"शासनाच्या सेवा जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे हेच उद्दिष्ट असावे. सेवा पंधरवडामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान होणार असल्याचे सर्वांनी जोमाने काम करावे. तसेच तीन टप्प्यात होणाऱ्या सेवा पंधरवड्यामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ वाटप व सेवा द्याव्यात" असे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी केले.
सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत वाशीम जिल्ह्यात पाणंद रस्ते विषयक मोहिमेंतर्गत शिवार फेऱ्यांचे आयोजन करणे, गाव नकाशांवर नोंद असलेल्या व नसलेल्या रस्त्यांचे वर्गीकरण करणे, शिव/पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे, रस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे तसेच विशिष्ट क्रमांक निश्चित करणे, पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण निष्कासनाची कार्यवाही करणे यासारख्या बाबी राबविण्यात येणार आहेत. तसेच 'सर्वांसाठी घरे' या उपक्रमांतर्गत शासकीय जमिनीवरील रहिवासी प्रयोजनासाठी असलेली अतिक्रमणे नियमानुकूल करणे, पात्र लाभार्थ्यांना जमिनींचे पट्टे वाटप आदिंच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment