Monday, 23 March 2026

डोंजा येथील ताई सुखदेव काळे मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार

 डोंजा येथील ताई सुखदेव काळे मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार

- गृह राज्यमंत्री योगेश कदम

मुंबईदि. १७ : धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील डोंजा येथील ३१ वर्षीय ताई सुखदेव काळे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात निष्पक्ष आणि सखोल चौकशी केली जाईलतसेच आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश देण्यात येतीलअशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली.

या प्रकरणात छळ व ब्लॅकमेलिंगचे गंभीर आरोप असूनपोलिसांनी किरकोळ कलमे लावल्यामुळे आरोपींना जामीन मिळाल्याची तक्रार सदस्य संभाजी पाटील-निलंगेकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मांडली होती. या चर्चेत सदस्य हरिष पिंपळे यांनी सहभाग घेतला.

यावर उत्तर देताना राज्यमंत्री कदम यांनी सांगितले कीउपलब्ध पुराव्यांच्या आधारे आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. मात्रप्रकरणातील शंकांच्या अनुषंगाने पुढील तपास अधिक सखोलपणे केला जाईल. जामिनावर सुटलेल्या आरोपींकडून पीडित कुटुंबाला धमक्या दिल्या जात असल्यास त्याचीही गंभीर दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करण्यात येईल,

पीडित कुटुंबाला पूर्ण संरक्षण देण्याची हमी शासनाने दिली आहे. कुटुंबातील कोणालाही त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच  तक्रार देऊनही पोलिसांकडून दखल घेतली गेली नसल्यास त्या बाबीचीही चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईलअसे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.

संपूर्ण प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे व्हावी यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातीलअसे आश्वासनही गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi