सीबीएसई’ अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा
सविस्तर इतिहासाच्या समावेशासाठी केंद्र शासनाकडे शिष्टमंडळ घेऊन जाणार
- शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
मुंबई, दि. १८ : ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहास अधिक सविस्तर, अभ्यासपूर्ण असावा यासाठी केंद्र शासनाकडे राज्याचे शिष्टमंडळ घेऊन पाठपुरावा करण्यात येईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.
‘सीबीएसई’ अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहासाचे लेखन अपुरे असल्याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी विधानपरिषदेत प्रश्न विचारला होता. त्यावेळी श्री भोयर यांनी उत्तर दिले.
शालेय शिक्षण मंत्री डॉ. भोयर म्हणाले की, ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहास अपुरा आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री यांनी केंद्रीय मंत्री यांना भेटून सविस्तर व अभ्यासपूर्ण इतिहासाचा समावेश करण्याची विनंती केली आहे. पुढील काळात यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येऊन आवश्यक वाटल्यास केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ घेऊन जाण्यात येईल. तसेच नवीन शिक्षण धोरणानुसार अभ्यासक्रम तयार करताना राज्याचा इतिहास व भूगोल यासंदर्भात सविस्तर माहिती असावी याची काळजी घेतली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या चर्चेत सदस्य सत्यजित तांबे, भावना गवळी, अमित गोरखे यांनी सहभाग घेतला
No comments:
Post a Comment