Thursday, 9 April 2026

विखरन येथील 250 मे.वॅ. सौर प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी उर्वरित क्षेत्र ‘एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार

 विखरन येथील 250 मे.वॅ. सौर प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी उर्वरित क्षेत्र

‘एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार

- उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

 

मुंबईदि. 9 : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी उर्वरित क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावास गती देण्यात द्यावीअसे निर्देश उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी दिले.

गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध

 गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध

 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         लाखो भाविकांच्या उपस्थितीत नारळी सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न

 

बीड दि. 9 : म्हसोबावाडी (ता. आष्टीजि. बीड) येथे पार पडलेल्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या ९४ व्या नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपली भूमिका मांडलीमी येथे मुख्यमंत्री म्हणून नाहीतर गहिनीनाथ महाराजांचा अनुयायी म्हणून नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. गडाच्या विकासासाठी रस्ता असो वा अन्य कोणताही प्रश्नतो सोडविण्यास मी कटिबद्ध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले

सामाजिक आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये विनस्कूलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या

 सामाजिक आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये विनस्कूलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळाविनमेकच्या माध्यमातून मल्टीस्पेशालिटी रुग्णालये तसेच व्ही ग्रीन मार्फत राज्यभर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग नेटवर्क उभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 170 एकर क्षेत्राचा वापर होणार आहे. याशिवाय 500 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारून स्वच्छ ऊर्जा निर्मितीवर भर दिला जाणार असून त्यासाठी सुमारे 1,200 एकर जमीन आवश्यक राहणार आहे.

करारानुसार मोठ्या प्रमाणावर स्मार्ट निवासी टाउनशिप उभारण्यावर भर देण्यात

 करारानुसार मोठ्या प्रमाणावर स्मार्ट निवासी टाउनशिप उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. सुमारे 2,700 एकर क्षेत्रावर जागतिक दर्जाचीपर्यावरणपूरक आणि एकात्मिक टाउनशिप विकसित केली जाणार असून सुमारे दोन लाख लोकसंख्येचा विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यातील इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव असून मोबिलिटी-एज-अ-सर्व्हिस प्लॅटफॉर्मही विकसित केला जाणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील निवडक ठिकाणी प्रकल्प

 मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील निवडक ठिकाणी प्रकल्प

या कराराअंतर्गत विन ग्रुपकडून पुढील दोन वर्षांत सुमारे 6.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक प्रस्तावित असून सुमारे 5 हजार एकर क्षेत्रावर विविध प्रकल्प उभारले जाणार आहेत. या माध्यमातून सुमारे 24 हजार 700 थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील इतर निवडक ठिकाणी हे प्रकल्प साकारले जाणार आहेत. या करारानुसार स्मार्ट निवासी टाऊनशिपइलेक्ट्रिक मोबिलीटी सोल्यूशन्ससामाजिक व सार्वजनिक पायाभूत सुविधानवीकरणीय ऊर्जापर्यटन व मनोरंज या क्षेत्रात विन ग्रुप गुंतवणूक करणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशाला पायाभूत सुविधांच्या विकासाच्या जोरावर आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीतून जागतिक स्तरावर

 एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले कीमुंबई महानगर प्रदेशाला पायाभूत सुविधांच्या विकासाच्या जोरावर आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीतून जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आर्थिक केंद्र बनवण्यास एमएमआरडीए कटिबद्ध आहे. विनग्रुप कंपनी सोबतचे हे सहकार्य आमच्या पुढील पिढीच्या शहरी विकासाच्या दृष्टीकोनाशी पूर्णपणे सुसंगत आहे. यामध्ये मुंबई 3.0 आणि एमएमआरडीए विकसित करत असलेल्या नवीन विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) क्षेत्रांचा समावेश आहे. निती आयोगाच्या अहवालानुसारमुंबई महानगर प्रदेश देशाच्या एकूण जीडीपीमध्ये 6 टक्क्यांहून अधिक योगदान देतो. अशा उपक्रमांमुळे हा वेग आणखी वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

दीर्घकालीन आर्थिक विकास, पर्यावरणाचे संरक्षण आणि लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी

 विनग्रुप कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फाम सान्ह चाऊ म्हणाले कीआम्हाला महाराष्ट्र शासन आणि एमएमआरडी व उद्योग विभागासोबत या महत्त्वाच्या प्रकल्पात सहभागी होताना आनंद आणि अभिमान वाटतो. महाराष्ट्र हा आशियातील वेगाने प्रगती करणारा आणि मोठी संधी असलेला प्रदेश आहे. आमच्या विनग्रुप कंपनीकडे एकात्मिक शहरी विकासइलेक्ट्रिक वाहतूक आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांमध्ये जागतिक अनुभव आहे. दीर्घकालीन आर्थिक विकासपर्यावरणाचे संरक्षण आणि लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आम्ही दर्जेदार आणि उत्तम सुविधा देण्यास कटिबद्ध आहोत.

Featured post

Lakshvedhi