Wednesday, 15 April 2026

नानाबार्डकडून मच्छिमारांच्या मुलभूत सोयी सुविधांकरिता ६१ कोटी २४ लाख बार्डकडून मच्छिमारांच्या मुलभूत सोयी सुविधांकरिता ६१ कोटी २४ लाख नाबार्डकडून मच्छिमारांच्या मुलभूत सोयी सुविधांकरिता ६१ कोटी २४ लाख

 नाबार्डकडून मच्छिमारांच्या मुलभूत सोयी सुविधांकरिता ६१ कोटी २४ लाख

                                                               

            नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी योजनेतून सागरी जिल्ह्यातील मच्छिमारांसाठी मासळी उतरविण्याच्या मुलभूत सोयी सुविधा उभारण्यासाठी ६१ कोटी २४ लाख रुपयांच्या कामांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निधीतून ठाणेरायगडसिंधुदुर्गपालघर आणि रत्नागिरी येथील विविध ठिकाणी पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत.

            सागरी जिल्ह्यांमधील मच्छिमारांसाठी मासळी उतरविण्याच्या ठिकाणी मुलभूत सोयी सुविधा नसल्याचे आढळून आले आहे. त्यासाठी नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधीअंतर्गत प्राप्त होणाऱ्या कर्जाद्वारे मासेमारीसाठी बंदरे व लहान धक्के बांधण्यात येतात. या योजनेत नाबार्डचा ९५ टक्के तर राज्याचा हिस्सा ५ टक्के असा असतो. यासाठी नाबार्डकडे सादर झालेल्या प्रस्तावातील काम पूर्ण झालेल्या तसेच प्रगतीपथावरील कामांसाठी हा ६१ कोटी २४ लाख रूपयांचा निधी वापरण्यात येणार आहे. यात ठाणे जिल्ह्यातील दिवाळे गावरायगड जिल्ह्यातील बोर्ली मांडलादिघीराजपूरीनांदगावसिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्गपालघर जिल्ह्यातील धाकटी डहाणूरत्नागिरी जिल्ह्यातील वेलदूर यांसह पाचू बंदरबोऱ्या आणि चिंबई यांचा समावेश आहे. या ठिकाणच्या कामांच्या अंदाजपत्रकास बैठकीत मान्यता देण्यात आली.

उन्हाळी लाट नाही. हे ‘एल निनो’ नावाच्या धोकादायक घटनेचे

 प्रिय मित्रांनो,

सध्या आपण अनुभवत असलेली ही उष्णतेची लाट ही सामान्य उन्हाळी लाट नाही. हे ‘एल निनो’ नावाच्या धोकादायक घटनेचे आगमन आहे. हे गुपचूपपणे जीव घेऊ शकते आणि आपल्या प्रियजनांना आपल्यापासून हिरावून घेऊ शकते. मे महिना जसजसा जवळ येईल, तसतशी ही परिस्थिती अधिक गंभीर होईल.


😱 ‘एल निनो’ म्हणजे काय?


सोप्या भाषेत सांगायचे तर, पॅसिफिक महासागरातील पाणी खूप गरम होते. याचा परिणाम जगभरातील वाऱ्याच्या प्रवाहावर होतो. मे महिन्यात पाऊस आणणारा नैऋत्य मोसमी पाऊस उशिरा येऊ शकतो किंवा कमी होऊ शकतो. याचा अर्थ असा की, जेव्हा पाऊस अपेक्षित असतो, तेव्हा आपल्याला फक्त तीव्र उष्णतेचा अनुभव घ्यावा लागेल.


🏠🔥 ही एक अत्यंत धोकादायक परिस्थिती आहे.

उष्माघातामुळे निरोगी लोकांचाही मृत्यू होऊ शकतो. म्हणून, आपले प्राण वाचवण्यासाठी, आपण खालील गोष्टींची त्वरित काळजी घेतली पाहिजे:


💧 तहान लागेपर्यंत थांबू नका.


तहान लागणे हे सूचित करते की शरीरात पाण्याची कमतरता आहे.


प्रत्येक तासाला पाणी प्या.


लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती पाणी पीत आहेत याची खात्री करा.


पाण्याची बाटली नेहमी जवळ ठेवा.


☀️🚫 सकाळी ११ ते दुपारी ३ ही सर्वात धोकादायक वेळ आहे.

या वेळी सूर्याची किरणे थेट शरीरावर पडतात.


घरातच राहण्याचा प्रयत्न करा.


शालेय खेळांसारखे कार्यक्रम असल्यास काळजी घ्या.


तुमच्या मुलाचे आयुष्य पदकापेक्षा जास्त मौल्यवान आहे.


👕 काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळा.


ते जास्त उष्णता शोषून घेतात.


पांढऱ्या आणि गुलाबी रंगासारखे हलक्या रंगाचे सुती कपडे घाला.


⚠️ उष्माघाताची लक्षणे:


तीव्र डोकेदुखी

बेशुद्ध होणे

उलट्या होणे

घाम न येता त्वचा कोरडी पडणे

ही लक्षणे दिसल्यास, ताबडतोब:


सावलीच्या ठिकाणी जा


ओल्या कापडाने शरीर पुसा

**ताबडतोब रुग्णालयात घेऊन जा**


🐾 प्राण्यांना विसरू नका

**केवळ घरातील कुत्रे आणि मांजरांनाच नव्हे, तर रस्त्यावरील प्राण्यांनाही मदत करा.**


घरासमोर पाणी ठेवा

सावलीची सोय करा

🚰📢 शेवटी…

ही माहिती वाचल्यानंतर, गप्प बसू नका. हे तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत शेअर करा. 'एल निनो' परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपण सर्वांनी तयार राहिले पाहिजे.


लक्षात ठेवा… आपण सुरक्षित राहिलो तरच या धोक्यातून सुटू शकतो.


👉 दुसऱ्या कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी हा संदेश शेअर करा. 🙏

उद्योजकता विकास योजनेअंतर्गत ४ टक्के व्याज

 या योजनेत सर्वसाधारण प्रवर्गअनुसूचित जातीअनुसूचित जमातीमधील भूमिहीनअल्पभूधारकमहिला बचत गट आणि सुशिक्षित बेरोजगारांना प्राधान्य देण्यात येणार असून महिलांसाठी ५० टक्के तर दिव्यांगांसाठी ५ टक्के आरक्षण लागू राहणार आहे. लाभार्थ्यांना पशुपालनाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य करण्यात आले असून स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली खरेदी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

उद्योजकता विकास योजनेअंतर्गत ४ टक्के व्याज सवलत योजना ही शेळी/मेंढी/गाय/म्हैस/कुक्कुटपालन या पशुपालन व्यवसायाबरोबरच वराह पालन व्यवसायालाही लागू करण्यात आली आहे. यामुळे पशुपालन क्षेत्रात गुंतवणूक वाढून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्याची अपेक्षा मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.


मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत शेळी/मेंढी/गाय/म्हैस/कुक्कुटपालन यांचा समावेश

 मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत शेळी/मेंढी/गाय/म्हैस/कुक्कुटपालन यांचा समावेश आहे. आता या निर्णयानुसार वराह पालनाला चालना देण्यासाठी वराह पालन गट वाटप योजना’ समाविष्ट करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ५+१ वराह गटविमा आणि आवश्यक पायाभूत सुविधा यांचा समावेश असलेला सुमारे २.०८ लाख रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सर्वसाधारण लाभार्थ्यांना ५० टक्के तर अनुसूचित जाती-जमातींना ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

.

Tuesday, 14 April 2026

एसओपींची प्रभावी अंमलबजावणी करावी

 एसओपींची प्रभावी अंमलबजावणी करावी

-आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

देशातील दहा प्रमुख उष्ण राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचाही समावेश आहे. वातावरणातील बदलांमुळे तापमान सातत्याने वाढत असून अनेक भागात तापमान ४७ ते ४९ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचत आहे. राज्यात वाढत्या उष्णतेमुळे दक्षता घेण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांना देण्यात आल्या आहेत. वाढत्या उष्णतेच्या अनुषंगाने जनजागृतीसाठी विशेष मोहिमाही राबवण्यात येणार असून या एसओपींची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

पहिल्या एसओपीमध्ये रस्त्यावरील विक्रेते, बांधकाम मजूर, वाहतूक पोलीस, स्वच्छता कर्मचारी, डिलिव्हरी

 पहिल्या एसओपीमध्ये रस्त्यावरील विक्रेतेबांधकाम मजूरवाहतूक पोलीसस्वच्छता कर्मचारीडिलिव्हरी कामगाररिक्षाचालक आदी बाहेर काम करणाऱ्या घटकांसाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे. आयएमडीच्या पिवळ्याकेशरी आणि लाल सतर्कतांनुसार कामाचे वेळापत्रक बदलणेपाण्याचे ब्रेकपाणी बूथओआरएस वितरणसावली व्यवस्था आणि आरोग्य सुविधा मजबूत करणे यासारख्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.

            दुसरी एसओपी चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी असूनउष्णता ताण व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करते. यामध्ये थंड विश्रांती केंद्रेपाणी पुरवठावायुवीजनकामाचे नियोजनजॉब रोटेशनउष्णता आजार ओळख प्रशिक्षण आणि महिला कामगारांसाठी विशेष सुविधा यांचा समावेश आहे.

            तिसऱ्या एसओपीमध्ये उष्णता-प्रतिरोधक गृहनिर्माणाचा समावेश असूनतत्काळमध्यम व दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांद्वारे घरांची थर्मल सुधारणाकूल रूफहरित क्षेत्रे आणि हवामान-संवेदनशील नियोजन यावर भर देण्यात आला आहे.

उच्च-उष्णता-जोखमीच्या जिल्ह्यांमध्ये उष्णता-प्रतिरोधक गृहनिर्माण व वसाहती मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सल्ला आहे. या एसओपी तात्काळमध्यम-मुदती (1-3 वर्षे) आणि दीर्घ-मुदती अशा तीन-स्तरीय उपाय योजनावर आधारित आहे: 

तात्काळ उपाययोजना मध्ये: उष्णता जोखीम नकाशाअसुरक्षित गटांचे लक्ष्यीकरणजनजागृतीथंडी केंद्रेघरांची कमी खर्चाची थर्मल सुधारणा (रिफ्लेक्टिव्ह छप्परसावलीवेंटिलेशन). 

मध्यम-मुदती उपाय: पीएमएवायगृहनिर्माण योजनाबिल्डिंग बाय-लॉज आणि मास्टर प्लॅनमध्ये उष्णता-प्रतिरोधक डिझाइन (कूल रूफग्रीन स्पेस) समाविष्ट करणे. 

दीर्घ-मुदती उपाय: स्टेट बिल्डिंग कोडक्लायमेट-सेन्सिटिव्ह झोनिंग आणि सर्वांसाठी समान तापमान सुविधा यांचा समावेश आहे. 

या तीनही एसओपीमध्ये विभागीय समन्वयआरोग्य केंद्रे आणि कामगारांच्या अभिप्रायावर आधारित नियमित पुनरावलोकन तसेच अनौपचारिक कामगारांच्या प्रतिनिधित्वावर भर दिला आहे. जिल्हा नियंत्रण कक्ष (१०७७)रुग्णवाहिका (१०८)पोलीस हेल्पलाइन (११२/१००) आणि इतर महत्त्वाचे संपर्क क्रमांकही प्रसारित करण्यात आले आहेत.

 

या एसओपींची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमहापालिकासार्वजनिक बांधकाम विभागनगररचना विभागम्हाडासिडकोस्थानिक स्वराज्य संस्था आदी प्रमुख विभागांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात 

उष्णतेच्या लाटांपासून संरक्षणासाठी राज्य शासनाकडून तीन व्यापक एसओपी जारी

 उष्णतेच्या लाटांपासून संरक्षणासाठी

राज्य शासनाकडून तीन व्यापक एसओपी जारी

 

मुंबईदि. 14 : राज्य शासनाने राज्य उष्णता कृती आराखडा आणि भारतीय हवामान विभागाच्या (IMD) रंग-कोडेड उष्णता सतर्कतांच्या अनुषंगाने उष्णतेच्या लाटांपासून नागरिकांचेविशेषतः असुरक्षित घटकांचे संरक्षण करण्यासाठी तीन व्यापक मानक कार्यपद्धती (SOPs) जारी केल्या आहेत.

            उष्णता-संबंधित आजार व मृत्यू कमी करण्यासाठी या उपाययोजना उपयुक्त ठरणार असूनविशेषतः अनौपचारिक कामगारखाण कामगार आणि कमी उत्पन्न गटांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

            या एसओपींचा मुख्य भर 15 उच्च-उष्णता-जोखमीच्या जिल्ह्यातील बाहेरील अनौपचारिक कामगारचंद्रपूरमधील कोळसा खाण कामगार तसेच उष्णता-प्रतिरोधक गृहनिर्माण आणि वसाहतींवर आहे. लातूरअमरावतीयवतमाळवाशिमअकोलाबुलडाणानागपूरवर्धाचंद्रपूरगोंदियाभंडाराजळगावनंदुरबारधुळे आणि नांदेड हे जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत.

Featured post

Lakshvedhi