नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार
गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागाचा पालकमंत्री असल्यापासून या भागातला नक्षलवादाचा बिमोड करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात मोठ्या प्रमाणात यश देखील आले आहे, याचा मला अभिमान वाटतो. मार्च २०२५ पर्यत नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. गडचिरोलीसारख्या भागात विविध प्रकल्प आले, रोजगार आले त्यामुळे या भागापर्यंत विकास पोहोचला, परिणामी येथील जनतेची मानसिकता बदलली ते मूळ प्रवाहात आले. त्याचाच परिणाम आपण लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत पाहिला तेथे विक्रमी मतदान झाले, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment