Monday, 13 April 2026

सर्व जमीन संबंधित सेवा एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न

 सर्व जमीन संबंधित सेवा एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न

नवोन्मेषाच्या दृष्टीने विभागाने भूमित्र’ चॅटबॉटव्हॉट्सॲपद्वारे सेवातसेच जीआयएस आधारित ई-मोजणी २.० सारख्या अत्याधुनिक प्रणाली विकसित केल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने मोजणी प्रक्रिया जलद आणि अचूक करण्यात आली असून६३५ प्रकरणे एआयद्वारे सोडवण्यात आली आहेत. तसेच लँड डॅशबोर्डच्या माध्यमातून राज्यविभागजिल्हा ते गाव पातळीपर्यंतच्या माहितीचे विश्लेषणडेटा व्हिज्युअलायझेशन आणि निर्णय प्रक्रियेसाठी उपयुक्त साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 'विकसित महाराष्ट्र २०४७या दृष्टीकोनातून एकसंध युनिफाइड लँड मॅनेजमेंट सिस्टीम’ (युएलएमएस) विकसित करण्याचेही काम सुरू असूनसर्व जमीन संबंधित सेवा एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न आहे. 

नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निवारण करण्यासाठी प्रभावी ‘ग्रिव्हन्स रिड्रेसल’ प्रणाली

 डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर

नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निवारण करण्यासाठी प्रभावी ग्रिव्हन्स रिड्रेसल’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. एसएमएसद्वारे अभिप्रायदोन स्तरांवरील अपिल यंत्रणा आणि कालबद्ध सेवा वितरणामुळे उत्तरदायित्व अधिक मजबूत झाले आहे. तसेच ४,५०० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन डिजिटल प्रणालींचा प्रभावी वापर सुनिश्चित करण्यात आला आहे. 

फाईलचा निपटारा तीन दिवसात

 फाईलचा निपटारा तीन दिवसात

ई-ऑफिस प्रणालीची राज्यभर मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्यात येत असून ४३० हून अधिक कार्यालयांमध्ये ८२ टक्के अंमलबजावणी पूर्ण झाली आहे. फाईल निपटारा दर ९३ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून सरासरी तीन दिवसांत कामे पूर्ण होत आहेत. यामुळे प्रशासनातील कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे.

महाभूमी'च्या माध्यमातून १०० टक्के ऑनलाइन सेवा

 महाभूमी'च्या माध्यमातून १०० टक्के ऑनलाइन सेवा

राज्यातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मपैकी 'महाभूमीपोर्टल हे एक असूनसात बारा उतारा८अ उताराप्रॉपर्टी कार्डफेरफार नोंदी यांसारख्या सेवा आता १०० टक्के ऑनलाइन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सेवांना १.८ अब्जांहून अधिक हिट्स मिळाल्यामुळे नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आणि विश्वास स्पष्ट झाला आहे. 

मुंबई उपनगर जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताहाला सुरुवात

 मुंबई उपनगर जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताहाला सुरुवात

 

मुंबईदि. १० : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक समता सप्ताह’ कार्यक्रमाची मुंबई उपनगर जिल्ह्यात उत्साहात सुरुवात झाली आहे अशी माहिती मुंबई उपनगरचे समाज कल्याण सहायक आयुक्त रविकिरण पाटील यांनी दिली.

 

८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहाचा मुख्य उद्देश अनुसूचित जातीजमाती तसेच वंचित व दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे आणि समाजात जनजागृती निर्माण करणे हा आहे. यंदाचा समता सप्ताह विशेष ठरणार असूनमहात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्षसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे १५० वे वर्ष तसेच महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष या पार्श्वभूमीवर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या सप्ताहात दररोज विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. ८ एप्रिल रोजी उद्घाटन व पत्रकार परिषद९ एप्रिल रोजी चवदार तळे सत्याग्रहावर व्याख्याने व वक्तृत्व स्पर्धाशाळा-महाविद्यालयांत निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. १० एप्रिल रोजी मार्जिन मनी योजनेवर कार्यशाळा घेण्यात आली. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित कार्यक्रम१२ एप्रिल रोजी संविधान विषयक जनजागृती व्याख्यान व महिला मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.

तसेच १३ एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिर आणि रक्तदान शिबिरतर १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यानेचर्चासत्रे व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 


बोरिवलीतील बीएसएनएल व एमटीएनएलची आरक्षित जागा पीएम आवास योजनेसाठी घेण्यास मान्यता

 बोरिवलीतील बीएसएनएल व एमटीएनएलची आरक्षित जागा

पीएम आवास योजनेसाठी घेण्यास मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. १० : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे बांधण्यासाठी बोरिवली येथील भारत संचार निगम लि. (बीएसएनएल) व महानगर टेलिफोन निगम (एमटीएनएल) यांच्या मालकीची आरक्षित जागा रेडीरेकनर दरानुसार घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.

 

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्तामित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशीमहामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक कासारसंचालक (प्रशासन) प्रवीण कोळीतांत्रिक संचालक अभिजित लोंढेसहायक अधिकारी शिरतेज रसाळ आदी यावेळी उपस्थित होते.

 

बोरिवली येथील गोराई येथे भारत संचार निगम लिमिटेड यांच्या मालकीची तर शिंपाली येथे महानगर टेलिफोन निगमची जागा असून दोन्हीची मिळून एकूण २८.८४ एकर जागा आरक्षित आहे. ही आरक्षित जागा रेडिरेकनर दरानुसार ७२९ कोटी रुपयांना घेऊन या आरक्षित जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांचा प्रकल्प राबविण्यास तसेच उर्वरित आरक्षित जागा विकसित करण्याचा प्रस्ताव महामंडळाने बैठकीत ठेवला होता. या प्रस्तावास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली. या जागेवर सुमारे एक हजाराहून अधिक घरे बांधण्याचा प्रस्ताव असल्याचे श्री. कासार यांनी यावेळी सांगितले.

मराठी येत नसल्यास रिक्षा चालकांचे परवाने रद्द करणार

 मराठी येत नसल्यास रिक्षा चालकांचे परवाने रद्द करणार

बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर कारवाई करत ओलाउबर आणि रॅपिडो यांच्या परवान्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. तसेच राज्यात रिक्षा चालविण्यासाठी मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात आले असून १ मेपर्यंत तपासणी करून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.


Featured post

Lakshvedhi