Saturday, 11 April 2026

औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक धोरणात्मक

 कामगार मंत्री श्री. फुंडकर म्हणाले की, औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक धोरणात्मक सुधारणा केल्या आहेत. औद्योगिक संरचनेमध्ये लवचिकता आणल्यामुळे उद्योग आणि कामगार दोघांनाही फायदा झाला आहे. यामुळे उत्पादकतेत वाढ झाली आहे.

उद्योगांना चालना देतानाच कामगारांचे हित जपण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून २०१४ पासून देश व राज्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण झाले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग आणि कामगार या दोघांचेही हित जपले जात असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांना जलद सेवा मिळावी यासाठी मानवी हस्तक्षेपविरहित प्रणालीवर सरकारचा भर असून विविध सेवा ऑनलाइन केल्या जात आहेत. यामुळे तक्रारींचे त्वरित निवारण होण्यास मदत होत आहे.

नारायण मेघाजी लोखंडे व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य पुरस्कार २०२५”

 महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयामार्फत आयोजित नारायण मेघाजी लोखंडे व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य पुरस्कार २०२५ वितरण कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, संचालक (बाष्पके) श्री. ध. प्र. अंतापूरकर तसेच वरिष्ठ अधिकारी व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध उद्योग क्षेत्रांतील सुमारे १६०० कारखाना प्रतिनिधींनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली.

कामगार कायद्यातील सुधारणांमुळे कामगारांबरोबरच उद्योगांनाही फायदा

 कामगार कायद्यातील सुधारणांमुळे कामगारांबरोबरच उद्योगांनाही फायदा

-

मुंबई, दि. १२ : केंद्र शासनाने विविध कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून चार व्यापक कामगार संहितांमध्ये रूपांतर केले असून, यामुळे कामगार कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी होणार आहेत. यामुळे कामगारांचे हक्क बळकट होण्याबरोबरच उद्योगांसाठी सुसंगत व सुलभ नियामक व्यवस्था उपलब्ध होईलअसे प्रतिपादन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयामार्फत आयोजित नारायण मेघाजी लोखंडे व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य पुरस्कार २०२५ वितरण कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, संचालक (बाष्पके) श्री. ध. प्र. अंतापूरकर तसेच वरिष्ठ अधिकारी व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध उद्योग क्षेत्रांतील सुमारे १६०० कारखाना प्रतिनिधींनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली.

यावेळी राज्यातील सुरक्षा व आरोग्य विषयक उत्कृष्ट कामगिरीबद्दल धोकादायक तसेच धोकादायक नसलेल्या उद्योगांचा गौरव करण्यात आला. विविध श्रेणींमध्ये एकूण २४ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

महात्मा फुले हे दूरदृष्टीचे विचारवंत आणि थोर समाजसुधारक महात्मा

 महात्मा फुले हे दूरदृष्टीचे विचारवंत आणि थोर समाजसुधारक

महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते प्रगतशील शेतकरी, यशस्वी उद्योजक आणि दूरदृष्टीचे विचारवंत होते. शेतीत नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांना वर्षभर उत्पन्न मिळवून देणारे मॉडेल त्यांनी तयार केले. शेतकऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी लढा दिला. मुंबई महानगरपालिकेची इमारत, खडकवासला धरण, येरवडा कारागृह आणि कात्रज बोगदा यांसारख्या प्रकल्पांमध्ये त्यांची दूरदृष्टी दिसून येते, असे त्यांनी नमूद केले.

स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांनी भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा देत विधवांचे केशवपन थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून पहिली शिवजयंती साजरी करण्याचे कार्यही महात्मा फुले यांनीच केले, असे त्यांनी सांगितले. आजचा शिक्षणाचा अधिकार कायदा ही त्याच विचारांची फलश्रुती असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महात्मा फुले यांच्या नावाने कौशल्य विकासाची एक हजार केंद्रे उभारणार

 महात्मा फुले यांच्या नावाने कौशल्य विकासाची एक हजार केंद्रे उभारणार

पुणे जिल्हा परिषदेकडून इंडस्ट्री 4.0’ अंतर्गत 100 शाळांमध्ये 100 अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या नावाने कौशल्य प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली असून भविष्यात अशी एक हजार केंद्रे उभारण्यात येतील असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पैतृक गावात उभारलेली ही अत्याधुनिक शाळा म्हणजे

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पैतृक गावात उभारलेली ही अत्याधुनिक शाळा म्हणजे द्विशताब्दी वर्षाची सर्वात योग्य सुरुवात आहे. सीबीएसई पॅटर्नवरील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतची ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा असून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यास हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये जागतिक स्तरावर झेप घेण्याची क्षमता निर्माण होत असून काही विद्यार्थिनी इस्रो आणि नासासारख्या संस्थांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून या शाळेची उभारणी झाली असून त्यांनी शाळा उभारणीच्या  प्रत्येक टप्प्यावर लक्ष घातल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी फ्रेंच व जर्मनसारख्या परकीय भाषा आत्मसात केल्या आहेत, हे बदलत्या शिक्षण व्यवस्थेचे द्योतक असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले.

इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतची ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा असून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पैतृक गावात उभारलेली ही अत्याधुनिक शाळा म्हणजे द्विशताब्दी वर्षाची सर्वात योग्य सुरुवात आहे. सीबीएसई पॅटर्नवरील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतची ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा असून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यास हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये जागतिक स्तरावर झेप घेण्याची क्षमता निर्माण होत असून काही विद्यार्थिनी इस्रो आणि नासासारख्या संस्थांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi