Friday, 18 July 2025

जळगाव जिल्ह्यातील अमली पदार्थ विक्री प्रकरणात सर्फराज जावेद भिस्तीवर गुन्हा दाखल

 जळगाव जिल्ह्यातील अमली पदार्थ विक्री प्रकरणात

सर्फराज जावेद भिस्तीवर गुन्हा दाखल

 

मुंबई, दि. १७ : जळगाव जिल्ह्यातील शाहूनगर परिसरातील अमली पदार्थ विक्री प्रकरणात सर्फराज जावेद भिस्ती यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.तसेच पोलिस उपनिरीक्षक श्री.पोटे यांना याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. भोयर म्हणालेया संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगारावर कारवाई केली जाईल. तसेच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांची चौकशी करून चौकशीमध्ये जर दोषी आढळले तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे मंत्री श्री. भोयर यांनी सभागृहात  सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi