Thursday, 2 April 2026

आरोग्य क्षेत्रात AI, डेटा आणि पारंपरिक ज्ञान यांचे एकत्रित व जबाबदारीने वापर

 या सत्रात तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, आरोग्य क्षेत्रात AI, डेटा आणि पारंपरिक ज्ञान यांचे एकत्रित व जबाबदारीने वापर केल्यास अधिक प्रभावी, अचूक आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा विकसित होऊ शकते. ज्ज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा आणि पारंपरिक वैद्यकीय ज्ञान यांच्या एकत्रित वापरावर भर दिला.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 2025 मध्ये प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार देशभरात 296 प्रदूषित नदी-पट्टे असून त्यापैकी

 भारतात 10 प्रमुख नद्या आहेत. त्यापैकी  नर्मदातापीगोदावरी व कृष्णा या महाराष्ट्रात आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 2025 मध्ये प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार देशभरात 296 प्रदूषित नदी-पट्टे असून  त्यापैकी सर्वाधिक प्रदूषित नदी-पट्टे 54 महाराष्ट्रात आहेत. यात मिठीकाळूमुळामुळा-मुठामुठाभीमापवनानागचंद्रभागापंचगंगा अशा नद्यांचे प्रदूषण-पुनरूज्जीवन याबाबत निर्णय घेता येणार आहे.  त्यानुषंगाने नदी पुनरूज्जीवनाच्या सर्व पैलूंना चालना देणारी प्रमुख संस्था-नोडल एजन्सी म्हणून तसेच सर्वोच्च निर्णय घेण्यासाठी प्राधिकरण काम करणार आहे. 

राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नदी संवर्धन-पुनरूज्जीवन करण्यासाठी नियामक आणि

             राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नदी संवर्धन-पुनरूज्जीवन करण्यासाठी नियामक आणि विकासात्मक अशी दोन्ही कामे करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरूज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

            राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेच्या धर्तीवर राज्यात स्थापन करण्यात येणाऱ्या या प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतीलतर उपाध्यक्ष पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री असतील. वित्त मंत्रीनगरविकास मंत्रीजलसंपदा मंत्रीउद्योग मंत्रीग्रामविकास व पंचायतीराज मंत्री सदस्य असतील पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे सचिव हे सदस्य-सचिव

साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी 1 हजार 234 कोटी रुपयांची तरतूद

 साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी 1 हजार 234 कोटी रुपयांची तरतूद

            अहिल्यानगर जिल्ह्यातील चिखली (ता.श्रीगोंदा) तालुक्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी 1 हजार 234 कोटी 13 लाख रुपयांच्या तरतुदीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

             साकळाई उपसा सिंचन योजना घोड धरणाच्या जलाशयावरील म्हसे या गावात उभी केली जाणार आहे. म्हसे गाव येथून चार टप्प्यांमध्ये पाणी उचलून ते श्रीगोंदा व अहिल्यानगर या दोन तालुक्यातील 32 गावांसाठी वापरता येणार आहे. यामुळे या अवर्षणग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्यासह सुमारे 9 हजार 600 हेक्टर क्षेत्रास सिंचन उपलब्ध होणार आहे. या योजनेत लाभक्षेत्रात विकेंद्रीत जलसाठे निर्माण केले जाणार आहेत. त्यामध्ये ल. पा. तलावपाझर तलावसिमेंट नाला बंधारे व गाव तलावांचा वापर केला जाणार आहे. या योजनेमुळे सिंचनासाठी 1.60 टीएमसी व पिण्यासाठी 0.20 टीएमसी असा एकूण 1.80 टीएमसी उपलब्ध होणार आहे.

Wednesday, 1 April 2026

आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञान, योग, ध्यान आणि पारंपरिक ज्ञान यांचे एकत्रीकरण आवश्यक

 हॉलिस्टिक वेलनेसचे अध्यक्ष, संस्थापक व कोच डॉ. मिकी मेहता  यांनी सांगितले की, आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञान, योग, ध्यान आणि पारंपरिक ज्ञान यांचे एकत्रीकरण आवश्यक आहे. मानवी अंतर्ज्ञान आणि जैविक प्रणालींचे महत्त्व कायम राहणार असून AI ही फक्त सहाय्यक साधन आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

एआय, डेटा आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला नवी दिशा

 एआय, डेटा आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला नवी दिशा

 

मुंबई दि.  - 'वेलनेस आणि प्रतिबंधात्मक वैद्यकशास्त्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अचूक वेलनेसद्वारे अधिक लवकर आणि स्मार्ट प्रतिबंध' या विषयावर वैद्यकीय परिषद २०२६ मध्ये परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. पल्स वैद्यकीय दोन परिषदेचे जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

या सत्रात तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, आरोग्य क्षेत्रात AI, डेटा आणि पारंपरिक ज्ञान यांचे एकत्रित व जबाबदारीने वापर केल्यास अधिक प्रभावी, अचूक आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा विकसित होऊ शकते. ज्ज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा आणि पारंपरिक वैद्यकीय ज्ञान यांच्या एकत्रित वापरावर भर दिला.

महाराष्ट्रात क्रीडा वैद्यक आणि दंतचिकित्सा यांचा समन्वय साधून एक प्रभावी व सर्वसमावेशक मॉडेल उभारण्याबाबत

 महाराष्ट्रात क्रीडा वैद्यक आणि दंतचिकित्सा यांचा समन्वय साधून एक प्रभावी व सर्वसमावेशक मॉडेल उभारण्याबाबत सत्रात चर्चा झाली. हे मॉडेल केवळ खेळाडूंसाठीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या सत्रात विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी सहभाग नोंदवून आपले अनुभव मांडले. कार्यक्रमाचे समन्वयन इंडियन अकॅडमी ऑफ स्पोर्ट्स डेंटिस्ट्रीचे संचालक डॉ. अतुल सुर्वे आणि नेशनल हेल्थ सर्विसचे वरिष्ठ सल्लागार अस्थीरोग शल्य चिकित्सक डॉ रवी बेडगे यांनी केले.

00000

Featured post

Lakshvedhi