बाह्य यंत्रणेद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा प्रभावीपणे राबवा
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
मुंबई दि.21: महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम व परिणामकारक करण्यासाठी बाह्य यंत्रणेद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. बाह्य यंत्रणेद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत मंत्री आबिटकर बोलत होते.
यावेळी मंत्री आबिटकर म्हणाले, राज्यातील आरोग्य संस्थांनी तपासण्यांसाठी बाह्य संस्थांवर अवलंबून न राहता ‘इन-हाउस’ चाचण्या वाढवून स्वयंपूर्ण व्हावे. अनावश्यक तपासण्या टाळाव्यात तसेच बाह्य संस्थांकडून होणाऱ्या तपासण्यांच्या गुणवत्तेची नियमित पडताळणी करावी. रुग्णांना वेळेत तपासणी अहवाल मिळणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. यासाठी आरोग्य उपसंचालकांनी सुस्पष्ट धोरणात्मक आराखडा तयार करावा अशा सूचना देण्यात आल्या. गावपातळीवर हृदयविकाराशी संबंधित प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यावरही भर देण्यात यावा. या योजनेचा प्रचार-प्रसार वाढवून अधिकाधिक रुग्णांना लाभ मिळावा, यासाठी दरमहा आढावा घेण्याचे निर्देशही मंत्री आबिटकर यांनी दिले.
No comments:
Post a Comment