Wednesday, 25 February 2026

जवाहर बालभवन बालकांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्

 जवाहर बालभवन बालकांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे


· ‘बालभवन’ चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन हे केवळ शैक्षणिक किंवा सांस्कृतिक केंद्र नसून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारे प्रेरणादायी व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा बालभवनच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष दादा भुसे यांनी केले.


महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनचा ७४ वा वर्धापन दिन मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झाला. त्यानिमित्त ते बोलत होते.


यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, विभागीय शिक्षण उपसंचालक श्री कंकाळ, बालभवनचे अशासकीय सदस्य प्रशांत भामरे, बालभवनच्या संचालिका निता पाटील आदी उपस्थित होते.


 

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव, विंचूरसह १६ गावे

 राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले कीनाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगावविंचूरसह १६ गावे प्रादेशिक योजनेसाठी २०.१० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच रेट्रोफिटिंगअंतर्गत जलजीवन मिशनच्या मानांकनानुसार दरडोई प्रतिदिन ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने २६.५५ कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सद्या ही योजना नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पाच्या अस्तित्वातील स्त्रोतांतून रेट्रोफिटिंगअंतर्गत प्रस्तावित आहे. या योजनेचे कामपूर्ण झाल्यानंतर लासलगाव व परिसरातील नागरिकांना जलजीवन मिशनच्या मानांकनानुसार दरडोई ५५ लिटर प्रतिदिन नियमित पाणीपुरवठा करता येईलअसेही राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.

000

जलजीवन मिशन अंतर्गत लासलगाव १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

 जलजीवन मिशन अंतर्गत लासलगाव १६ गावे

प्रादेशिक पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

·         राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबईदि. २४ : जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील लासलगाव शहर व परिसरातील १६ गावांसाठी राबविण्यात येत असलेली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना निश्चित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली.

 

विधान परिषद सदस्य पंकज भुजबळ यांनी लासलगाव ही नाशिक जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असून शहराचा झपाट्याने होत असलेला विकास आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेची कामे वेळेत पूर्ण करावीतअशी लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत सदस्य किशोर दराडे यांनीही सहभाग घेतला.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार नाशवंत फळपिकांना हमीभाव लागू नसल्याने आंब्याला

 रोहयो मंत्री भरत गोगावले म्हणाले की२०२५ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १०५.८८ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून १०,५८३.६९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कोकण विभागात ९०,८०० हेक्टर क्षेत्र बाधित असून त्यापैकी २,११५ हेक्टर क्षेत्र आंबा पिकाखाली आहे. कोकणासाठी ८६.७६ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार नाशवंत फळपिकांना हमीभाव लागू नसल्याने आंब्याला हमीभाव देणे शक्य नसल्याचे मंत्री  गोगावले यांनी सांगितले.

०००

उत्तर महाराष्ट्र कनेक्टिव्हिटीसाठी खानदेश एक्सप्रेसवेचा डीपीआर प्रक्रियेत

 उत्तर महाराष्ट्र कनेक्टिव्हिटीसाठी खानदेश एक्सप्रेसवेचा डीपीआर प्रक्रियेत

-राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर

मुंबईदि.२४ : राज्यातील जनतेचा प्रवास सुकर व विनासायास व्हावा. राज्यातील महत्वाच्या शहरांकडे सहा ते आठ तासात पोहचता यावे.  यासाठी राज्यात नियंत्रित द्रुतगती मार्गाचे जाळे निर्माण करण्यास शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्याच अनुषंगाने उत्तर महाराष्ट्राच्या जलद कनेक्टिव्हिटीसाठी जळगावधुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठी १०५ किलोमीटर लांबीच्या खानदेश प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्ग प्रकल्पाचे प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे करण्यात येत असल्याचे राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न

 कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना

जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न

-रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

 

मुंबईदि. २४ : कोकणातील हवामान बदलामुळे आंबा मोहोराचे नुकसान व फळधारणा कमी झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार क्षेत्रीय पाहणी सुरू असून याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करण्यात येईलअसे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी विधान परिषदेत सांगितले.

कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्याबाबत विधानपरिषदेत सदस्य सुनील शिंदे व प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य भाई जगतापएकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणे, नियमांचे उल्लंघन करणे किंवा फसवणूक आढळल्यास

 सांगली येथे एका बसचे चेसी नंबर वेगवेगळ्या प्रकारे वापरल्याची बाब निदर्शनास आली असून त्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणे, नियमांचे उल्लंघन करणे किंवा फसवणूक आढळल्यास संबंधितांवर कारवाई करून आवश्यक असल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. सभागृहात उपस्थित सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची चौकशी करून तातडीने कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मंत्री श्री. सरनाईक यांनी दिली.

००००

Featured post

Lakshvedhi