Saturday, 11 April 2026

मुंबई उपनगर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-क्र.१ चे आयोजन

 मुंबई उपनगर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व

समाधान शिबीर अभियान टप्पा-क्र.१ चे आयोजन

 

मुंबई दि. १० : मुंबई उपनगर जिल्हयातील अंधेरीबोरीवली व कुर्ला तहसील कार्यालयांतर्गत मंडळनिहाय "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" आयोजित करण्यात आले.

 

यावेळी माहिती तंत्रज्ञानसांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्रीअॅड आशिष शेलार, खासदार अनिल देसाईआमदार अस्लम शेखपराग आळवणीमंगेश कुडाळकर, संजय पोतनीसतुकाराम कातेमुंबई उपनगर जिल्हायातील नगरसेवक जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपस्थित होते. महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या पहिल्या टप्प्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

Google Pay वरील 'Pocket Money' नवीन फिचर.... गोंधळात भर pl Share

 Google Pay वरील 'Pocket Money' 

नवीन फिचर.... गोंधळात भर 

©️ डॉ. धनंजय देशपांडे (dd)

*

मागील एकदोन दिवसापासून जी पे ला लॉग इन झालात की तिथं एक नवीन आयकॉन (फॅसिलिटी) बटन  'Pocket Money'  हे  दिसत आहे. ! आणि हे काय आहे याबद्दल अनेकांनी सजगपणे फोन करून विचारलं आहे ! तर प्रत्येकाला उत्तर देण्याऐवजी या पोस्टद्वारे सर्वानाच त्याबद्दल माहिती देत आहे. 

तर 

Google Pay वरील 'Pocket Money' हा सिम्बॉल किंवा फिचर प्रामुख्याने लहान मुले किंवा घरातील अवलंबून असलेल्या व्यक्तींसाठी डिझाइन केलेले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, हे पालकांसाठी डिजिटल पद्धतीने 'पॉकेट मनी' देण्याचे एक साधन आहे.


या फिचरची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:


*पालकांचे नियंत्रण*

पालक त्यांच्या मुलांच्या Google Pay खात्यावर ठराविक रक्कम मर्यादित स्वरूपात सेट करू शकतात.


*पालकांसाठी सोयीचे*

मुलांना प्रत्यक्ष रोख रक्कम (Cash) देण्याऐवजी डिजिटल पद्धतीने पैसे देता येतात, ज्यामुळे खर्चावर लक्ष ठेवणे सोपे जाते.


*सुरक्षित व्यवहार* 

मुले पालकांनी सेट केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च करू शकत नाहीत. प्रत्येक व्यवहारानंतर पालकांना त्याचे नोटिफिकेशन मिळते.


*डिजिटल साक्षरता*

लहान मुलांना जबाबदारीने पैसे कसे खर्च करावेत, हे शिकवण्यासाठी याचा वापर होतो.


*हे तुमच्या फोनवर का दिसत आहे?*

जर तुमच्या घरातील एखाद्या लहान मुलाचे खाते तुमच्या गुगल फॅमिली ग्रुपशी जोडलेले असेल, तर तुम्हाला हे सिम्बॉल दिसू शकतो. गुगल पे सध्या काही विशिष्ट वापरकर्त्यांसाठी अशा नवीन फीचर्सचे अपडेट्स रोल-आउट करत आहे.


जर तुम्हाला याचा वापर करायचा नसेल, तर तुम्ही गुगल पे च्या 'Settings' मध्ये जाऊन तुमच्या फॅमिली किंवा पेमेंट प्रोफाईलमध्ये बदल करू शकता.

या फीचरमध्ये दोन भूमिका असतात:


*1. Primary User (पालक)*

ज्यांच्या बँक खात्यातून पैसे जातात

पूर्ण कंट्रोल त्यांच्या हातात असतो

*2. Secondary User (मुल / दुसरी व्यक्ती)*

स्वतःच्या फोनवरून पेमेंट करू शकतो

पण पैसे पालकांच्या खात्यातून जातात

*मुख्य फीचर्स*

✅ 1. Monthly Limit सेट करू शकता

पालक ₹15,000 पर्यंत मासिक खर्च मर्यादा सेट करू शकतात

✅ 2. दोन प्रकारचे कंट्रोल

Full delegation

मुलाला ठराविक लिमिटमध्ये स्वतः पेमेंट करता येतं

Approval mode

प्रत्येक पेमेंट आधी पालकांची मंजुरी लागते

✅ 3. Live Tracking

पालकांना प्रत्येक ट्रान्झॅक्शनची ताबडतोब notification मिळते

खर्च ट्रॅक करता येतो

✅ 4. Safety Control

कधीही access pause / remove करू शकतात

मुलांना स्वतंत्र बँक अकाउंटची गरज नाही

🎯 फायदा काय?

मुलांना digital payment शिकायला मदत

पालकांना पूर्ण नियंत्रण आणि सुरक्षितता

खर्चावर नियंत्रण (budget discipline)

Financial literacy वाढते

🧠 साध्या उदाहरणातून समजून घ्या:


समजा तुम्ही तुमच्या मुलाला ₹3000/month limit दिली

तो दुकानात QR scan करून पेमेंट करू शकतो

पण ₹3000 पेक्षा जास्त खर्च करू शकत नाही

तुम्हाला प्रत्येक खर्चाची माहिती येते

✔️ थोडक्यात:

*👉 Pocket Money = “Digital allowance + parental control”*

डॉ. डीडी क्लास : कोणत्याही गॅजेट / अँपवर सातत्याने असे नवनवीन अपडेट्स / फीचर्स येत राहणार. ज्यातून तुम्हाला अधिकाधिक सुविधा आम्ही देतोय असं असं ते सांगत राहणार ! जेणेकरून तुम्ही त्यांना सोडून इतर कुठल्या अँप वर जाऊ नये. 

आता हे पॉकेट मनी फिचर आले आहे ..... ते वापरायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याचे फायदे काय आहेत ते वरती सांगितले आहेत. मात्र तोटे काय आहेत ? यावर सायबर एक्स्पर्टमधे मतभेद असू शकतात. सध्या तरी त्या फीचरकडे "आर अँड डी" स्वरूपात पाहून व  तटस्थ राहून काही काळ जाऊ द्यावा, इतर मंडळी जे ते फिचर वापरत असतील, त्यांचा अनुभव नंतर समजून घ्यावा आणि तो तुम्हाला सुटेबल असेल तर ते फिचर वापरायला हरकत नाही. तूर्त इतकेच ! धन्यवाद ! 

ⓒ डॉ. धनंजय देशपांडे (dd)

- Cyber Security Expert 

- 3 Times National Award winner

- HOD : Cyber Awareness Foundation, Maharashtra State

Friday, 10 April 2026

व्यापार, पर्यटन, नागरीकरण, पर्यावरण, तटीय संपर्कयंत्रणा यासाठी क्षेत्रीय प्राधान्यक्रम" या विषयावर

 राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या  महाराष्ट्र - गोवा – गुजरात या विभाग – 7 च्या पणजी येथे आयोजित वार्षिक परिषदेमध्ये "व्यापारपर्यटननागरीकरणपर्यावरणतटीय संपर्कयंत्रणा यासाठी क्षेत्रीय प्राधान्यक्रम" या विषयावर त्या बोलत होत्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली दि.9 व 10 एप्रिल 2026 रोजी ही परिषद पणजी येथे आयोजित करण्यात आली असून त्यास राज्यसभेचे उप सभापती हरिवंश सिंहमहाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेमहाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरविधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेमहाराष्ट्रासह राज्यविधानमंडळांचे सदस्य उपस्थित आहेत. गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या परिषदेत विचार मांडले.

महिलांच्या सुयोग्य सहभागाने सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास शक्य

 महिलांच्या सुयोग्य सहभागाने सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास शक्य

– विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 

•          राष्ट्रकुल संसदीय मंडळ विभाग - 7 च्या पणजी वार्षिक परिषदेत विकसित भारत- 2047 चे उद्दीष्ट साध्य करताना विधिमंडळातील युवा सदस्यांची भूमिका आणि व्यापारपर्यटननागरिकरणपर्यावरणतटीय संपर्कयंत्रणा यासाठी क्षेत्रीय प्राधान्यक्रम या विषयांवर विचारमंथन

 

पणजीदि. 10 : व्यापारपर्यटनशहरीकरणपर्यावरण आणि सागरी संपर्क या क्षेत्रात महाराष्ट्रगुजरात आणि गोवा या तीन राज्यांचा समावेश असलेल्या विभाग – 7 साठी विकास आणि व्यापारवृध्दीच्या दृष्टीने अनेक संधी आहेत. विकासाच्या संकल्पनेत लिंगसमानता आणि महिला  सक्षमीकरण केंद्रस्थानी असणे अत्यावश्यक आहे. या पाचही क्षेत्रांमध्ये महिलांच्या सुयोग्य सहभागाने सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास शक्य होईलअसे मत महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

समाधान शिबिरात विविध विभागांचे ४० स्टॉल्स

 समाधान शिबिरात विविध विभागांचे ४० स्टॉल्स

या समाधान शिबिरात महसूल विभागासह राज्य शासनाच्या विविध विभागांचे सुमारे ४० स्टॉल्स उभारण्यात आले होते. उत्पन्न दाखलाजात दाखलाअधिवास दाखलाज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रआर्थिकदृष्ट्या मागासवर्ग प्रमाणपत्रनॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र आदी विविध दाखल्यांचे अर्ज भरून त्याच ठिकाणी वितरण करण्यात आले. शिधापत्रिकेसंदर्भातील नाव समावेशवगळणे तसेच नवीन शिधापत्रिका देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. तसेचसंजय गांधी निराधार योजनाश्रावणबाळ योजना यांसारख्या सामाजिक योजनांची माहिती देऊन लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. आधार नोंदणी व दुरुस्तीकामगारमहिला व बाल कल्याणसमाज कल्याणटपालविधी व न्यायशिक्षण विभाग तसेच विविध महामंडळांच्या योजनांबाबत यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून येथील विविध सेवांचा लाभ घेतला. एकाच दिवसात अर्ज स्वीकृतीपासून दाखले वितरणापर्यंतची प्रक्रिया त्वरेने पूर्ण केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थीमहिलादिव्यांग तसेच उपस्थित नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे अर्ज भरून त्याची तिथेच पूर्तता करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते दाखले वाटप करण्यात आले.

वन डे डिलिव्हरी’ या संकल्पनेवर भर

 जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी शिबिरामागील उद्दिष्टे स्पष्ट केली. त्यांनी वन डे डिलिव्हरी’ या संकल्पनेवर भर दिला. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना एका दिवसात सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. अर्ज स्वीकारून त्यावर तत्काळ कार्यवाही करून प्रत्यक्ष लाभ देणेहे प्रशासनाचे ध्येय असून या शिबिरातून त्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहेअसे जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांनी शासनाच्या योजना तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी कौशल्य मंत्री लोढा यांनी शिबिराला भेट देत उपक्रमाची पाहणी केली.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांमध्ये शासनाबाबत विश्वासनिर्मिती

 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून

नागरिकांमध्ये शासनाबाबत विश्वासनिर्मिती

-         कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा

·         महसूल विभागाचा अभिनव उपक्रम

 

मुंबईदि. १० : नागरिकांच्या अडचणी एकाच छताखाली सोडविणे हा राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा उद्देश आहे. हा अभिनव उपक्रम असून शासनप्रशासन आणि जनतेतील दुवा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. लोकांच्या मनात शासन व प्रशासनाबद्दल विश्वास दृढ करण्यासाठी राज्य शासन स्वतः लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या या प्रयत्नांना नक्कीच बळ मिळेलअसा विश्वास कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

Featured post

Lakshvedhi