Monday, 30 March 2026

महाआयडी (Maha ID) प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांसाठी एक विशिष्ट 'महाआयडी' तयार

 महाआयडी (Maha ID) प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांसाठी एक विशिष्ट 'महाआयडीतयार करण्यात येईल. आणि केवळ एका आयडीच्या आधारावर सर्व शासकीय योजनांचा लाभ घेता येईल. ज्यामुळे डेटा फिल्टर होऊन सेवांचा दुरुपयोग थांबण्यास मदत होईल. यासोबतच अनेक विभागांचे कामकाज हे बहुतेक प्रमाणात ई- ऑफीस झाले असून ते 'लो पेपरवरून 'नो पेपर'वर नेण्यासाठी मुख्य सचिवांनी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावाअशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

शासनाच्या अनेक वेगवेगळ्या संकेतस्थळांमुळे (Websites) नागरिकांचा होणारा

 माहिती व तंत्रज्ञान विभागाने 'एक राज्यएक पोर्टलसंकल्पना राबवावी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले कीमाहिती तंत्रज्ञान विभागाने 'एक राज्यएक पोर्टलही संकल्पना राबवावी. शासनाच्या अनेक वेगवेगळ्या संकेतस्थळांमुळे (Websites) नागरिकांचा  होणारा संभ्रम टाळण्यासाठी सर्व सेवांचे एकत्रीकरण असलेले एकच पोर्टल माहिती व तंत्रज्ञान विभा्गाने तयार करावे. सर्व शासकीय सुविधा नागरिकांना सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने प्राधान्याने काम करावे.

 

150 दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागांचा गौरव

 प्रशासकीय कामात पारदर्शकताकालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या

 त्रिसूत्रीवर सर्व विभागांनी काम करावे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

150 दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागांचा गौरव

 

मुंबईदि. 28:  राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करताना प्रशासकीय कामात पारदर्शकताकालमर्यादा आणि विश्वासार्हता या त्रिसुत्रीच्या आधारावर सर्व विभागांनी काम करावेअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

PULSE 2026मुळे आरोग्य शिक्षण, गुंतवणूक आणि नवकल्पनांना चालना;* *‘महाराष्ट्र घोषणा’द्वारे पुढील दिशा स्पष्ट – राज्यमंत्री माधुरी मिसाळ*

 PULSE 2026मुळे आरोग्य शिक्षणगुंतवणूक आणि नवकल्पनांना चालना;*

*महाराष्ट्र घोषणाद्वारे पुढील दिशा स्पष्ट – राज्यमंत्री माधुरी मिसाळ*

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्याआरोग्य शिक्षण मजबूत करणे ही केवळ सार्वजनिक आरोग्याची गरज नसून ती मोठी आर्थिक संधीही आहे.

गुंतवणुकीच्या दृष्टीने Nipro Pharmapackaging ने 200 कोटी रुपये, Pharmax ने 470 कोटी रुपये आणि Savvycare ने 50 कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली. ही गुंतवणूक राज्यातील प्रस्तावित बल्क ड्रग पार्कमध्ये Ramky Infrastructure आणि MIDC यांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात सध्या 17,000 हून अधिक वैद्यकीय शिक्षणाच्या जागा उपलब्ध असूनहे देशातील सर्वात मोठे वैद्यकीय शिक्षण नेटवर्क आहे. येथील विद्यार्थी अमेरिकायुनायटेड किंगडममध्यपूर्व आणि आग्नेय आशियामध्ये सेवा देत आहेत.

परिषदेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या Vision 2030 वर चर्चाएआय आधारित शिक्षण प्रणालीचे सादरीकरणतसेच डॉ. मफ्फजल लकडावाला यांचे रोबोटिक शस्त्रक्रिया प्रात्यक्षिक यांसारखी महत्त्वाची सत्रे पार पडली. ARTPARK, 4basecare, KhushyBaby आणि Yashraj Biotechnologies यांसारख्या स्टार्टअप्सनीही सहभाग नोंदविला.

परिषदेत शेवटी महाराष्ट्र घोषणा सादर करण्यात आलीज्यामध्ये Hinduja, Birla, CIDCO, MIDC, MMRDA यांसारख्या संस्थांचा सहभाग होता.

एकूणच, PULSE 2026 द्वारे महाराष्ट्राने आरोग्य क्षेत्रात गुंतवणूकगुणवत्ता आणि नवकल्पना यांना गती देत विकसित महाराष्ट्र 2047 च्या दिशेने ठोस पाऊल उचलले आहे.

यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगनवैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त अनिल भंडारीपर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे आदी उपस्थित होते.

00000

महाराष्ट्राला वैद्यकीय शिक्षणाचे राष्ट्रीय केंद्र

 परिषदेमुळे महाराष्ट्राला वैद्यकीय शिक्षणाचे राष्ट्रीय केंद्र बनवण्यास मदत - मंत्री हसन मुश्रीफ


वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आयोजित PULSE 2026 परिषदेमुळे महाराष्ट्राला वैद्यकीय शिक्षणाचे राष्ट्रीय केंद्र बनवण्यास, इनोव्हेशन हब विकसित करण्यास आणि हेल्थकेअर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला चालना देण्यास मोठी मदत होणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.


मंत्री मुश्रीफ म्हणाले की, सार्वजनिक, खाजगी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत तज्ञ, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि औषध कंपन्यांसोबत दर्जेदार शिक्षण टिकवण्यासाठी व्यापक चर्चा झाली.


एकूणच, PULSE 2026 च्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण, गुंतवणूक आणि आरोग्य क्षेत्रातील “हेल्थ सिटी” संकल्पनेला बळकटी मिळाल्याचा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

पर्यटन व मानसिक आरोग्य क्षेत्रातही महत्त्वाचे करार

 पर्यटन व मानसिक आरोग्य क्षेत्रातही महत्त्वाचे करार झाले. सायप्रस चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री सोबत मेडिकल टुरिझमला चालना देण्यासाठी सहकार्य करार करण्यात आले असूनग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या माध्यमातून बाल मानसिक आरोग्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

या परिषदेदरम्यान वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्तासंशोधनएआय-आधारित शिक्षणरोबोटिक शस्त्रक्रिया तसेच उद्योग-अकॅडेमिया सहकार्य यावर सखोल चर्चा झाली. विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठेआरोग्य संस्था आणि उद्योग क्षेत्रासोबत महत्त्वाचे करार करण्यात आले.

 

कर्करोग व अत्याधुनिक उपचारांसाठी '4बेस केअर'

 कर्करोग व अत्याधुनिक उपचारांसाठी '4बेस केअरसोबत कॅन्सर इंटेलिजन्स प्रकल्पतर मेड्ट्रॉनिक सोबत स्ट्रोक सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारण्यासाठी करार करण्यात आले. यामुळे राज्यातील विशेष उपचार सुविधा अधिक सक्षम होणार आहेत.

Featured post

Lakshvedhi