Saturday, 31 January 2026

या महोत्सवामध्ये विविध राज्यांतील सांस्कृतिक विविधता, खाद्यपदार्थ, पोशाख, हस्तकला, लोककला आणि संगीताचे अनोखे दर्शन

 या महोत्सवामध्ये विविध राज्यांतील सांस्कृतिक विविधताखाद्यपदार्थपोशाखहस्तकलालोककला आणि संगीताचे अनोखे दर्शन घडले. विविधतेमध्ये एकता असल्याचा संदेश या महोत्सवामधून देण्यात आला. भारत पर्व 2026मध्ये पर्यटन विभागाच्या दालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दालनाद्वारे राज्यातील विविध पर्यटन क्षेत्रपर्यटन स्थळी जाण्याची सोयउपलब्ध सोयी-सुविधा इत्यादी माहिती उपलब्ध करुन देण्यात आली.

सांस्कृतिक वारसासमुद्रकिनारेयुनेस्को मान्यताप्रात्प गडकिल्ले अशा पर्यटन विषयक वैशिष्ट्य असलेल्या स्थळांची माहिती या दालनाद्वारे पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यात आली. राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती जगभरात पोहोचविणे हा या दालनामागचा मुख्य उद्देश होता.

भारत पर्व ’ महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला

 ‘भारत पर्व ’ महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा

जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला

- पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई

 

  • भारत पर्व 2026’ महोत्सवामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाचा सहभाग
  • ‘भारत पर्व 2026मध्ये महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाच्या दालनाला पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद

 

मुंबईदि.31 : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लाल किल्ल्यासमोरील लॉन्स व ग्यानपथनवी दिल्ली येथे 26 ते 31 जानेवारी दरम्यान भारत पर्व 2026’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सहा दिवसीय महोत्सवामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने दालन उभारुन सहभाग घेतला होता. ‘भारत पर्व ’ महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असे मत पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी मांडले. महोत्सवामधील पर्यटन विभागाच्या दालनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

विस्तारित अर्थव्यवस्थेनुसार तंत्रज्ञानातील बदलांशी अनुरूप आपली यंत्रणा प्रशिक्षित

   विस्तारित अर्थव्यवस्थेनुसार तंत्रज्ञानातील बदलांशी अनुरूप आपली यंत्रणा प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. पिटिशन ड्राफ्टिंगसाठी एआयचा उपयोग करताना होणाऱ्या धोक्यांबाबतही सतर्क राहायला हवे. संशोधनाशिवाय गुणवत्ता येत नाहीत्यामुळे हे रिसर्च सेंटर भविष्यात दर्जेदार कायदेविषयक संशोधनाचे केंद्र बनेलअसा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला

राज्य शासनाने कायदेविषयक प्रशिक्षण आणि संशोधनाला सर्वोच्च प्राधान्य

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीराज्य शासनाने कायदेविषयक प्रशिक्षण आणि संशोधनाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या जागेचा अतिशय उत्तम उपयोग करून अतिशय कमी कालावधीत ही उत्कृष्ट वास्तू उभारली गेली आहे. अकॅडमीच्या इमारतीचे दर्जेदार आणि अल्पावधीत पूर्ण झालेले बांधकाम हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीची आठवण करून देणारे असल्याचे सांगून त्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वकिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकॅडमी सुरू करण्याचा निर्णय हा देशातील पहिलाच निर्णय असून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र यांनी घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी विशेष कौतुक केले. बदलते कायदेनवीन फौजदारी कायदेतसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआयव तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी प्रशिक्षित वकील आणि अभियोजक तयार करणे आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी अकॅडमीसाठी राज्य शासनाकडून 10 कोटी रुपयांचे अनुदान आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर वितरित केले जाईलअसेही सांगितले.

तळोजा येथील या अकॅडमीचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांच्या हस्ते पार

 तळोजा येथील या अकॅडमीचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी भूषविले.यावेळी व्यासपीठावर मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरेभारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अ‍ॅड. अनिल सी. सिंगमहाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ.मिलिंद साठे आणि गोव्याचे महाधिवक्ता अ‍ॅड. देविदास पांगम यांची प्रमुख उपस्थिती होती.

कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची

 कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील

दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची  

 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 31 : महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ‍ॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर' (बीबीएटीआरसीचे कौतुक करीत मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत या ऐतिहासिक वास्तूचे लोकार्पण केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी आवर्जून नमूद केले कीज्याप्रमाणे न्यायमूर्तींसाठी प्रशिक्षण अकॅडमी आहेत्याप्रमाणे वकिलांसाठी प्रशिक्षण अकॅडमी का नाहीयाचे उत्तर बार कौन्सिलने दिले आहे. कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाज (कोर्ट क्राफ्ट) यातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी अत्यंत महत्त्वाची ठरेल.

            तळोजा येथील या अकॅडमीचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी भूषविले.यावेळी व्यासपीठावर मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरेभारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अ‍ॅड. अनिल सी. सिंगमहाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ.मिलिंद साठे आणि गोव्याचे महाधिवक्ता अ‍ॅड. देविदास पांगम यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई

 राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई

मुंबई31 : महाराष्ट्र के राज्यपाल आचार्य देवव्रत ने आज सुनेत्रा अजित पवार को राज्य के उपमुख्यमंत्री पद एवं गोपनीयता की शपथ दिलाई।

लोकभवन में सादे रूप में आयोजित इस शपथग्रहण समारोह में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविधानसभा अध्यक्ष एडवोकेट राहुल नार्वेकरविधान परिषद की उपसभापति डॉ. नीलम गोऱ्हेविधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेमंत्रिमंडल के सदस्यजनप्रतिनिधिमुख्य सचिव राजेश अग्रवालवरिष्ठ प्रशासनिक एवं पुलिस अधिकारीसुनेत्रा पवार के परिवारजन तथा आमंत्रित गणमान्य व्यक्ति उपस्थित थे।





राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना दिली उपमुख्यमंत्री पदाची शपथ




  

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना दिली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

 

मुंबईदि. 31 : महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.

लोकभवन येथे साधेपणाने आयोजित या शपथविधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरविधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेविधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेमंत्रिमंडळातील सदस्यलोकप्रतिनिधीमुख्य सचिव राजेश अग्रवालवरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह सुनेत्रा पवार यांचे कुटुंबीय आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

किसानों के हित के लिए सरकार प्रतिबद्ध

 किसानों के हित के लिए सरकार प्रतिबद्ध

मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि सरकार किसानों के हितों के लिए पूरी तरह प्रतिबद्ध है और संकट के समय किसानों को भरपूर सहायता प्रदान की गई है। अगले चरण में सूखामुक्त महाराष्ट्र के निर्माण हेतु नदी जोड़ परियोजनाओं के माध्यम से राज्य के कोने-कोने तक पानी पहुंचाया जाएगा। उन्होंने बताया कि बुनियादी ढांचे के क्षेत्र में महाराष्ट्र नए कीर्तिमान स्थापित कर रहा है। मुंबई महानगर क्षेत्र के बुनियादी ढांचा प्रकल्पसमृद्धि महामार्ग और शक्तिपीठ महामार्ग जैसे प्रोजेक्ट राज्य के विकास को गति दे रहे हैं।


भारत एक महत्वपूर्ण वैश्विक शक्ति और अर्थव्यवस्था के रूप में स्थापित

 भारत एक महत्वपूर्ण वैश्विक शक्ति और अर्थव्यवस्था के रूप में स्थापित

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में आज भारत को एक महत्वपूर्ण वैश्विक शक्ति और अर्थव्यवस्था के रूप में देखा जा रहा है। मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि यह सफलता संविधान द्वारा प्रदत्त लोकतांत्रिक व्यवस्था के कारण ही संभव हुई है। महाराष्ट्र संतों और वीरों की भूमि है तथा छत्रपति शिवाजी महाराज द्वारा दिए गए स्वाभिमान के मूल्यों पर राज्य की प्रगति आधारित है। उन्होंने कहा कि विदर्भमराठवाड़ाउत्तर महाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रकोकण और मुंबई सहित राज्य के सभी क्षेत्रों में निवेश और रोजगार सृजन हो रहा है।

स्वतंत्रता, समानता और बंधुत्व भारतीय संस्कृति में निहित

 स्वतंत्रतासमानता और बंधुत्व भारतीय संस्कृति में निहित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर को श्रद्धांजलि अर्पित करते हुए संविधान निर्माण में उनके तथा संविधान समिति के सदस्यों के अमूल्य योगदान के प्रति कृतज्ञता व्यक्त की। उन्होंने कहा कि स्वतंत्रतासमानता और बंधुत्व जैसे मूल्य भारतीय संस्कृति में गहराई से रचे-बसे हैं और उनका प्रभावी प्रतिबिंब भारतीय संविधान में दिखाई देता है। भगवान गौतम बुद्ध द्वारा प्रतिपादित बंधुत्व की भावना संविधान के केंद्र में हैऐसा भी उन्होंने उल्लेख किया।

दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात महाराष्ट्र सागरी मंडळ अव्वल

 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात महाराष्ट्र सागरी मंडळ अव्वल

-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडून अभिनंदन

  • 200 पैकी 198.75 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी

मुंबईदि. 26  : राज्याच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमा अंतर्गत राज्यातील एकूण 97 शासकीय संस्थामंडळे व कंपन्यांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सामान्यीकृत 200 गुणांपैकी 198.75 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

प्रशासन अधिक पारदर्शकगतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला 150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम राज्यातील डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाकांक्षी पाऊल ठरत आहे.

या कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्र सागरी मंडळाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजेराज्यातील सर्व प्रवर्गांमध्ये (Generalised Categories) महाराष्ट्र सागरी मंडळाने ही सर्वोच्च कामगिरी नोंदवली आहे. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून कागदविरहित प्रशासनवेळबद्ध सेवापारदर्शक निर्णयप्रक्रिया आणि तंत्रज्ञानाधिष्ठित कार्यपद्धती यांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे हे यश मिळाले आहे.

150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स या कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल बंदरे मंत्री  नितेश राणे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळ व विभागात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.


व्हिंटेज ‘टर्न टेबल शिडी’ वाहनाचे अग्निशमन सेवेतील पुनरागमन गौरवास्पद

 व्हिंटेज टर्न टेबल शिडी’ वाहनाचे

अग्निशमन सेवेतील पुनरागमन गौरवास्पद

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे अनावरण

मुंबई दि २६:- ऐतिहासिक वारसा लाभलेले १९३७ मधील टर्न टेबल शिडी अग्निशमन वाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दल सेवेत पुन्हा दाखल होत आहे ही बाब मुंबईकरांसाठी गौरवास्पद असल्याचे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे 'टर्न टेबल शिडीअग्निशमन वाहनाचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झाले.

यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणीअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.  अश्विनी जोशीमुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकरउद्योजक  गौतम सिंघानिया व मान्यवर उपस्थित होते.

सन १९३७ मध्ये निर्मित आणि सन १९४४ मध्ये मुंबई बंदरातील (मुंबई डॉक) मालवाहू जहाजाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या ऐतिहासिक टर्न टेबल शिडी’ असलेल्या वाहनाचे मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन (Restoration) करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या व्हिंटेज अग्निशमन सेवा वाहनाची औत्सुक्याने पाहणी करुन या वाहनाच्या जतन व संवर्धनाबद्दल गौरवोद्गार काढले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमुंबई अग्निशमन दल देशातच नव्हे तर जगातही सर्वात कार्यक्षम अग्निशमन सेवा दल आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळोवेळी बलिदान देऊन नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. या ऐतिहासिक वाहनाच्या मदतीने अनेक अग्निशमन मोहीमा पार पाडल्या. आज हे वाहन नव्या स्वरूपात दाखल होत आहे ही बाब बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलासाठी तसेच मुंबईकरांसाठीही गौरवास्पद आहे. अशा जुन्या व ऐतिहासिक  विविध वारशांचे जतन व संवर्धन करणे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

नॅशनल सोसायटी ऑन the friend of The trees



 

प्रजासत्ताक दिन संचलनात ‘कोकण पर्यटन’ चित्ररथाने वेधले लक्ष

 प्रजासत्ताक दिन संचलनात कोकण पर्यटन’ चित्ररथाने वेधले लक्ष

 

मुंबईदि. 26 : प्रजासत्ताक दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदनानंतर झालेल्या संचलनात पर्यटन मंत्री  शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला पर्यटन विभागाचा कोकण पर्यटन’ हा चित्ररथ विशेष आकर्षण ठरला.

यावेळी कोकण विभागाच्या उपसंचालक (पर्यटन) डॉ. प्रज्ञा मनोहर यांच्यासह पर्यटन विभागातील अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोकणच्या समृद्ध संस्कृतीऐतिहासिक वारसा आणि आधुनिक पर्यटन सुविधांचा सुरेख संगम या चित्ररथातून सादर करण्यात आला.

या चित्ररथाच्या माध्यमातून कोकणच्या विस्तीर्ण किनारपट्टीसह तेथील प्रमुख पर्यटन स्थळांचे प्रभावी चित्रण करण्यात आले. अरबी समुद्र किनाऱ्यांचे रक्षण करणाऱ्या अभेद्य विजयदुर्ग किल्ल्याची भव्य प्रतिकृती तसेच गणपतीपुळे मंदिराचा देखावा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होता. यासोबतच कोकणातील निसर्गरम्य होम स्टे आणि ग्रामीण पर्यटनाचा देखावास्कुबा डायव्हिंगडॉल्फिन प्रतिकृती आणि जलक्रिडांमधील लोकप्रिय बनाना राइडचे कलात्मक सादरीकरण करण्यात आले.

कोकणच्या दळणवळणात क्रांती घडवून आणणाऱ्या रो-रो फेरीची प्रतिकृती हे चित्ररथाचे मुख्य आकर्षण ठरले. यामुळे कोकणचे नैसर्गिक सौंदर्यसाहसी पर्यटन आणि आधुनिक पायाभूत सुविधा यांचा एकत्रित अनुभव प्रेक्षकांना घेता आला.

या चित्ररथासोबत पर्यटन विभागाने सादर केलेले विशेष गीतही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या गीतातून कोकणचे पर्यटन प्रभावीपणे मांडण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील मुख्य संचलनात सहभागी झालेल्या या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पर्यटन वैभवाचा डंका पुन्हा एकदा देशभर गाजला.

            पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे म्हणाले कीप्रजासत्ताक दिनाच्या संचलनात कोकण पर्यटन’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथाचा आम्हाला अभिमान असून कोकणचा नैसर्गिकसांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा देशभर पोहोचवण्याचा हा प्रभावी प्रयत्न आहे. या माध्यमातून महाराष्ट्राच्या पर्यटन क्षमतेचे सशक्त दर्शन घडले आहे. हा उपक्रम कोकण पर्यटनाला नवी ऊर्जा देणारा ठरेल.    

पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील म्हणाले कीकोकण पर्यटन चित्ररथातून पारंपरिक वारसा आणि आधुनिक पर्यटन सुविधा यांचा समतोल साधण्यात यश आले आहे. विजयदुर्गगणपतीपुळेजलक्रीडा आणि रो-रो फेरीसारख्या संकल्पनांमुळे प्रेक्षकांना कोकणचा सर्वांगीण अनुभव मिळाला. हा चित्ररथ महाराष्ट्र पर्यटनाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल.

प्रगतीचा संदेश देणारे चित्ररथ

 प्रगतीचा संदेश देणारे चित्ररथ

 

ग्रामविकास व पंचायतराज विभागमराठी भाषा विभागसहकारपणन आणि वस्त्रोद्योग विभागपाणी पुरवठा व स्वच्छता विभागसार्वजनिक आरोग्य विभागसामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागपर्यटन विभागजलसंपदा विभागइतर मागास बहुजन कल्याण विभागअन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागसांस्कृतिक कार्य विभागआदिवासी विकास विभागकृषी विभागगृह विभागवाहतूकअल्पसंख्याक विभागउच्च व तंत्रशिक्षण विभागकामगार विभागकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागगृहनिर्माण विभागवन विभाग आणि ऊर्जा विभागाच्या चित्ररथांनी संचलनात सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्मयी भजक आणि पल्लवी मुजुमदार यांनी केले. तरकिरण शिंदेअरुण शिंदेविवेक शिंदे आणि कु.आराध्या शिंदे यांनी सनई चौघडा वादन केले.

 

संचलनात विविध पथकांचा सहभाग

 संचलनात विविध पथकांचा सहभाग

प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात भारतीय नौदलगोवा पोलीसराज्य राखीव पोलीस बलबृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दलबृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथकबृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दलमुंबई लोहमार्ग पोलीस दलगडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे सी-६० पथकगृह रक्षक दल (पुरुष)बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दलगृहरक्षक दल (महिला)राज्य उत्पादन शुल्क विभागवन विभाग: मुंबई अग्निशमन दलबृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलसुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हाराष्ट्रीय सेवा योजना (मुले/मुली)सी.कॅडेट कोअर (मुली)सी.कॅडेट कोअर (मुले)रोड सेफ्टी पेट्रोल (मुली) रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलदहिसर मुंबईरोड सेफ्टी पेट्रोल (मुले) सेंट पॉल हायस्कूलदादरमुंबईरोड सेफ्टी पॅट्रोल (मुली) सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूलदादरमुंबईरोड सेफ्टी पेट्रोल (मुले) डॉ.अँटोनिओ डा सिल्वा हायस्कूल दादरमुंबईरोड सेफ्टी पेट्रोलमनपा (मुली) वामनराव महाडिक उर्दू आणि पंतनगर मनपा इंग्रजी शाळाघाटकोपर (पूर्व)मुंबईरोड सेफ्टी पेट्रोल मनपा (मुले) जी.व्ही. स्कीम मुलुंड आणि क.दा. गायकवाड हिंदी शाळासायन भोईवाडामुंबईभारत स्काऊट गाईड मनपा शाळा (मुली)भारत स्काऊट गाईड मनपा शाळा (मुले)स्टुडंट पोलीस कॅडेट (मुले/मुली) पुणे विद्याभवन पंतनगर आणि शिवाजी टेक्निकल स्कूल पंतनगरमुंबई यांच्यासह पाईप बँडमहिला पाईप बँडब्रास बँड पथकअश्वदल पोलीस पथक सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे भारतीय नौदलबृहन्मुंबई पोलीस दलमहिला निर्भया पथक आणि बृहन्मुंबई अग्निशमन दलाच्या वाहनांनी संचलनात सहभाग घेतला. नौदलाचे कमांडर पंकज बघेल

शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध

 शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध

शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असून अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवून राज्याच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महाराष्ट्र नवे विक्रम प्रस्थापित करीत असून मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत प्रकल्पसमृद्धी महामार्ग आणि शक्तिपीठ महामार्ग यांसारखे प्रकल्प राज्याच्या विकासाला गती देणारे ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये भारतीय संस्कृतीत रुजलेली

 स्वातंत्र्यसमता व बंधुता ही मूल्ये भारतीय संस्कृतीत रुजलेली

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करतसंविधान निर्मितीसाठी त्यांनी व संविधान समितीच्या सदस्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. स्वातंत्र्यसमता व बंधुता ही मूल्ये भारतीय संस्कृतीत रुजलेली असून त्यांचे प्रभावी प्रतिबिंब भारतीय संविधानात दिसून येतेअसे त्यांनी सांगितले. भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेली बंधुतेची भावना संविधानाच्या केंद्रस्थानी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

भारताची महत्त्वपूर्ण जागतिक शक्ती व अर्थव्यवस्था म्हणून ओळख

 भारताची महत्त्वपूर्ण जागतिक शक्ती व अर्थव्यवस्था म्हणून ओळख

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताकडे आज एक महत्त्वपूर्ण जागतिक शक्ती व अर्थव्यवस्था म्हणून पाहिले जात असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीहे यश संविधानाने दिलेल्या लोकशाही व्यवस्थेमुळेच शक्य झाले आहे. महाराष्ट्र ही संतांची व वीरांची भूमी असून छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या स्वाभिमानाच्या मूल्यांवर राज्याची प्रगती सुरू आहे. विदर्भमराठवाडाउत्तर महाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रकोकण आणि मुंबईसह राज्यातील सर्व भागांमध्ये गुंतवणूक व रोजगारनिर्मिती होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

 

पायाभूत प्रकल्पांविषयी

 पायाभूत प्रकल्पांविषयी...

· छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो लाईन 8 जोडणीस मान्यता.

· मेट्रो मार्गाची एकूण लांबी 35 किलोमीटर, भूमिगत मार्ग 9.25 किलोमीटर, उन्नत मार्ग 24.636 किमी, एकूण 20 स्थानके, 6 स्थानके भूमिगत, 14 स्थानके उन्नत.  

· छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानक ते घाटकोपर (पूर्व) पर्यंत भूमिगत स्थानके.

· घाटकोपर (पश्चिम) स्थानक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल दोन स्थानकापर्यंत उन्नत स्थानके, दोन स्थानकांतील सरासरी अंतर 1.9 किलोमीटर.

· 30.7 हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता, भूसंपादनासाठी 388 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एकूण 22 हजार 862 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाची निर्मिती, मार्गाची एकूण लांबी 66.15 किलोमीटर, या प्रकल्पासाठी एकूण 3 हजार 954 कोटीच्या खर्चास मान्यता. या प्रकल्पाला विशेष बाब म्हणून 50 टक्के भूसंपादन झाल्यास कार्यादेश देण्याचा निर्णय.

गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे - कोनसरी - मूळचेरा - हेदरी - सुरजागड महामार्गाच्या सुधारित 85.76 किलोमीटर लांबीस मान्यता, चार पदरी सिमेंट काँक्रिटकरणाचा महामार्ग.

प्रकल्प विहित कालमर्यादेत पूर्ण झाल्यास कंत्राटदाराला प्रोत्साहन मूल्य

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेपायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यात यावी. कुठल्याही परिस्थितीत कामे रेंगाळू नये,  काम पूर्ण होण्यास विलंब लागल्यास प्रकल्पाच्या खर्चामध्ये वाढ होते. नागपूर ते गोंदियाभंडारा ते गडचिरोली या समृद्धी महामार्गाच्या विस्तारित कामांना गती द्यावी.  प्रकल्प कार्यादेश देतानाच प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याची अट करण्यात यावी.

 

प्रकल्प विहित कालमर्यादेत पूर्ण झाल्यास कंत्राटदाराला प्रोत्साहन मूल्य आणि विहित कालावधीपेक्षा  जास्त वेळ लागल्यास दंडाची व्यवस्था असलेली ऑटो मोडवरील यंत्रणा विकसित करावी. गडचिरोली जिल्ह्यातील महामार्गाचे काम करीत असताना रस्त्याच्या बाजूला गॅस वाहिनीसाठी जागेची उपलब्धता असल्याची खात्री करावी. भविष्यात सुरजागडपर्यंत गॅस वाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी आतापासून जागेची तरतूद महामार्गाच्या बाजूला करण्यात यावीअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 

बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवारमुख्य सचिव राजेश अग्रवालअपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्तामहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल गायकवाडमहाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आदी उपस्थित होते.

 

बैठकीमध्ये अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम विभाग) मनीषा म्हैसकर आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सादरीकरण केले.

आपले गाव, आरोग्य संपन्न गाव’ योजना,

 आपले गावआरोग्य संपन्न गाव’ योजनापॉलिएटिव्ह केअरसिकलसेल आजारावरील उपचारवैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया सुलभ करणेवैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन वाढवणेतसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित समावेशन जलद गतीने करणे याबाबत मागण्या मांडण्यात आल्या. याशिवाय आयुष संचालकप्रशिक्षण संचालक आणि नर्सिंग क्षेत्रातील नवीन पदे निर्माण करण्याची आवश्यकताही उपस्थित अधिकाऱ्यांनी मांडली.

या सर्व बाबींवर सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनीराज्यातील आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईलअशी ग्वाही दिली. आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळपायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय साधून दीर्घकालीन सुधारणा करण्यावर शासनाचा भर राहीलअसे त्यांनी स्पष्ट केले.


आरोग्य सेवेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात यावा

 आरोग्य सेवेत एआय’ तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात यावा

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि.16 :- राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षमवेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय -AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात यावाअसे निर्देश  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

वर्षा’ शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.बैठकीत समग्र’ संस्थेच्या वतीने सार्वजनिक आरोग्य सेवा बळकटीकरणाबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले कीआधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढेलउपचार अधिक अचूक व वेळेत मिळतील आणि ग्रामीण तसेच दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा प्रभावीपणे पोहोचवता येतील. आजच्या डिजिटल युगात आरोग्य व्यवस्थेचे डिजिटायझेशन आणि एआय आधारित उपाययोजना अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य संस्थांचे स्टार रेटिंगआरोग्य सेवांचा समीक्षा अहवालआरोग्य हेल्पलाईनआरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणतसेच सेवा गुणवत्तेचे नियमित रिव्ह्यू यांसारख्या उपक्रमांचा समावेश होता. या उपक्रमांमुळे नागरिकांचा आरोग्य सेवांवरील विश्वास अधिक दृढ होईलअसे श्री.फडणवीस यांनी  नमूद केले.

स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या बातम्यांमध्ये प्रसारमाध्यमांना सूचना भारत निवडणूक आयोगाचे’ चिन्ह वापरू नका

 स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या बातम्यांमध्ये प्रसारमाध्यमांना सूचना भारत

निवडणूक आयोगाचे’ चिन्ह वापरू नका

         – मुख्य निवडणूक अधिकारी

 

मुंबईदि. : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत प्रसारमाध्यमांकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाशी संबंधित चिन्हेइमारतींची दृश्ये किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या छायाचित्रांचा वापर केल्याची काही प्रकरणे दिसून आली आहेत. यातील संभ्रम दूर करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारीमहाराष्ट्र यांनी प्रसारमाध्यमांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

 

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले कीसंसदीयविधानमंडळ तसेच राष्ट्रपती उपराष्ट्रपती निवडणुका घेण्याची जबाबदारी भारत निवडणूक आयोगाची असून राज्यात या कामकाजासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. सध्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय अधिकारी एस. चोक्कलिंगम कार्यरत आहेत.

 

दुसरीकडेसंविधानातील अनुच्छेद 243के व 243झेडए नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अधीक्षणसंचालननिर्देशन आणि नियंत्रणाची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे. महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयुक्त पदावर निवृत्त प्रधान सचिव दिनेश वाघमारे कार्यरत आहेत.

 

दोन्ही आयोगांची कार्यक्षेत्रे वेगवेगळी व स्वतंत्र असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाचे बोधचिन्हअधिकारीइमारती अथवा तत्सम दृश्यांचा वापर करणे चुकीचे असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

 

तसेचराज्य निवडणूक आयोगाशी संबंधित बातम्यांमध्ये झालेल्या अशा चुकांची तातडीने दुरुस्ती करून संबंधित व्हिडिओ समाजमाध्यमांतून हटवावेतअसे आवाहनही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रसारमाध्यमांना करण्यात आले आहे.

000

शासकीय जमिनींच्या भाडेपट्टीचा कालावधी तीसहून अधिक वर्षे वाढविण्यास मान्यता

 शासकीय जमिनींच्या भाडेपट्टीचा कालावधी तीसहून अधिक वर्षे वाढविण्यास मान्यता

 

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता१९६६ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम१९७१ मधील तरतुदी अन्वये शासकीय जमीन विविध कारणांसाठी ३० वर्षांसाठी भाडेप‌ट्ट्याने देण्यात येतात. त्यांचा कालावधी पुढे ४९ वर्षांपर्यंत वाढवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

शासनाच्या विविध प्रशासकीय विभागाच्या मालकीच्या अथवा महसूल विभागाने विशिष्ट प्रयोजनासाठी त्या विभागाकडे हस्तांतरित केलेल्या तसेच त्यांच्या अख्यत्यारितील महामंडळमंडळप्राधिकरणे यांच्या मालकीच्या अथवा हस्तांतरित केलेल्या शासकीय जमिनी महामंडळमंडळप्राधिकरणे यांच्या उत्पन्न वाढीसाठी विविध व्यावसायिक प्रयोजनास्तव विविध संस्थांना ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्यांवर दिल्या जात होत्या. अशा जमिनी आता आवश्यकतेनुसार प्रथमतः जास्तीत जास्त ४९ वर्षापर्यंत व त्यानंतर कोणत्याही अटी व शर्तीचे उल्लंघन झालेले नसल्याससंबंधित विभागाला आवश्यकतेनुसार या भाडेपट्ट्याचे पुन्हा एकवेळ जास्तीत जास्त ४९ वर्षांच्या मर्यादेत नुतनीकरण करुनयोग्य तो भाडेपट्टा आकारुन जमीन भाडेपट्ट्याने देता येतील.

तसेचसध्या भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींचे संभाव्य नूतनीकरणभाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींच्या भुईभाड्यामध्ये ठराविक निश्चित मुदतीत वाढ तसेच भुईभाड्याची रक्कम भाडेपट्टाधारकाकडून नियमितपणे शासन जमा करण्यात येईल व त्यावर योग्यप्रकारे संनियंत्रण संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांकडून ठेवण्यात येणार आहे.

धुळे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचे पुनरूज्जीवन, · १५६ कोटी ९० लाखांचा निधी देणार

 धुळे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचे पुनरूज्जीवन,

·         १५६ कोटी ९० लाखांचा निधी देणार

 

धुळे जिल्ह्यातील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या पुनरूज्जीवनाचा प्रस्ताव मान्य करण्यास आणि तो राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडे पाठविण्यास राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

राज्यातील सहकारी सुतगिरण्यांना आधुनिकीकरणविस्तारीकरणपुनर्वसन आणि उभारणी करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. सहकारी सुतगिरणीच्या पुनरुज्जीवनासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडून निधी प्राप्त करुन घेऊन तो सुतगिरणीला दिला जातो. या योजनेनुसार धुळे जिल्ह्यातील मोराणे येथील जवाहर शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या पुनरुज्जीवनासाठी १५६ कोटी ९ ० लाख रुपयांचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. हा प्रस्ताव राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडे पाठविण्यासही मान्यता देण्यात आली.

धुळे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचे पुनरूज्जीवन, · १५६ कोटी ९० लाखांचा निधी देणार

 धुळे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचे पुनरूज्जीवन,

·         १५६ कोटी ९० लाखांचा निधी देणार

 

धुळे जिल्ह्यातील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या पुनरूज्जीवनाचा प्रस्ताव मान्य करण्यास आणि तो राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडे पाठविण्यास राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

राज्यातील सहकारी सुतगिरण्यांना आधुनिकीकरणविस्तारीकरणपुनर्वसन आणि उभारणी करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. सहकारी सुतगिरणीच्या पुनरुज्जीवनासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडून निधी प्राप्त करुन घेऊन तो सुतगिरणीला दिला जातो. या योजनेनुसार धुळे जिल्ह्यातील मोराणे येथील जवाहर शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या पुनरुज्जीवनासाठी १५६ कोटी ९ ० लाख रुपयांचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. हा प्रस्ताव राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडे पाठविण्यासही मान्यता देण्यात आली.

0000

Featured post

Lakshvedhi