Sunday, 12 April 2026

भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा

 भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी पोर्टलची निर्मिती

मुंबई, दि. 10 : मुंबईमध्ये नोकरी, व्यवसाय निमित्ताने बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांच्याकरिता मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता असल्याने भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा उभारून कार्यान्वित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी नागरिकांच्या सुविधांकरिता पोर्टल विकसित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.न्यायालयाच्या परवानगीने भाडेदर संदर्भातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सायंकाळचे न्यायालय सुरू करावे या न्यायालयांसाठी जागा नसल्यास भाडेतत्त्वावर जागा घेण्यात याव्यात. यामुळे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली निघतील, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

मुंबई उपनगर जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताहाला सुरुवात

 मुंबई उपनगर जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताहाला सुरुवात

 

मुंबईदि. १० : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक समता सप्ताह’ कार्यक्रमाची मुंबई उपनगर जिल्ह्यात उत्साहात सुरुवात झाली आहे अशी माहिती मुंबई उपनगरचे समाज कल्याण सहायक आयुक्त रविकिरण पाटील यांनी दिली.

 

८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहाचा मुख्य उद्देश अनुसूचित जातीजमाती तसेच वंचित व दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे आणि समाजात जनजागृती निर्माण करणे हा आहे. यंदाचा समता सप्ताह विशेष ठरणार असूनमहात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्षसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे १५० वे वर्ष तसेच महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष या पार्श्वभूमीवर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या सप्ताहात दररोज विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. ८ एप्रिल रोजी उद्घाटन व पत्रकार परिषद९ एप्रिल रोजी चवदार तळे सत्याग्रहावर व्याख्याने व वक्तृत्व स्पर्धाशाळा-महाविद्यालयांत निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. १० एप्रिल रोजी मार्जिन मनी योजनेवर कार्यशाळा घेण्यात आली. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित कार्यक्रम१२ एप्रिल रोजी संविधान विषयक जनजागृती व्याख्यान व महिला मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.

तसेच १३ एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिर आणि रक्तदान शिबिरतर १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यानेचर्चासत्रे व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

या सर्व कार्यक्रमांत मुंबई उपनगरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावेअसे आवाहन सहायक आयुक्त रविकिरण पाटील यांनी केले आहे.

0000

मराठी येत नसल्यास रिक्षा चालकांचे परवाने रद्द करणार

 मराठी येत नसल्यास रिक्षा चालकांचे परवाने रद्द करणार

बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर कारवाई करत ओलाउबर आणि रॅपिडो यांच्या परवान्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. तसेच राज्यात रिक्षा चालविण्यासाठी मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात आले असून १ मेपर्यंत तपासणी करून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला

मराठी येत नसल्यास रिक्षा चालकांचे परवाने रद्द करणार

 मराठी येत नसल्यास रिक्षा चालकांचे परवाने रद्द करणार

बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर कारवाई करत ओलाउबर आणि रॅपिडो यांच्या परवान्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. तसेच राज्यात रिक्षा चालविण्यासाठी मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात आले असून १ मेपर्यंत तपासणी करून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.

पॉड टॅक्सी प्रकल्पाला गती देणार

 पॉड टॅक्सी प्रकल्पाला गती देणार

ठाणे व मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील विविध रस्ते प्रकल्पांसाठीही लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. ठाणेमिरा भाईंदर आणि नवी मुंबई येथे पॉड टॅक्सी प्रकल्प पीपीपी तत्त्वावर राबविण्याचा मानस असून पुढील सहा महिन्यांत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पूर्ण केला जाणार आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी घोडबंदर रोडवरील रुंदीकरणाची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महावितरणच्या खांबांच्या स्थलांतरासाठी सुमारे ७५ कोटी रुपयांची कामे पुढील तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

घोडबंदर रोडवरील तीव्र वाहतूक कोंडी लक्षात घेऊन

 घोडबंदर रोडवरील तीव्र वाहतूक कोंडी लक्षात घेऊन ३० मीटर रुंदीचा रस्ता ६० मीटरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे ५.५ ते ६ किलोमीटर लांबीच्या या काँक्रीट रस्त्यासाठी अंदाजे १,२०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. गायमुख ते काशीगाव दरम्यानच्या रुंदीकरणासाठी आवश्यक जमिनीचे अधिग्रहण एमएमआरडीएमार्फत करण्यात येणार असून त्यासाठी १५० ते २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहेआदिवासी जमिनींचा प्रश्न लक्षात घेऊन संबंधितांना शासकीय दराने भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच टीडीआर आणि एफएसआयच्या माध्यमातून विकासकांना पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

दहिसर -काशीगाव मार्गाचा गायमुख मार्गापर्यत विस्तार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एमएमआरडीएत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

दहिसर -काशीगाव मार्गाचा गायमुख मार्गापर्यत विस्तार करून तो गायमुख पर्यंत नेण्यात येणार असून या प्रकल्पासाठी सुमारे ८,५५३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुढील तीन ते चार महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

Featured post

Lakshvedhi