Thursday, 18 September 2025

सेवा पंधरवडा अभियानांतर्गत वाशीम जिल्ह्यामध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार

 सेवा पंधरवडा अभियानांतर्गत वाशीम जिल्ह्यामध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याव्दारे विविध नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे आलेल्या असून त्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येणार आहेत. What's app व्दारे नागरिकांना प्रमाणपत्रदाखलेतक्रार निवारण यांसारख्या सुविधा दिल्या जाणार आहेत. ऑनलाईन सदनिका विक्री नाहरकत प्रमाणपत्रसुद्धा उपलब्ध होणार आहेत. या कालावधीत सामाजिक सहाय्याच्या योजना राबवून डीबीटीव्दारे थेट खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येणार आहे. लोकअदालतपेन्शन केसेसशिधापत्रिका वाटपवैद्यकीय उपचार दाखला देणेआयुष्यमान भारत कार्ड देणे यांसारखे उपक्रम याअभियानांतर्गत राबविण्यात येऊन पुढे या सेवा सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहेत. कृत्रिम बुध्दीमत्ता व ब्लॉकचेन या तंत्रज्ञानांचा तसेच जिओ टॅगिंगचा वापर करून शासकीय संसाधनांची माहिती एकत्रित केली जाणार आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे नागरिकांना अनेक सुविधा थेट ऑनलाईन उपलब्ध होऊन जीवनमान सुकर होणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi