Monday, 26 May 2025

पोलीस दलाकरिता निवास्थानाचे बांधकाम करण्यात येईल

 पोलीस दलाकरिता निवास्थानाचे बांधकाम करण्यात येईल

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीने सेवा देता यावी, त्यांच्या कुटुंबियाची सोय व्हावी याकरीता नारायणगाव पोलीस स्टेशन परिसरात 10 पोलीस अधिकारी व 100 अंमलदारांकरिता निवासस्थाने बांधकाम करण्यात येईल, असेही श्री. पवार म्हणाले.

       श्री. गिल्ल म्हणाले, नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 19 गावे असून या पोलीस ठाण्यांतर्गत निमगावसावा येथे दरक्षेत्र आहे. या पोलीस ठाण्यांतर्गत 4 अधिकारी व 46 अंमलदार आहेत. पोलीस स्टेशनची इमारत जुनी झाल्याने नवीन इमारतीबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्र राज्य पोलीस निर्माण व कल्याण महामंडळ मर्यादीत मुबंई यांच्याकडून पोलीस स्टेशन करीता 18 एप्रिल 2023 रोजी नवीन इमारत बांधकामास मंजूरी मिळावी. या इमारतीचे 5 कोटी 6 लाख रुपये खर्च करून 27 जानेवारी 2025 रोजी पूर्ण करण्यात आले आहे.

       यामध्ये सोलार पॉवर जनरेशन, वर्षा जलसंधारण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) स्वतंत्र पाण्याची टाकी, फर्निचर व इतर सर्व सुविधांसह सुसज्ज इमारत आहे. नवीन इमारतीमध्ये अभ्यंगत कक्ष, भव्य बैठक कक्ष, हिरकणी कक्ष, विश्रांती कक्ष पोलीस ग्रंथालय, पोलीस कवायत मैदान, रनिंग ट्रॅक, हॉलीबॉल मैदान, जनसेवा केंद्र, महिला मदत केंद्राची निर्मिती केली असून महिला व वृद्धाच्या मदतीकरिता निर्भया पथक, भरोसा सेल, महिला दक्ष संमती, जेष्ठ नागरीक मदत केंद्र आदी कार्यरत आहेत.

मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार 100 दिवस कृती आराखडाअंतर्गत पुणे विभागातून नारायणगाव पोलीस यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे तसेच स्मार्ट ए प्लसप्लस आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.

       नारायणगाव पोलीस ठाण्यापासून जवळच मंचर पारगाव, आळेफाटा, जुन्नर, ओतूर ही पोलीस ठाणी असून नारायणगाव पोलीस ठाणे परिसरात 10 पोलीस अधिकारी व 100 अंमलदाराकरिता निवासस्थाने बांधकाम करण्यास मान्यता मिळण्याची मागणी श्री. गिल्ल यांनी केली.

       यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषीरत्न अनिल मेहर, नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi