Friday, 10 April 2026

न्यायालयाच्या परवानगीने भाडेदर संदर्भातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सायंकाळचे न्यायालय सुरू

 न्यायालयाच्या परवानगीने भाडेदर संदर्भातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सायंकाळचे न्यायालय सुरू करावे या न्यायालयांसाठी जागा नसल्यास भाडेतत्त्वावर जागा घेण्यात याव्यात. यामुळे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली निघतीलअसा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम, १९९९ अंमलबजावणीच्या सक्षमीकरण व सुलभी करणाबाबत

 महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम१९९९  अंमलबजावणीच्या सक्षमीकरण व सुलभी करणाबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेया कायद्याअंतर्गत सक्षम प्राधिकारी म्हणून पोलीस उपायुक्त यांना नियुक्त करावे. पोलीस स्टेशन अथवा पोलिसांचे परिक्षेत्र वाढल्यास त्यानुसार आपोआप सक्षम अधिकारी वाढतीलअशी व्यवस्था करावी. पोलीस उपायुक्तांच्या कामकाज यादीमध्ये सक्षम प्राधिकारी म्हणून काम पाहण्याच्या कामकाजाचा समावेश करण्यासाठी अधिसूचना काढण्याची कार्यवाही करावी. भाडेदर संदर्भातील न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यासाठी १०० विशेष न्यायालये स्थापन करावी. यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी.

 

मुंबईसह अन्य महानगरांमध्ये नोकरी, व्यवसायनिमित्त आलेल्या नागरिकांसाठी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमुंबईसह अन्य महानगरांमध्ये नोकरीव्यवसायनिमित्त आलेल्या नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात भाडेतत्त्वावरील घरे असली पाहिजेत. मागणीनुसार पुरवठा या तत्त्वावर भाडेतत्त्वाने घरे उपलब्ध होतीलयाची काळजी घेण्यात यावी. घरांसाठी मागण्यांसंदर्भातील करारानुसार सर्व कार्यवाही होईलयाबाबतही यंत्रणेने दक्षता घेतली पाहिजे. उपलब्ध असलेल्या भाडेतत्त्वावरील घरांबाबत यंत्रणेने समन्वयाने कार्यवाही केल्यास मालक व भाडेकरू या दोघांनाही अडचण येणार नाहीअसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा

 भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा

-       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी पोर्टलची निर्मिती

 

मुंबईदि. 10 : मुंबईमध्ये नोकरीव्यवसाय निमित्ताने बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांच्याकरिता मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता असल्याने भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा उभारून कार्यान्वित करावीअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी नागरिकांच्या सुविधांकरिता पोर्टल विकसित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

महाराष्ट्र हा आशियातील वेगाने प्रगती करणारा आणि मोठी संधी असलेला प्रदेश

 विनग्रुप कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फाम सान्ह चाऊ म्हणाले कीआम्हाला महाराष्ट्र शासन आणि एमएमआरडी व उद्योग विभागासोबत या महत्त्वाच्या प्रकल्पात सहभागी होताना आनंद आणि अभिमान वाटतो. महाराष्ट्र हा आशियातील वेगाने प्रगती करणारा आणि मोठी संधी असलेला प्रदेश आहे. आमच्या विनग्रुप कंपनीकडे एकात्मिक शहरी विकासइलेक्ट्रिक वाहतूक आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांमध्ये जागतिक अनुभव आहे. दीर्घकालीन आर्थिक विकासपर्यावरणाचे संरक्षण आणि लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आम्ही दर्जेदार आणि उत्तम सुविधा देण्यास कटिबद्ध आहोत.

राज्यात सुरू असलेल्या विकासाच्या पार्श्वभूमीवर विन ग्रुपचे महाराष्ट्रात येणे

 यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीराज्यात सुरू असलेल्या विकासाच्या पार्श्वभूमीवर विन ग्रुपचे महाराष्ट्रात येणे ही आनंददायी आणि सन्मानाची बाब आहे. कंपनी योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करत असून मुंबई व रायगड परिसर हा भविष्यात जागतिक स्तरावर स्पर्धा करणारा सर्वात गतिमान शहरी भाग ठरणार आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर सशक्त आणि गतिमान शहरी वातावरण निर्माण होईल.

 

व्हिएतनामच्या कंपनीची महाराष्ट्रात 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; उद्योग विभाग व ‘एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार

 व्हिएतनामच्या कंपनीची महाराष्ट्रात 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक;

उद्योग विभाग व एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार

विनग्रुपच्या प्रकल्पामुळे आधुनिकएकात्मिक शहरी विकासाला चालना

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

•    व्हिएतनामच्या कंपनीची महाराष्ट्रात 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकउद्योग विभाग व एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार

 

            मुंबईदि. 8 : शाश्वत नागरी विकासऔद्योगिक व पर्यटन वृद्धीनवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रात सुमारे 6.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. यासंदर्भात विन ग्रुप कंपनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभागमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सोबत सामंजस्य करार केला. विन ग्रुप कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राज्यात शाश्वत विकासहरित ऊर्जाआधुनिक पायाभूत सुविधा आणि गतिशील वाहतूक व्यवस्थेला चालना मिळेलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

Featured post

Lakshvedhi