कोल्हापूर चित्रनगरी व एन.डी. स्टुडिओचा बहुउद्देशीय वापर;
महसूलवाढीसाठी स्वतंत्र धोरण तयार करावे
-सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार
मुंबई, दि. 21 : राज्यातील चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रीकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूर चित्रनगरी तसेच कर्जत येथील एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (फिल्मसिटी) संचालक मंडळाची 168 वी बैठक मुंबईतील पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध प्रशासकीय व विकासात्मक मुद्द्यांसह महसूलवाढीच्या दृष्टीने नव्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. यात चित्रनगरीचा आगामी वर्षांचा 18 कोटी महसूल वाढीचा आर्थिक ताळेबंद मंजूर झाला. यावेळी मंत्री ॲड.शेलार यांनी उपलब्ध संरचनेचा अधिक प्रभावी व नियोजनबद्ध वापर करण्यावर भर दिला.
No comments:
Post a Comment