नैसर्गिक शेती, रासायनिक खतांचा कमी वापर, मृदासंवर्धन, वृक्षारोपण, धूरमुक्त व धूळमुक्त गावे, पाण्याचा पुनर्वापर आणि अक्षय ऊर्जेचा वापर यांसारख्या बाबींना अभियानात विशेष प्राधान्य देण्याचे निर्देशही मंत्री मुंडे यांनी दिले.
राज्य वातावरणीय बदल कक्षाच्या पुनर्रचनेसंदर्भात स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा उभारण्याबाबत यावेळी चर्चा झाली. हवामान बदलाशी संबंधित धोरण आखणी, जनजागृती, प्रकल्प व्यवस्थापन, हवामान कृती आराखड्यांचे मूल्यमापन आणि हवामान वित्तपुरवठा यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. सध्या राज्यातील सात शहरांचे हवामान कृती आराखडे तयार करण्यात आले असून ९ शहरांचे आराखडे तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या धर्तीवर राज्यातील सर्वच शहरांचे हवामान कृती आराखडे तयार करण्यात यावेत, असे निर्देश मंत्री मुंडे यांनी दिले.
हवामान बदल हा भविष्यातील अत्यंत महत्त्वाचा विषय असून यामध्ये राज्यातील सर्वच विभागांशी समन्वय ठेवावा, असेही मंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment