Saturday, 20 December 2025

५० एकर किंवा त्यापेक्षा मोठ्या खासगी, शासकीय किंवा निमशासकीय

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की५० एकर किंवा त्यापेक्षा मोठ्या खासगीशासकीय किंवा निमशासकीय जमिनींवर आता एकत्रितपणे झोपडपट्टी पुनर्विकास योजना करण्यात आली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात मुंबईतील अँटॉप हिलकृष्ण नगर आणि केतकीपाडा (बोरिवली)गोपीकृष्ण नगर (दहिसर),ओशिवरागोवंडीचित्ता कॅम्प (ट्रॉम्बे)चेंबूरटागोर नगर (विक्रोळी)विक्रोळी पार्कसाईटभांडुप या १७ प्रमुख ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. यामुळे मुंबईतील लाखो झोपडपट्टीवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.  

यासंदर्भात निवेदन करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणालेमुंबईतील ५० एकर किंवा त्यापेक्षा मोठ्या खासगीशासकीय किंवा निमशासकीय जमिनींवर आता एकत्रितपणे पुनर्विकास केला जाणार आहे. छोट्या-छोट्या एसआरए प्रकल्पांऐवजी आता संपूर्ण परिसराचा कायापालट करण्यासाठी ही योजना राबवली जाईल. या महत्त्वाकांक्षी योजनेला राज्य मंत्रिमंडळाने ७ ऑक्टोबर २०२५ रोजी मान्यता दिली असून१३ नोव्हेंबर २०२५ रोजी याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi