एमआयडीसीची तूट भरून काढण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात
– विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे
• उद्योग राज्यमंत्री श्री. इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत विधानपरिषद सदस्य
श्री. शशिकांत शिंदे यांच्या तारांकित प्रश्नासंदर्भात बैठक
मुंबई, दि. 28 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) आर्थिक तूट भरून काढण्यासाठी विभागाने योग्य निर्णय घेण्याच्या सूचना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिल्या. विधान भवन, मुंबई येथे आज दिनांक 28 ऑक्टोबर, 2025 रोजी पावसाळी अधिवेशन – 2025 मध्ये विधानपरिषद सदस्य श्री.शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्न क्र.3005 अन्वये महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाची तूट भरुन काढण्यासाठीची उपाययोजना, या विषयासंदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली, त्याप्रसंगी त्यांनी ही सूचना केली.
No comments:
Post a Comment