सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त वापर करावा. विभागाच्या वतीने करण्यात येणारी कामे, रस्त्यांचा दर्जा, देयके, महामार्गावरील खड्डे आदी विविध बाबतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येणारी कामे ही दर्जेदार व्हावीत याकडे लक्ष द्यावे. तसेच विभागाच्या क्षेत्रीय स्तरावर नियमित बैठका घेऊन विविध कामांचा आढावा घेण्यात यावा, असेही मंत्री भोसले यांनी यावेळी सांगितले.