मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्वित्झर्लंड मधील दावोस येथे जागतिक अर्थ परिषदेत ३० लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. तसेच १२ लाख कोटींचे करार अंतिम करण्यात आले आहे. या जागतिक परिषदेत परकीय गुंतवणूक असेल तेच करार करण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यामुळे प्रत्येक करारातून राज्यात थेट परकीय गुंतवणूक येणार आहे. दावोस येथे महाराष्ट्राच्या दालनाला गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तेथे १० राज्यांपैकी महाराष्ट्राचाच बोलबाला होता. या परिषदेत झालेल्या करारांचे प्रत्यक्षात उद्योगात रूपांतर होण्याचे राज्याचे प्रमाण ७५ टक्के आहे.
No comments:
Post a Comment