटरमधून काढून घेणे. सायबर गुन्हे वेगवेगळ्या स्वरुपाचे असू शकतात. डाटा चोरी करणे, डाटा नष्ट करणे, माहितीत फेरबदल करणे, एखाद्याची माहिती दुस­याच एखाद्या व्यक्तीला देणे, कॉम्प्युटरच्या विशिष्ट भागांची चोरी करणे किंवा नष्ट करणे यास सायबर भाषेत स्पॅम ई-मेल, हॅकींग, फिशींग, व्हायरस टाकणे, एखाद्याची माहिती ऑनलाईन प्राप्त करणे, कोणावर कायम पाळत ठेवणे (पाठलाग करणे).

सायबर गुन्हा घडल्यानंतर काय कराल ?
     सायबर गुन्हा घडला आहे असे लक्षात आल्यावर सर्वप्रथम नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये जावून काय घडले आहे ते सविस्तर सांगावे. त्याबाबत सविस्तर लेखी तक्रार नजिकच्या पोलीस स्टेशनमार्फत सायबर पोलीस स्टेशनकडे पाठवावी. बँक फ्रॉडबाबत तक्रार असेल तर बँकेचे स्टेटमेंट घेणे गरजेचे असते. डेबीट/क्रेडिट कार्डची फ्रंट साईडची सुस्पष्ट छायांकित (झेरॉक्स) प्रत अर्जासोबत जोडावी.

सायबर गुन्हे रोखण्याच्या उपाययोजना :
     संगणक तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्रात प्रवेश केला आहे व संगणक तंत्रज्ञान हा महत्वाचा घटक बनला आहे. माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग दिवसेंदिवस वाढत असून त्यातील सर्व बाबींच्या सुरक्षिततेला महत्व प्राप्त झालेले आहे. भविष्यांत देखील माहिती तंत्रज्ञानात भरपूर वाढ होणार असून त्याच प्रमाणात तंत्रज्ञानाचा योग्य वापर व गैरवापर होत आहे. भविष्यांत होणारा हा गैरवापर टाळण्यासाठी खालील गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

उपाययोजना :
१)   संगणक, लॅपटॉप, मोबाईल आणि त्यावरील आपला डेटा सुरक्षित करण्यासाठी उच्च प्रतिचा अद्ययावत अॅन्टीव्हायरसचा वापर करा.
२)   संगणक, लॅपटॉप, मोबाईल यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स साधनांचे पासवर्ड वेळोवेळी बदला तो ओळखण्याइतका सोपा ठेवू नका.
३)   विविध ई-मेल, सोशल मिडीया, नेट बँकिग किंवा इतर ऑनलाईन व्यवहारांसाठी कधीही एकच पासवर्ड वापरु नका त्यात विविधता ठेवा.
४)   मोबाईल - स्मार्टफोनला देखील पासवर्ड ठेवा, बँकेसंदर्भात किंवा इतर महत्वाची माहिती मोबाईलमध्ये सेव्ह करु नका.
५)   क्रेडिट/डेबीट कार्ड यांचेवरील १६ अंकी नंबर/सीव्हीव्ही नंबर/पासवर्ड कुणालाही देवू       नये.
६)   बँकेचे खाते अेटीएम/डेबीट/क्रेडिट कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड व ओटीपीची माहिती कोणालाही दुरध्वनीवर-मोबाईलवर देवू नका.
७)   लॉटरी, नोकरी, बक्षीस लागल्याचे ई-मेल/कॉल/एसएमएस आल्यास त्यांच्या कोणत्याही भुलथापांना बळी पडू नका त्याकडे दुर्लक्ष करु नका.
८)   संपूर्णपणे खात्री पटल्याशिवाय अनोळखी व्यक्तींची फेसबुक, व्हॉटस अॅप, टि्‌वटर, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट सारख्या विविध सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारु नका.
९)   फेसबुक, व्हॉटस अॅप, टि्‌वटर, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट आदी समाज माध्यमांद्वारे स्वत:चे सध्याचे लोकेशन शेअर करणे टाळा.
१०)  विविध समाज माध्यमांतून धार्मिक भावना भडकवणारे संदेश, व्हिडीओ, छायाचित्रे किंवा अश्लिल साहित्य पोस्ट करु नका अथवा फॉरवर्ड, लाईक व शेअर करु नका.
११)  कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा कंपन्यांकडून आलेल्या ई-मेलवर क्लिक करु नका अथवा त्यांना कोणतीही संवेदनशील माहिती पुरवू नका.
१२)  https ने सुरुवात होणा­या सुरक्षित संकेतस्थळाचाच वापर करावा.
१३)  संगणक, मोबाईल विविध साईटस व अॅप्लीकेशन्सचा वापर केल्यानंतर             आठवणीने लॉगआऊट करा.
१४)  ऑनलाईन शॉपिंग करताना सुरक्षित संकेतस्थळांचाच वापर करा. सायबर गुन्हा घडल्यास आपल्या पोलीस आयुक्तालय किंवा जिल्हा क्षेत्रात कार्यरत असलेल्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांची कर्तव्ये  :
हे करावे
१)   संगणक, लॅपटॉप, मोबाईल आणि त्यावरील आपला डेटा सुरक्षित करण्यासाठी उच्च प्रतिचा अद्ययावत अॅन्टीव्हायरसचा वापर करा.
२)   विविध ई-मेल, सोशल मिडीया, नेट बँकिग किंवा इतर ऑनलाईन व्यवहारांसाठी कधीही एकच पासवर्ड वापरु नका त्यात विविधता ठेवा.
३)   https ने सुरुवात होणा­या सुरक्षित संकेतस्थळाचाच वापर करावा.
४)   संगणक, मोबाईल विविध साईटस व अॅप्लीकेशन्सचा वापर केल्यानंतर             आठवणीने लॉगआऊट करा.
५)   ऑनलाईन शॉपिंग करताना सुरक्षित संकेतस्थळांचाच वापर करा. सायबर गुन्हा घडल्यास आपल्या पोलीस आयुक्तालय किंवा जिल्हा क्षेत्रात कार्यरत असलेल्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांची कर्तव्ये  :
हे करु नका
१)   संगणक, लॅपटॉप, मोबाईल यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स साधनांचे पासवर्ड वेळोवेळी बदला तो ओळखण्याइतका सोपा ठेवू नका.
२)   मोबाईल - स्मार्टफोनला देखील पासवर्ड ठेवा, बँकेसंदर्भात किंवा इतर महत्वाची माहिती मोबाईलमध्ये सेव्ह करु नका.
३)   क्रेडिट/डेबीट कार्ड यांचेवरील १६ अंकी नंबर/सीव्हीव्ही नंबर/पासवर्ड कुणालाही देवू       नये.
४)   बँकेचे खाते अेटीएम/डेबीट/क्रेडिट कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड व ओटीपीची माहिती कोणालाही दुरध्वनीवर-मोबाईलवर देवू नका. लॉटरी, नोकरी, बक्षीस लागल्याचे ई-
५)   संपूर्णपणे खात्री पटल्याशिवाय अनोळखी व्यक्तींची फेसबुक, व्हॉटस अॅप, टि्‌वटर, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट सारख्या विविध सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारु नका.
६)   फेसबुक, व्हॉटस अॅप, टि्‌वटर, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट आदी समाज माध्यमांद्वारे स्वत:चे सध्याचे लोकेशन शेअर करणे टाळा.
७)   विविध समाज माध्यमांतून धार्मिक भावना भडकवणारे संदेश, व्हिडीओ, छायाचित्रे किंवा अश्लिल साहित्य पोस्ट करु नका अथवा फॉरवर्ड, लाईक व शेअर करु नका.
८)   कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा कंपन्यांकडून आलेल्या ई-मेलवर क्लिक करु नका अथवा त्यांना कोणतीही संवेदनशील माहिती पुरवू नका.

Featured post

Lakshvedhi