Tuesday, 14 April 2026

नाबार्डकडून मच्छिमारांच्या मुलभूत सोयी सुविधांकरिता ६१ कोटी २४ लाख

 नाबार्डकडून मच्छिमारांच्या मुलभूत सोयी सुविधांकरिता ६१ कोटी २४ लाख

                                                               

            नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी योजनेतून सागरी जिल्ह्यातील मच्छिमारांसाठी मासळी उतरविण्याच्या मुलभूत सोयी सुविधा उभारण्यासाठी ६१ कोटी २४ लाख रुपयांच्या कामांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निधीतून ठाणेरायगडसिंधुदुर्गपालघर आणि रत्नागिरी येथील विविध ठिकाणी पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत.

            सागरी जिल्ह्यांमधील मच्छिमारांसाठी मासळी उतरविण्याच्या ठिकाणी मुलभूत सोयी सुविधा नसल्याचे आढळून आले आहे. त्यासाठी नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधीअंतर्गत प्राप्त होणाऱ्या कर्जाद्वारे मासेमारीसाठी बंदरे व लहान धक्के बांधण्यात येतात. या योजनेत नाबार्डचा ९५ टक्के तर राज्याचा हिस्सा ५ टक्के असा असतो. यासाठी नाबार्डकडे सादर झालेल्या प्रस्तावातील काम पूर्ण झालेल्या तसेच प्रगतीपथावरील कामांसाठी हा ६१ कोटी २४ लाख रूपयांचा निधी वापरण्यात येणार आहे. यात ठाणे जिल्ह्यातील दिवाळे गावरायगड जिल्ह्यातील बोर्ली मांडलादिघीराजपूरीनांदगावसिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्गपालघर जिल्ह्यातील धाकटी डहाणूरत्नागिरी जिल्ह्यातील वेलदूर यांसह पाचू बंदरबोऱ्या आणि चिंबई यांचा समावेश आहे. या ठिकाणच्या कामांच्या अंदाजपत्रकास बैठकीत मान्यता देण्यात आली.

-बदलापूर मधील मंजूर विकास आराखड्यातील चार एकर जमीन वीज उपकेंद्र उभारणीसाठी देणार

 -बदलापूर मधील मंजूर विकास आराखड्यातील

 चार एकर जमीन वीज उपकेंद्र उभारणीसाठी देणार

            कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या मंजूर विकास आराखड्यातील मौजे कात्रप येथील स्टेडियमसाठी आरक्षित जमिनीपैकी चार एकर जमीन वीज उपकेंद्र उभारणीसाठी हस्तांतरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

            अंबरनाथकुळगाव-बदलापूर परिसरातील वाढते शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या विचारात घेता टाटा पॉवर कंपनीस उपकेंद्र उभारण्यास उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने नवीन उपकेंद्र उभारण्यासाठी टाटा पॉवर कंपनीची शिफारस केली आहे. या ठिकाणी टाटा पॉवर कंपनी ११०/२२ के.व्ही.क्षमतेचे वीज उपकेंद्र उभारणार आहे. त्यानुसार मौजे कात्रप येथील स्टेडियमसाठी आरक्षित भूखंडापैकी चार एकर जागा टाटा पॉवर कंपनीस हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली.

००००

विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटनुसार हा कृती

 विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटनुसार हा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. शासनाचे प्रशासन अनेक संवर्गांमध्ये विभागलेले आहे. यात ३३ विभागांमध्येसुमारे ११०आस्थापनांमध्ये ३ हजार ६०० हून अधिक संवर्ग आहेत. या संरचनेत सरळसेवा भरतीसंदर्भात १ हजार ४०० हून अधिक सेवाप्रवेश नियम आहेत. यातून विविध विभागांमधून स्वतंत्रपणे तितक्याच परीक्षा घेण्यात येत होत्या. आता त्याऐवजी परीक्षांची संख्या कमी होऊन उमेदवारांसाठी भरतीच्या पदांची संख्या वाढणार आहे. त्यासाठी अधिक एकसंधसुलभपारदर्शकपरिणामकारक आणि कालबद्ध निवड प्रक्रिया राबविण्यासाठी सुधारणा करण्यात येणार आहे. या सुधारणांमुळे सेवाप्रवेश नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. याशिवाय सेवांतर्गत पदोन्नतीसाठी स्वतंत्र संवर्ग संरचना आणि मृत संवर्गांची पुनर्रचना होणार आहे.

•          सेवाप्रवेश नियमांमधील व्यापक बदल- विविध संवर्गांच्या ५७४ सेवाप्रवेश नियमांमध्ये बदल. यामध्ये शैक्षणिक पात्रताअनुभवकौशल्ये आणि प्राधान्य निकषांचे सुसूत्रीकरण तसेच विविध संवर्गांतील विसंगती दूर.

•          अनुभवाच्या अटींचे सुसूत्रीकरण- समान स्वरूपाच्या संवर्गांसाठी वेगवेगळ्या अनुभवाच्या अटी असल्याने परीक्षांची संख्या अनावश्यकरित्या वाढत होती. त्यामुळे शैक्षणिक व अनुभव निकष अधिक सामायिकसुसंगत आणि तर्कसंगत करण्यात येणार. यापुढे सर्वसाधारणपणे सरळसेवा भरतीसाठी अनुभवाची अट लागू राहणार नाही.

•          महाराष्ट्र नागरी सेवाराजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा पद्धतीचा विस्तार- सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवाराजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा योजनेअंतर्गत सहा सेवांमधील एकूण ५७ संवर्गांमध्ये पदभरती केली जाते. सुधारणेनंतर या सेवांमध्ये ४५  संवर्गांचा नव्याने समावेश करून याअंतर्गत एकूण १०२ संवर्गांचा समावेश.

•          नवीन सेवा- संयुक्त परीक्षांच्या आयोजनाचे सुसूत्रीकरण होणार. विविध प्रशासकीय विभागांतील समान संवर्गांच्या वर्गीकरणाच्या आधारेमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती केल्या जाणाऱ्या सध्याच्या सेवांव्यतिरिक्त आणखी १८ नवीन सेवा निर्माण करण्यास मान्यता. या १८ नवीन सेवांमध्ये विविध प्रशासकीय विभागांतील एकूण ९३ संवर्गांचा समावेश.

•          गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गांचे प्रशासकीय आणि तांत्रिक गटात वर्गीकरण- गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गांची भरती प्रक्रिया अधिक एकसमान व कार्यक्षम करण्यासाठी त्यांचे प्रशासकीय संवर्ग गट आणि तांत्रिक संवर्ग गट असे वर्गीकरण. कर्तव्ये व जबाबदाऱ्या विचारात घेऊन प्रशासकीय स्वरूपाचे कामकाज असलेल्या २६९ संवर्गांचे १८ गटतर तांत्रिक स्वरूपाचे कामकाज असलेल्या २२१ संवर्गांचे ३० गट. याकरिता स्वतंत्र भरती प्रक्रिया राबवण्यात येईल.

•          मुलाखतीऐवजी अंतर्गत पदोन्नती व प्रतिनियुक्ती- नामनिर्देशनाच्या कोट्यातील काही राजपत्रित संवर्गातील पदे मुलाखतीने भरण्याऐवजी अंतर्गत पदोन्नती व प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार.

•          कालबाह्य संवर्गांचे पुनर्गठन आणि निरसन- प्रशासकीय कामकाज आणि शासकीय व्यवहारात माहिती-तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर काही संवर्गांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या आता कालबाह्य ठरल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीयदृष्ट्या अनावश्यक ठरलेल्या संवर्गांना कालबाह्य संवर्ग म्हणून घोषित. या पदांऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेची जाण असलेली नवीन पदे निर्माण करण्याचा आवश्यकतेनुसार विचार होणार.

•          अराजपत्रित संवर्गांसाठी नो इंटरव्ह्यू पॉलिसीअराजपत्रित संवर्गांसाठी मुलाखत न घेण्याचे धोरण लागू करण्यात येईल. यामुळे निवड प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक होईल.

•          निवड न झालेल्या उमेदवारांसाठी निपुण सेतू उपक्रम - केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) मुलाखत फेरीपर्यंत पात्र ठरलेल्या परंतु अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्या उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिभा सेतू पोर्टल सुरू केले आहे. त्याच धर्तीवरमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अंतिम निवडीसाठी शिफारस न झालेल्या उमेदवारांची माहिती सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील संस्थांना उपलब्ध करून देण्यात येणार. त्यासाठी महाजॉब्स पोर्टलअंतर्गत निपुण सेतू हा उपक्रम सुरू करण्यात येणार.

•          डिजिलॉकरद्वारे कागदपत्र पडताळणी - डिजीलॉकर हे भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत विकसित डीजी लॉकर हे सुरक्षित डिजिटल दस्तावेज व्यासपीठ आहे. त्याचा वापर करून पदभरती प्रक्रिया सुलभजलद आणि पारदर्शक करण्यात येणार. यात उमेदवारांची शैक्षणिक गुणपत्रिकाअन्य स्थानांतरणदिव्यांगजातक्रीडाविषयक प्रमाणपत्रे इत्यादी कागदपत्रे डिजीलॉकरद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील.

            या सर्व सुधारणांमुळे पदभरतीसाठीच्या परीक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होईल. भरती प्रक्रिया अधिक कालबद्धपारदर्शकसुलभ आणि कार्यक्षम बनेल. समान संवर्गांसाठी समान निकषदस्तावेज पडताळणीतील सुलभतानिवड प्रक्रियेतील सुसूत्रीकरणआणि तंत्रज्ञानाधारित प्रणालींचा वापर यामुळे शासनाची पदभरती व्यवस्था अधिक सक्षम होईल.

शासनाच्या भरती प्रक्रियेत सुधारणा; संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा, ९३ संवर्गाचा समावेश

 

शासनाच्या भरती प्रक्रियेत सुधारणा;

संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा९३ संवर्गाचा समावेश

 

            शासनाच्या विविध पदांवरील भरती प्रक्रिया सुटसुटीतसक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ व्हावीयाकरिता पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवेंद्र फडणवीस होते. या सुधारणेमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या १०२ होणार आहे. तर संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा आणि ९३ संवर्गाचा समावेश होणार आहे. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्यात निपुण सेतू पोर्टल सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.

   

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जलदृष्टीचा गौरव

 पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जलदृष्टीचा गौरव

लघु कालव्यांचे जाळे उभारणेपाणी साठवण आणि जलसंवर्धनशेतीपूरक विकासस्थानिक रोजगार आणि कुटीर उद्योगांना चालना हे अहिल्यादेवींचे जलसंवर्धनातील कार्य प्रेरणास्त्रोत आहे. अहिल्यादेवींनी हे तत्त्व 250-300 वर्षांपूर्वी आचरणात आणले होते. अहिल्यादेवींनी गरीबवंचितशेतकरी आणि सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून शासन केले.

 


 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला असून या कालावधीत विविध उपक्रम देशभरात आयोजित करण्यात आले आहेत.

 स्मारक नाणे व टपाल 

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जलदृष्टीचा गौरव

 25 एप्रिल 2026 रोजी अहिल्यादेवींचे जन्मगाव चोंडी आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून यात्रांचा शुभारंभ होईल आणि या यात्रांचा संगम शिर्डी येथे होणार असून तेथून छत्रपती संभाजी नगर घृष्णेश्वरधुळे या मार्गाने इंदूर येथे 29 एप्रिल रोजी समारोप होईल. या जलयात्रेदरम्यान विविध कार्यक्रम व उपक्रम जलयात्रेच्या मार्गावरील गावांमध्ये आणि शहरात होणार आहेत.

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जलदृष्टीचा गौरव

लघु कालव्यांचे जाळे उभारणेपाणी साठवण आणि जलसंवर्धनशेतीपूरक विकासस्थानिक रोजगार आणि कुटीर उद्योगांना चालना हे अहिल्यादेवींचे जलसंवर्धनातील कार्य प्रेरणास्त्रोत आहे. अहिल्यादेवींनी हे तत्त्व 250-300 वर्षांपूर्वी आचरणात आणले होते. अहिल्यादेवींनी गरीबवंचितशेतकरी आणि सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून शासन केले.

गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार

  

गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त आयोजन

 

मुंबईदि. 13 : "गोदा ते नर्मदा" या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून कार्यक्रमाद्वारे केला जाईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.    अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्यविचार व वारसा नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी 25 ते 29 एप्रिल 2026 या कालावधीत या जलयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.

 


Featured post

Lakshvedhi