कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे केले
सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन
वाशीम जिल्ह्यात २ ऑक्टोबरपर्यंत तीन टप्प्यात विविध उपक्रम राबविणार
मुंबई दि. १७ : वाशीम जिल्ह्याला अधिक सुसज्ज व सेवाभिमुख बनवण्यासाठी शासनाच्या सेवा जनसामान्य नागरिकांपर्यंत पोहचणं महत्वाचं आहे. सेवा पंधरवडा म्हणजे फक्त योजनांचा आराखडा नाही, तर शासनाच्या संवेदनशीलतेचे आणि उत्तरदायित्वाचे प्रतिक आहे. या उपक्रमाचा लाभ सामान्य नागरिक, शेतकरी आणि घराचे स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला मिळायला हवा. या अभियानात सर्व अधिकारी, कर्मचारी, जनप्रतिनिधी व नागरिक यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास हा उपक्रम नक्कीच यशस्वी होईल, असे मत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
वाशीम जिल्ह्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिनानिमित्त आजपासून २ ऑक्टोबरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 'सेवा पंधरवडा' राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांनी भाषणाची सुरुवात केली.
No comments:
Post a Comment