Thursday, 23 October 2025

महाराष्ट्र आता ‘क्वांटम कॉरिडॉर’ च्या नकाशावर

 वृत्त क्र. ४१६१

महाराष्ट्र आता क्वांटम कॉरिडॉर’ च्या नकाशावर

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

क्वांटम कॉरिडॉर स्थापनेसाठी आयओएनक्यू (अमेरिका) आणि स्कैंडियन एबी (स्वीडन) यांच्याशी महाराष्ट्राचा त्रिपक्षीय करार

 

मुंबईदि. १६ : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम कॉम्प्युटिंग माध्यमातून महाराष्ट्राला तंत्रज्ञानातील जागतिक नकाशावर नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासनअमेरिकेची आयओएनक्यू आणि स्वीडनची स्कैंडियन एबी या दोन नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला. या कराराच्या माध्यमातून महाराष्ट्र आता क्वांटम कॉम्प्युटिंग नकाशावर येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीआजच्या जगात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम कॉम्प्युटिंग हे जागतिक अर्थव्यवस्थेचे दोन प्रमुख स्तंभ बनले आहेत. महाराष्ट्र शासनाला क्वांटम कॉरिडॉर’ स्थापनेसाठी भागीदारी करताना अभिमान वाटतो. हा उपक्रम राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवेल. शासन या प्रवासात सर्वतोपरी सहकार्य करेल आणि उद्योगांना अखंड वाढीसाठी सुलभ वातावरण उपलब्ध करून देईल.

 

आयओएनक्यूमेरीलँडअमेरिका ही क्वांटम कॉम्प्युटिंग क्षेत्रातील अग्रणी कंपनी असून ट्रॅप्ड-आयन तंत्रज्ञानासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. ही कंपनी ॲमेझॉन ब्रॅकेटमायक्रोसॉफ्ट अझ्यूर आणि गुगल क्लाउड यासारख्या क्लाउड प्लॅटफॉर्मद्वारे क्वांटम प्रणालींना प्रवेश उपलब्ध करून देते. ओ आयओएनक्यूचे तंत्रज्ञान फार्मास्युटिकल संशोधनलॉजिस्टिक्सफायनान्शियल मॉडेलिंग आणि इतर औद्योगिक क्षेत्रांमध्ये वेगअचूकता आणि शाश्वतता वाढवते. महाराष्ट्रातील डिजिटल परिवर्तन आणि उन्नत तंत्रज्ञानाधारित रोजगार निर्मितीसाठी हे सहकार्य निर्णायक ठरणार आहे.

 

स्कैंडियन एबीगोथेनबर्गस्वीडन ही कंपनी अभियांत्रिकीबांधकामवित्त आणि औद्योगिक पायाभूत सुविधा विकासात कार्यरत आहे. स्कैंडियन एबी आपल्या प्रकल्पांमध्ये क्वांटम-वर्धित ऑप्टिमायझेशनप्रेडिक्टिव अॅनालिटिक्स आणि ऊर्जा कार्यक्षमतेसारख्या तंत्रज्ञानांचा समावेश करून शाश्वत आणि स्मार्ट पायाभूत सुविधा विकसित करत आहे.

 

या सांमजस्य करारप्रसंगी उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईकउद्योग सचिव डॉ. पी. अन्बळगनउद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाहअतिरिक्त विकास आयुक्त वैभव वाघमारे तसेच आयओएनक्यूचे अध्यक्ष जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी निकोलो डी. मासीस्कैंडियन एबीचे संचालक मंडळ हन्ना फिलिपा गेरहार्डसन आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi