महसूल विभागीय स्तरावरील विजेत्या स्पर्धकाला प्रथम पारितोषिक म्हणून 25 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक रुपये 15 हजार, तृतीय पारितोषिक 10 हजार, उत्तेजनार्थ विजेत्यास 5 हजार अशा स्वरुपात पारितोषिक दिले जाईल. या स्पर्धेतील राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक म्हणून 75 हजार रुपये, तृतीय पारितोषिक म्हणून 50 हजार रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून 25 हजार रुपये देण्यात येईल. तर महाराष्ट्र व भारताबाहेरील विजेत्या गटातील स्पर्धकाला प्रथम क्रमांकाचे 1 लाख रुपये बक्षीस, द्वितीय क्रमांकासाठी 75 हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी 50 हजार रुपये, उत्तेजनार्थ म्हणून 25 हजार रुपये देण्यात येतील.स्पर्धेच्या नोंदणीकरिता गुगल फॉर्म तयार करण्यात आला असून filmcitymumbai.org या संकेतस्थळावर तसेच महामंडळाच्या सोशल मीडिया हँडल्सवर उपलब्ध आहे, असे दादासाहेब फाळके चित्रनगरीकडून कळविण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment