Tuesday, 29 July 2025

कृष्णा कालव्यातील पाण्याची गळती थांबविण्यासाठी अस्तरीकरणाची कामे करण्यात येणार

 कृष्णा कालव्यातील पाण्याची गळती थांबविण्यासाठी

अस्तरीकरणाची कामे करण्यात येणार

- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 

मुंबईदि. १८ : कराडजवळील कृष्णा कालव्याच्या पाण्याची गळती थांबविण्यासाठी अस्तरीकरणाचे काम सुरू केले जात असल्याची माहिती जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

विधानपरिषदेत कृष्णा कालव्याच्या पाण्याची गळती थांबवून वहन क्षमता वाढविण्यासंदर्भात सदस्य शशिकांत शिंदे यांनी प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना श्री. विखे पाटील बोलत होते.

जलसंपदा मंत्री श्री. पाटील म्हणाले कीकालव्याच्या पडझड झालेल्या भागांची दुरुस्ती आणि अस्तरीकरणाची विशेष दुरुस्ती कामे प्रगतीपथावर आहेत. कृष्णा कालव्याद्वारे 1350 हेक्टर जमिन ओलिताखाली आणण्यासाठी कालव्याचे अस्तरीकरण करण्यात येणार असून यासंदर्भातील कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi