Thursday, 16 October 2025

मांढरदेवी पाणीपुरवठा योजनेतील चार गावांचा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवा

 मांढरदेवी पाणीपुरवठा योजनेतील चार गावांचा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवा

-         पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

 

मुंबईदि. 15 : मांढरदेवी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या चार गावांचा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. मंत्रालयात आयोजित पाणीपुरवठा विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटीलपाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेजलजीवन मिशनचे व्यवस्थापकीय संचालक ई रवींद्रमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगा नाईक आणि सहसचिव डॉ. बी.जी. पवारमुख्य अभियंता प्रशांत भामरे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

यासंदर्भातील डीपीआर (तपशील प्रकल्प अहवाल) तयार करावे. महाबळेश्वर पाणीपुरवठा योजनेस अभय योजना सुरू झाल्यानंतर व्याज माफ करून मुद्दल रक्कम टप्प्याटप्प्याने भरण्याची संधी देण्याबाबतही सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi