Thursday, 16 October 2025

कलेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची गती वाढविण्याच्या उद्देशाने

 मंत्री जयकुमार रावल म्हणाले,या कार्यक्रमाने कलेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची गती वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित सेवेला सर्जनशीलतेचा संदेश’ दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ या दृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन देशातील प्रत्येक नागरिकाने सेवानवोन्मेष आणि राष्ट्रनिर्माणाच्या भावनेने कार्य केलेतर भारत पुन्हा विश्वगुरू म्हणून उभा राहील असेही मंत्री रावल म्हणाले.

           नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या संचालक निधी चौधरी यांनी प्रास्ताविकात एनजीएमएच्या उपक्रमांद्वारे समाज आणि राष्ट्रविकासात कलेच्या भूमिकेबाबत माहिती दिली.

सेवा पर्व २०२५ हा भारत सरकारचा देशव्यापी सांस्कृतिक उपक्रम १७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात आला. सेवा पर्व २०२५ – विकसित भारत के रंगकला के संग या विषयावर ३० सप्टेंबर २०२५ रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमात मुंबईतील विविध शाळांमधील २००० हून अधिक बालकलाकारांनी सहभाग घेतला होता. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi