Wednesday, 27 August 2025

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अंमलबजावणी यंत्रणा

 गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन

प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

महाराष्ट्र चित्रपटरंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अंमलबजावणी यंत्रणा

 

मुंबई, दि. 27: सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड.आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून यंदा गणेशोत्सवाला रील स्पर्धेच्या माध्यमातून देश-विदेशात नवे आयाम मिळणार आहेत. यंदा प्रथमच महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभागमहाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यावतीने रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागासाठी 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी आणि रील अपलोड करायचे आहेत.

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणारी ही स्पर्धा राज्यातील महसूल विभागीय स्तरराज्यस्तर आणि महाराष्ट्राबाहेर व भारताबाहेरील खुला गट अशा तीन गटात होईल. रीलसाठी पर्यावरण संवर्धनस्वदेशीगडकिल्लेसंस्कृतीऑपरेशन सिंदूर या थीम मध्यवर्ती ठेवून 30 सेकंद ते 60 सेकंदापर्यंत रील बनविणे अपेक्षित आहे. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi