Tuesday, 29 July 2025

सागरी सुरक्षा उपाय आणि अवैध धंद्यांवरील कारवाई मुळे राज्यात सागरी मत्स्योत्पादनात तीन हजार मेट्रिकटन वाढ

 सागरी सुरक्षा उपाय आणि अवैध धंद्यांवरील कारवाई मुळे

राज्यात सागरी मत्स्योत्पादनात तीन हजार मेट्रिकटन वाढ

मत्स्योत्पादन व बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. १८ :- राज्याच्या सागरी सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाय योजना आणि सागरी किनाऱ्यावरील अवैध धंद्यांवर करण्यात आलेली कारवाई यामुळे राज्यातील सागरी मत्स्योत्पादनामध्ये तीन हजार मेट्रिक टन वाढ झाल्याची माहिती मत्स्योत्पादन व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी विधानपरिषदेत दिली. नियम २६० अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावास उत्तर देताना मंत्री राणे बोलत होते.

  सागरी सुरक्षा आणि मत्स्योत्पादन वाढ या दोन गोष्टीवर शासन लक्ष केंद्रित करून काम करत असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले कीगस्ती नौकांच्या माध्यमातून १ हजार १६५ड्रोनच्या माध्यमातून १ हजार ८०३आणि पावसाळी मासेमारी उल्लंघन प्रकरणी ३६ याप्रमाणे गेल्या आठ महिन्यात कारवाई करण्यात आली आहे. मासेमारीला १०० टक्के कृषी दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य आहे. मिरकर वाडारत्नागिरी येथे २२ कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात येत आहेत. कोकणातील प्रवास सोपा व्हावा यासाठी ‘एम टू एम’ रो रो सर्व्हिस येत्या १५ दिवसात सुरू करण्यात येत आहे. तारापूर मत्स्यालयासाठी ३५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून जागतिक दर्जाचे मत्स्यालय तयार करण्यात येणार आहे. रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत असून वाढवण बंदरासाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी सामंजस्य करार करण्यात आला असून ‘आय टी आय’ मध्ये या विषयी कोर्स सुरू करण्यात येत असल्याचेही मंत्री राणे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi