एमआयडीसीच्या संदर्भात विविध विषयासंबंधी उपस्थित केले जाणारे मुद्दे, पाणी दरवाढ, एमआयडीसीच्या जमिनी उद्योगांना देतांना दिल्या जाणाऱ्या सवलती, त्यामुळे निर्माण होणारी तूट, तसेच भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगांना अटी घालण्याबाबतची उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा झाली.
या अनुषंगाने सभापती प्रा. राम शिंदे यांनी उद्योग विभागाला बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या सर्व मुद्यांवर प्रभावी उपाययोजना आखण्याच्या आणि तूट भरून काढण्यासाठी ठोस निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या.
००००
No comments:
Post a Comment