Saturday, 18 April 2026

Governor Jishnu Dev Varma inaugurates Solar Energy Project at Lok Bhavan, Nagpur

 Governor Jishnu Dev Varma inaugurates Solar Energy Project

at Lok Bhavan, Nagpur

 

Nagpur, 17 April : Taking a significant step towards environmental protection and energy self-reliance, Governor of Maharashtra Jishnu Dev Varma inaugurated a state-of-the-art solar energy project at Lok Bhavan, Nagpur on Thursday

The project has a capacity of 90 kW and is expected to generate approximately 115,200 units of clean electricity annually.

Emphasizing the importance of solar energy, the Governor stated that green energy is the need of the future. He noted that such projects not only contribute to environmental protection but also play a crucial role in achieving self-reliance in the energy sector.

He expressed confidence that initiatives like this in an important city such as Nagpur would inspire other institutions and citizens to adopt renewable energy solutions.

पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी होऊन कार्बन उत्सर्जनात लक्षणीय

 या प्रकल्पामुळे पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी होऊन कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होणार आहे. तसेच वीज बिलात बचत होऊन दीर्घकालीन आर्थिक फायदा होणार आहे.

प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यपालांचे अतिरिक्त परिवार प्रबंधक रमेश येवले यांचेसह मेडाच्या अधिकाऱ्यांनी आणि सार्वजनिक बांधकाम (विद्युत) विभागाच्या अभियंत्यांनी केली.

या कार्यक्रमाला  राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरेराज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे,  राज्यपालांचे खासगी सचिव पवन सिंह,  राज्यपालांचे अतिरिक्त परिवार प्रबंधक रमेश येवलेविभागीय महाव्यवस्थापक (महाऊर्जा) सारंग महाजन तसेच अभियंते अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

वैशिष्ट्ये

अत्याधुनिक तंत्रज्ञान: सोलार एज (डीसी पॉवर ऑप्टीमायजरतंत्रज्ञानाचा वापरज्यामुळे प्रत्येक सोलर पॅनेलचे स्वतंत्र निरीक्षण शक्य

वाढीव कार्यक्षमता: सावलीधूळ किंवा एखाद्या पॅनेलमध्ये बिघाड झाला तरी संपूर्ण प्रणालीवर परिणाम होत नाही

रिअल-टाइम मॉनिटरिंग: वीज निर्मितीची प्रत्यक्ष वेळेत पाहणी करण्याची सुविधा


राज्यपालांच्या पुढाकाराने लोक भवन नागपूर येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

 राज्यपालांच्या पुढाकाराने लोक भवन नागपूर येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

 

नागपूर, दि. १७ पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गुरुवारी लोकभवननागपूर येथे अत्याधुनिक सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले. प्रकल्पाची क्षमता ९० किलोवॅट असून त्यातून दरवर्षी सुमारे १,१५,२०० युनिट्स स्वच्छ वीज निर्मिती होणे अपेक्षित आहे.    

सौर ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करताना राज्यपालांनी हरित ऊर्जा हीच भविष्याची गरज असून अशा प्रकल्पांमुळे केवळ पर्यावरणाचे संरक्षण होत नाहीतर ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठीही मोठी मदत होतेअसे सांगितले.

नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरात अशा प्रकल्पांमुळे इतर संस्था आणि नागरिकांनाही नवीकरणीय ऊर्जेकडे वळण्यासाठी प्रेरणा मिळेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Friday, 17 April 2026

‘मिशन कर्मयोगी' मध्ये महाराष्ट्राचा राष्ट्रीय स्तरावर 'टॉप परफॉर्मिंग स्टेट' पुरस्काराने गौरव

 मिशन कर्मयोगीमध्ये महाराष्ट्राचा राष्ट्रीय स्तरावर

'टॉप परफॉर्मिंग स्टेटपुरस्काराने गौरव

 

नवी दिल्ली, 17 केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मिशन कर्मयोगीउपक्रमांतर्गत  महाराष्ट्र राज्याने प्रशासकीय प्रशिक्षणात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. साधना सप्ताह २०२६ निमित्त आयोजित विशेष सोहळ्यात महाराष्ट्राला 'टॉप परफॉर्मिंग स्टेट' (उत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य) या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. कार्मिकसार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांना प्रदान करण्यात आला.

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित सोहळ्यातपंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री तथा कार्मिकसार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते साधना सप्ताह 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे मंत्रालयविभाग आणि राज्यांचा सन्मान करण्यात आला. याच सोहळ्यात महाराष्ट्रातील 'यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी' (यशदा) या संस्थेला 'स्पेशल अवॉर्डदेऊन गौरविण्यात आले. ई-लर्निंग आणि प्रशासकीय प्रशिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या 'यशदा'ने आयजीओटी प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करून अधिकाऱ्यांना डिजिटल कौशल्यांत सक्षम केल्याबद्दल हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला.

क्षमता विकास आयोग आणि 'कर्मयोगी भारतयांच्या संयुक्त विद्यमाने २ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान 'साधना सप्ताहसाजरा करण्यात आला. 'तंत्रज्ञानपरंपरा आणि मूर्त परिणाम ही यामागची संकल्पना होती. 47 लाख शासकीय कर्मचारी साधना सप्ताहमध्ये सहभागी झालें होते. 33 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांनी विहित केलेले चार तासांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये महिला

 महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये महिला मदत केंद्र स्थापन करावीतअशी सूचनाही त्यांनी केली. महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी जेंडर रिसोर्स सेंटर उभारणेतक्रार निवारण प्रणाली अधिक सक्षम करणेतसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

याशिवायराज्यातील सर्व महापालिकांच्या परिवहन सेवांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात याव्यात. बसस्थानकांवरील सुविधासुरक्षितताअलार्म व्यवस्था तसेच मोठ्या बस डेपोमधील अडचणींकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी नगरविकास विभागाने सर्व महापालिकांच्या परिवहन विभागांसोबत समन्वय साधून बैठक आयोजित करावीअसेही त्यांनी सांगितले.


सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी सुविधा उपलब्ध करण्यावर विशेष भर देणे आवश्यक आहे. उद्याने, क्रीडांगणे, मॉल्स व

 उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या कीसार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी सुविधा उपलब्ध करण्यावर विशेष भर देणे आवश्यक आहे. उद्यानेक्रीडांगणेमॉल्स व बाजारपेठांमध्ये महिलांच्या गरजा लक्षात घेऊन सुविधा विकसित कराव्यात. तसेच स्वच्छ व मानक कार्यपद्धती असलेली पाळणाघरे व शिशुगृहे उपलब्ध करून देण्यात यावीत. सार्वजनिक उद्यानांमध्ये ठराविक वेळ महिलांसाठी व त्यांच्या सोबत येणाऱ्या लहान मुलांसाठी राखीव ठेवण्याबाबतही विचार करावा.

तसेच राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये निर्जन व अंधाऱ्या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी. बाजारपेठाघाट व बसथांबे परिसरात स्वच्छतागृहांची सोय करण्यात यावी. महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील योजनांच्या अंमलबजावणीत कोणतीही त्रुटी राहणार नाहीयाची दक्षता घेण्याचेही त्यांनी निर्देश दिले.

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी

 नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी

-         उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 

मुंबईदि. १७ : राज्य शासनाच्या महिला धोरणांतर्गत महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना व महिलांसाठी प्रभावी अंमलबजावणीसाठी नगरविकास विभागाला मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांच्या आधारे समानतेचा विचार पुढे नेत महिलांच्या विशेष गरजा ओळखून स्वतंत्र व परिणामकारक कार्यप्रणाली विकसित करावीअसे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

 

 १६ एप्रिल २०२६ रोजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महिला सुरक्षेसंदर्भात पुढील मार्गदर्शन व सहकार्याबाबत निवेदन सादर केले होते. महिला सक्षमीकरण व सुरक्षेबाबत नगरविकास विभागाकडून करावयाच्या उपाययोजना व कार्यवाहीच्या संदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात बैठक पार झाली. बैठकीस नगरविकास विभागाचे उपसचिव अजिंक्य बगाडे तसेच अक्षरा सेंटरमुंबईच्या सहसंचालक नंदिनी शाह यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi