Thursday, 30 May 2019

जनजागर


८.  आपलं सरकार
                www.aaplesarkar.maharashtra.gov.in
     मा. ना.मुख्यमंत्री कार्यालयाच्या पुढाकाराने दि २६/१/२०१५ रोजी आपले सरकार या वेबपोर्टल आणि मोबाईल अॅपचे लोकार्पण झाले असून तक्रार निरवारण, सहयोग, माहितीचा अधिकार असे विभागांतर्गत सर्वसामान्य नागरिक आपल्या समस्यांचे निवारण वा इतर अनुषंगिक माहितीसाठी सेवा उपलब्ध करुन घेऊ शकतो कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक ०२२-२२०२४४९४६, Email : dstraininggad@maharashtra.gov.in

९.   मोफत विजजोडणी-पं दिनदयाळ ग्रामज्योती योजना
     महावितरण १८००२००३४३५/१८००२३३३४३५
     दारिदय रेषेखालील, अतिदुर्गम क्षेत्रातील, पंतपधान आवास, शबरी, रमाई, अदिवासी, सौभाग्य योजने अंतगत येणा-या घरांसाठी सौरउर्जा अंतर्गत वीजपुरवठा देण्यात येतो. ही वीज जोडणी मोफत असून इतर लाभाथीना ५००/-रु शुल्क असून १० टप्यात भरावयाचे आहे. स्थानिक महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून मोफत विज जोडणीचा लाभ घ्यावा.

१०.  स्मार्ट प्रवेश - मंत्रालयात 
आपल्या विविध कामासाठी मंत्रालयात अनेक जावे लागते व त्यासाठी रांगेत ताटकळत उभ रहावे लागत असल्याने अपंग, महिला, वृध्द ह्यांना शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.हा त्रास टाळावा ह्यासाठी  दि १५ जानेवारी २०१५ पासून ऑनलाईन पास सुविधा www.maharashtra.gov.in ह्या वेबसाईटवर जनतेसाठी उपलब्ध करुन दिली आहे.

११   विमा घ्या सुरक्षित रहा
     १८००१८०१११ टोल फ्री
     प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत रु २.०० लाख ,१८ ते ७० वर्षे वयोगटासाठी अपघात विम्यासाठी रु १२/- तर जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत रु २.०० लाखाचे जीवन विम्यासाठी प्रतीवर्ष फक्त रु ३३०/- वय वर्षे १८ ते ५० वर्षे वयोगटासाठी असून नजिकच्या बँकेंत, बँक मित्र, विमा एजन्ट शी संपर्क साधावा.

१२  शेतीविषयक माहिती अॅपवर
     किसान कॉल सेंटर , १८००-१०-१५५१ टोल फ्री
     किसान सुविधा अॅप, अॅगीमार्केट पीकसुविधा अॅप,नवीन तंत्रज्ञान आणि पिकाची निगा ह्यासाठी पुसाकृषी, पीक विमा असे मोबाईल अॅप कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांनी कृषीविषयक माहिती उपलब्ध केले आहे. तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन प्राप्त करण्याच्या हेतूने किसान कॉल सेंटरला करा अथवा एसएसएसच्या सहायाने नोंदणी करावी. एसएसएस ५१९६९ किंवा ७७३८२९९८९९ या नंबरवर करावा.

दिनांक २६ जून - अंमली पदार्थ सेवन व बेकायदा व्यापार विरोधी दिन
     महाविदयालयीन तरुण तरुणींना केंद्रस्थानी ठेऊन अंमली पदार्थाच्या सेवनाची चटक लावून बेकायदा अंमली पदार्थाचा व्यापार करणारी टोळी महाविदयालयीन परिसरात लक्ष्य करते व त्यांचेकडून हवी तशी कामे करुन घेते.नशेच्या आहारी गेल्याने शारिरीक हानी तर होतेच. तथापी कौटुंबिक स्वास्थ्य पर्यायाने समाजाची ही हानी होते. हयासाठी महाविदयालयीन युवक युवतींनी आपल्या मित्र मैत्रणींवर लक्ष ठेऊन त्यांना प्रतिबंध करावा ,तसेच स्थानिक पोलिस यंत्रणेचीही मदत घ्यावी वा संपर्क- नाकोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई  कार्यालय, पत्ता -  ३ रा मजला, एक्सचेंज बिल्डींग, स्पोर्टी रोड, फोर्ट मुंबई ४००००१, बेलॉर्ड्‌ इस्टेट, ०२२-२२६२१५९३,०२२-२२६२०४२८,०२२-२२६२५१२६

रणरागिणी
     महिला व मुलींना कामानिमित,शिाक्षणानिमित्ताने, विविध कारणामुळे बाहेरगावी जावे लागते, अशावेळी रात्री दिवसा कोणत्याही वेळी समाजकंटकापासून संरक्षण करणेसाठी योजनेअंतर्गत स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यांत येतात. महिला मंडळे, क्रीडा युवा मंडळे,शाळा महाविदयालये यांनी ह्या प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणेसाठी लक्षवेधी रणरागिणी कार्यालयाशी संपर्क साधावा.

महात्मा गांधी तंटामुक्त गांव
     राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची १३८ वी जयंती पहिला आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्ताने तंटामुक्त गांव गांव. करण्याची शपथ घेण्यात आली. गांवागांवातून होणारे तंटे,भांडणे वाळीत टाकणे असे समाजविघातक तंटे सामोपचार मिटवून गांवामध्ये बंधुभाव व सद्‌भावना निर्माण होणेसाठी गांवातील सर्वाचे सहकार्य अपेक्षित आहे. ह्याकरिता महिला, युवक मंडळे, जेष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन सामोपचाराने तंटा निरसन करावे व गावामध्ये एकता, अखंडता निर्माण करावी.    

रोजगार व व्यवसाय प्रशिक्षण
     सुशिक्षित बेराजगारांमध्ये कुशलतेचा विकास व रोजगार उपलब्ध होणेसाठी भारत सरकारच्या सूक्ष्म व लधुउदयोग मंत्रालयाने औदयोगिक विकास केंद्र (आयडीईएमआय मुंबई) यांचे वतीने विविध कौशल्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शॉर्ट टर्म व लाँग टर्म चे विविध कोर्सेस प्रशिक्षण दिले जाते. अदिवासी युवक युवतींसाठी निशुल्क असून निवास व भोजनाची व्यवस्थ्‌ा शासनामार्फत करण्यांत येते.
संपर्क - आयडीएमआय, मुख्य, लघु व मध्यम उदयोग मंत्रालय, भारत सरकार, स्वातंत्र्यवीर तात्या टोपे मार्ग, चुनाभटटी, सायन, मुंबई ४०००२२, दुरध्वनी क्रमांक-०२२ २४०५०३०१ / २४०५०३०२ / २४०५०३०३ / २४०५०३०४ / ईमेल आयडी training@idemi.org

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi