कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याचे सांगत कामगार मंत्री फुंडकर म्हणाले, आतापर्यंत कामगारांच्या ३५ हजार पाल्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. शिशुंसाठी बालक मंदिर, महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण, कौशल्य विकासासाठी मार्गदर्शन योजना कामगार कल्याण मंडळ राबवित असते. एखाद्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेला लाजवेल अशी व्यवस्था या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्विमिंग पूल, शूटिंग रेंज आहे. कुठल्याही क्रीडा स्पर्धेमध्ये विजय आणि पराभव असतोच. विजयी झालेल्या खेळाडूंनी आत्मविश्वास टिकून ठेवत पुढील स्पर्धेसाठी तयारी करावी. तसेच पराभव झालेल्या खेळाडूंनी खचून न जाता, पुढील स्पर्धा मीच जिंकेल या आत्मविश्वासाने पुढे जावे, असे आवाहनही कामगार मंत्री ॲड फुंडकर यांनी केले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 22 April 2026
क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांमधून कामगारांना नावलौकिक कमविण्याची संधी
क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांमधून कामगारांना नावलौकिक कमविण्याची संधी
-कामगार मंत्री अॅड आकाश फुंडकर
· राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धा
मुंबई, दि. २१: कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कामगारांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतो. या प्रयत्नांचाच भाग म्हणून या राज्यस्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कामगार कल्याण मंडळाच्यावतीने आयोजित अशा स्पर्धा कामगार व त्यांचे पाल्य, कुटुंबीय यांना नावलौकिक कमविण्याची संधी आहे, असे प्रतिपादन कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी केले.
हुतात्मा बाबू गेनू मुंबई कामगार क्रीडा भवन येथे औद्योगिक व व्यावसायिक कामगारांच्या २९ व्या आणि महिलांच्या २४ व्या खुल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन कामगार मंत्री ॲड फुंडकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला व्यासपीठावर कामगार राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार मनिषा कायंदे, आमदार सुनील शिंदे, असंघटित कामगार विकास आयुक्त सुशील खोडवेकर, कामगार आयुक्त एच पी तुम्मोड, उपसचिव रोशनी कदम, सुरक्षा मंडळाचे अध्यक्ष डोके, कामगार कल्याण मंडळाच्या माजी सदस्य भाग्यश्री भुर्के, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे सरचिटणीस विश्वास मोरे, छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार प्राप्त रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी टीआरटीआयने प्रशिक्षण कार्यक्रम वेळेत पूर्ण करावा
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी टीआरटीआयने प्रशिक्षण कार्यक्रम वेळेत पूर्ण करावा
-आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके
मुंबई, दि. २१ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देण्यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय) मार्फत राबविण्यात येणारे प्रशिक्षण कार्यक्रम नियोजित वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले.
मंत्री डॉ.अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, टीआरटीआयच्या आयुक्त मंजिरी मनोलकर, सहसचिव मच्छिंद्र शेळके, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालक चंचल पाटील तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री डॉ. अशोक वुईके म्हणाले, स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी दर्जेदार व नियोजनबद्ध प्रशिक्षण आवश्यक आहे. प्रशिक्षण कार्यक्रम वेळेत पूर्ण झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी पुरेसा सराव आणि मार्गदर्शन मिळू शकते. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
नवी मुंबई महापालिकेतील आर्थिक अनियमिततेवर उपाध्यक्ष बनसोडे यांचे कठोर कारवाईचे निर्देश
नवी मुंबई महापालिकेतील आर्थिक अनियमिततेवर
उपाध्यक्ष बनसोडे यांचे कठोर कारवाईचे निर्देश
मुंबई, दि. २१: नवी मुंबई महानगरपालिकेतील आर्थिक अनियमिततेप्रकरणी संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.
मांडवा प्रवासी जेट्टीबाबतहीअॅप्रोच जेट्टी, स्लोपिंग जेट्टी, मोठ्या व्यासाच्या पाइल्स बसविणे, तसेच अॅप्रोच चॅनलमध्ये ड्रेजिंग
या प्रकल्पांतर्गत अॅप्रोच जेट्टी, स्लोपिंग जेट्टी, मोठ्या व्यासाच्या पाइल्स बसविणे, तसेच अॅप्रोच चॅनलमध्ये ड्रेजिंग व विद्युत सुविधांची उभारणी यासारखी महत्त्वाची कामे समाविष्ट आहेत. या प्रकल्पाच्या एकंदरीत कामाची सुमारे ५८ टक्के भौतिक प्रगती झाली असल्याचे बैठकीत सांगण्यात आले असता या प्रकल्पाची उर्वरित कामे प्राधान्याने मार्गी लावण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी दिले. तसेच रेवस येथील जेट्टी मजबूतीकरणाचे कामही तातडीने मार्गी लावण्याबाबत त्यांनी सूचित केले.
मांडवा प्रवासी जेट्टीबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. वाढती प्रवासी संख्या व बोटींची संख्या लक्षात घेता जेट्टीची दुरुस्ती व मजबूतीकरण आदी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. आयआयटी मुंबईच्या तांत्रिक अहवालानुसार जेट्टीच्या संरचनेत तातडीने दुरुस्तीची गरज असून प्राथमिक दुरुस्तीची कामे सुरू आहेत. दोन्ही प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या
मांडवा-मरीना व रेवस-मांडवा जेट्टी कामांना गती द्या
मांडवा-मरीना व रेवस-मांडवा जेट्टी कामांना गती द्या
-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
मुंबई, दि. २१ :- अलिबाग तालुक्यातील मांडवा मरीना जेट्टी विकास तसेच रेवस-मांडवा प्रवासी जेट्टी दुरुस्ती व मजबूतीकरणाच्या कामांना गती देऊन ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस आमदार महेंद्र दळवी यांच्यासह विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री नितेश राणे म्हणाले, या प्रकल्पामुळे अलिबाग- मुंबई सागरी प्रवास अधिक सुरक्षित व वेगवान होण्यास मदत होणार असून, पर्यटन व स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होणार आहे. कोकणातील सागरी प्रवासी वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि सक्षम करण्यासाठी ही कामे पावसाळ्यापूर्वीच प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणारी ईसंजीवनी टेलीकंसल्टेशन
ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणारी ईसंजीवनी टेलीकंसल्टेशन सेवा अधिक प्रभावीपणे राबवून ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यावरही भर देण्यात यावा. याशिवाय रुग्णालयांमधील यांत्रिक वस्त्र धुलाई सर्व आरोग्य संस्थांमध्ये कार्यान्वित करावी तसेच स्वच्छतेसंदर्भातील अडचणी व सूचना बाह्य संस्थांनी प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात, असेही मंत्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीस सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यभरातील जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि उपसंचालक दूरदृष्ये प्रणालीद्वारे उपस्थित होते.
00000
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...