खडकवासला मतदारसंघातील कचरा व्यवस्थापनाबाबत ३० दिवसांत सविस्तर अहवाल
- राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, दि. १७ : खडकवासला मतदारसंघात नव्याने समाविष्ट गावांमध्ये कचरा व्यवस्थापनातल्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी संबंधित विभागांकडून ३० दिवसांच्या आत सविस्तर अहवाल तयार सादर करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.
नव्याने समाविष्ट गावांमध्ये कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, निधीचा गैरवापर आणि देखरेखीचा अभाव याबाबत सदस्य भिमराव तापकीर यांनी लक्षवेधी सूचना मांडली. या चर्चेत सदस्य नाना पटोले, सुनील कांबळे आणि चेतन तुपे यांनी सहभाग घेतला.
राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांप्रमाणेच खडकवासला मतदारसंघातील नव्या गावांमधील कचरा सध्या पुणे महानगरपालिकेमार्फत उचलला जात आहे. मात्र वाढलेल्या हद्दीच्या तुलनेत केवळ ५० टक्केच कर्मचारी उपलब्ध असल्याने व्यवस्थापनावर ताण आला आहे.
No comments:
Post a Comment