Thursday, 23 October 2025

दिवाळी अंक मराठी साहित्य, संस्कृतीचा उत्सव

 दिवाळी अंक मराठी साहित्य, संस्कृतीचा उत्सव

निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला

 

नवी दिल्लीदि. 16 :  महाराष्ट्रातील समृद्ध दिवाळी अंक परंपरेने मराठी साहित्य आणि संस्कृतीला वैचारिक उंची प्रदान केली आहे. दिवाळी अंक हे केवळ साहित्य नाहीतर मराठी माणसाच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक जाणिवांचा उत्सव असल्याचे प्रतिपादन  महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा  सचिव आर. विमला यांनी आज येथे व्यक्त केले.

            दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित दिवाळी अंक प्रदर्शन २०२५चे उद्घाटन आयुक्त आर. विमला  आणि सकाळ माध्यम समूह संपादक सम्राट फडणीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी श्रीमती विमला यांनी सांगितले की दिवाळी अंक नवोदित लेखकांपासून ज्येष्ठ साहित्यिकांपर्यंत सर्वांना एक व्यासपीठ देणारे आहेत.  दिवाळी अंक हे मराठी वाचकांसाठी 'वाचनाचा महोत्सवठरतात. कथाकवितानिबंधसमीक्षा आणि सांस्कृतिक विषयांवरील लेखांनी समृद्ध असलेले हे अंक वाचकांची अभिरुची संपन्न करतात. दिल्लीतील मराठी वाचकांसाठी हे प्रदर्शन म्हणजे खऱ्या अर्थाने साहित्यिक पर्वणी आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावाअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            सकाळ माध्यम समूहाचे संपादक सम्राट फडणवीस यांनी  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. परिचय केंद्राची माध्यमांसोबत राहण्याची आणि पाठिंबा देण्याची भूमिका  अधोरेखित करून  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्राची सर्वांगीण आणि सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

महाराष्ट्र परिचय केंद्राचे हे प्रदर्शन दिल्लीतील मराठी भाषिकांसाठी सांस्कृतिक मेजवानी आहे.  वाचकांनी या प्रदर्शनास भेट देवून मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेचा आनंद घ्यावाअसे आवाहन प्रभारी उपसंचालक मनीषा पिंगळे यांनी केले.

या कार्यक्रमाला सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडेस्मिता शेलारमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी संचालक गणेश रामदासीसदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपतेमाध्यम प्रतिनिधीकर्मचारी वर्ग आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते.

प्रदर्शनात 'गृहलक्ष्मी', 'आवाज', 'मिळून साऱ्याजणी', 'चार चौघी', 'श्री व सौ', 'अंतर्नाद', 'जत्रा', 'किशोर', 'लोकसत्ता', 'महाराष्ट्र टाईम्स', 'लोकमत-दिपोत्सव', 'साप्ताहिक सकाळ', 'झी मराठी', 'धनंजय', 'साधना', 'सामना', 'अक्षरधारा', 'प्रपंच', 'छावा', 'मैत्र', 'निनाद', 'हंस', 'ऋतुरंग', 'स्वरप्रतिभायांसारखे १२० हून अधिक विशेषांक उपलब्ध आहेत. याशिवाय हस्तलिखित अंकांचाही समावेश आहे.

हे प्रदर्शन २४ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत विनामूल्य खुले राहणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi