Wednesday, 29 May 2019

आमदार जयंत पाटील यांच्यावर करावाई करा

आमदार जयंत पाटील यांच्यावर करावाई करा या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील  पत्रकारांची  जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक


अलिबाग (प्रतिनिधी) ः अलिबाग येथील पत्रकार हर्षद कशाळकर यांना  मारहाण कारणारे शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील  यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी सोमावरी (दि. 27) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मार्चा काढला.

          लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या दिवशी (दि. 23)  मतमोजणी केंद्रात बेकायदा घुसून शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील तसेच त्यांच्या इतर साथिदारांनी मारहाण केली होती. याचा निषेध या मार्चात करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनाचे  पदाधिकरी व सदस्य या मार्चात सहभागी झाले होते.

          सकाळी 11.30 वाजता  पत्रकार भवन येथून हा र्चा निघाला. शिस्तबध्दपणे हा मार्चा पोस्ट ऑफिस-काँग्रेस भवन-स्टेट बँक -कोएसो शाळा-न्यायालय-पोलीस ठाणे  या मार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचेल.  हिराकोट तलाव येथे हा मोर्चा पोलीसांनी अडवला. त्यांनतर मार्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी हे निवेदन स्विकारले.

          निवडणूक आयोगाची परवानगी नसताना मतमोजणी केंद्रात बेकायाद प्रवेश केल्याबद्दल आमादर जायंत पाटील, आमदार पंडित पाटील तसेच त्यांच्या इतर साथीदारांवर निवडणूक निर्णय अधिकरी म्हणून आपण स्वतः गुन्हा दाखल करावा.  मतमोजणी प्रक्रीया पूर्ण झालेली नसताना मतमोजणी केंद्रात घुसून या प्रक्रीयेत  अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आमदार जयंत पाटील, पंडित पाटील यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करावा. या प्रकरणाची चौकशी जलदगतीने करावी .  आरोपपत्र तयार करून लवकरात लवकर न्यालायात खटला दाखल करावा  . पत्रकारावर हल्ला केल्या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा नोंदवावा. सीसीटीव्ही कॅकेराचे फूटेज मिळावेत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi