Sunday, 1 February 2026

पायाभूत सुविधांमधील मोठ्या गुंतवणुकीमुळे शेतमालाची जलद व सुरक्षित वाहतूक

 पायाभूत सुविधांमधील मोठ्या गुंतवणुकीमुळे शेतमालाची जलद व सुरक्षित वाहतूक शक्य होणार आहे. यामुळे निर्यात साखळी अधिक सक्षम होईल. विशेषतः फळेभाजीपालादुग्धजन्य पदार्थ व मत्स्यउत्पादनांच्या बाजारपेठेसाठी हे मोठे पाऊल ठरणार आहेअसे मंत्री रावल यांनी नमूद केले.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व डिजिटल तंत्रज्ञानाचा शेतीत वाढता वापर हा कृषी पणन व्यवस्थेतही क्रांतिकारक बदल

 कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व डिजिटल तंत्रज्ञानाचा शेतीत वाढता वापर हा कृषी पणन व्यवस्थेतही क्रांतिकारक बदल घडवणारा ठरेल. उत्पादनाचा अंदाजमागणी-पुरवठा विश्लेषणकिमतींचे पूर्वानुमान आणि लॉजिस्टिक व्यवस्थापन अधिक सक्षम झाल्याने बाजार समित्यांची कार्यक्षमता वाढेल. यामुळे शेतमालाची साठवणूकवाहतूक व विक्री अधिक नियोजनबद्ध पद्धतीने करता येईलअसे त्यांनी स्पष्ट केले.

विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणारा अर्थसंकल्प

 विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणारा अर्थसंकल्प

-         पणन मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि.1 :- देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केलेला २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प हा विकसित भारत’ या संकल्पनेला बळ देणारासर्वसमावेशक आणि देशाच्या दीर्घकालीन विकासाची स्पष्ट दिशा मांडणारा आहेअशी प्रतिक्रिया राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली. या अर्थसंकल्पातून ग्रामीण व शहरी विकासातील समतोलरोजगारनिर्मितीपायाभूत सुविधा विस्तार आणि आत्मनिर्भर भारत या चारही क्षेत्रांना एकाच वेळी गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हा अर्थसंकल्प केवळ उत्पादनवाढीपुरता मर्यादित नसून शेतमालाची विक्रीमूल्यवर्धन आणि बाजारपेठेतील संधी वाढवणारा असल्याने कृषी पणन व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या अर्थसंकल्पात कृषी व कृषीपूरक उद्योगांना प्रोत्साहन देताना शेतमाल थेट बाजारपेठेशी जोडण्यावर भर देण्यात आला आहे. एक जिल्हा- एक उत्पादन’ या संकल्पनेमुळे स्थानिक पातळीवरील शेतमालप्रक्रिया केलेली उत्पादने आणि हस्तकला वस्तूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार असून याचा थेट फायदा शेतकरी व उत्पादक समूहांना होणार आहे. यामुळे मध्यस्थांची संख्या कमी होऊन शेतकऱ्यांच्या मालाला स्पर्धात्मक दर मिळण्यास मदत होईलअसे मंत्री रावल यांनी सांगितले.

Maharashtra Is the Powerhouse of India’s Future

 Maharashtra Is the Powerhouse of India’s Future

– Chief Minister Devendra Fadnavis

•₹14.50 lakh crore worth of 19 MoUs signed on the very first day
• 15 lakh employment opportunities; major investments in IT, Data Centres and Green Energy
• Strong confidence of record-breaking investments surpassing last year

Davos, January 20 : Reinforcing Chief Minister Devendra Fadnavis’ assertion that Maharashtra is the Gateway of India for industry and investment, Memorandums of Understanding (MoUs) worth an unprecedented ₹14.50 lakh crore were signed on the very first day, leading to the creation of 15 lakh employment opportunities in the State.

Through the Department of Industries, Investment and Commerce, the Government of Maharashtra signed these MoUs with representatives from various sectors in the presence of Chief Minister Devendra Fadnavis and Industries Minister Dr. Uday Samant.

इस्रायल इनोव्हेशन अथॉरिटीचे अध्यक्ष अलोन स्टोपेल यांच्याशी विविध नाविन्यपूर्ण संशोधन क्षेत्रात भागीदारीबाबत

 फिनलंडचे परराष्ट्र व्यापार व्यवहार आणि विकास मंत्री विले त्याविओ यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेत भारत आणि फिनलंडमधील सहकार्यांबाबत चर्चा केली. मुंबई येथे मे-जून महिन्यात सर्क्युलर इकॉनॉमीसंदर्भात एक परिषद आयोजित करण्याबाबत सुद्धा यावेळी चर्चा झाली.


इस्रायल इनोव्हेशन अथॉरिटीचे अध्यक्ष अलोन स्टोपेल यांच्याशी विविध नाविन्यपूर्ण संशोधन क्षेत्रात भागीदारीबाबत सविस्तर चर्चा झाली.


हॅवलेट पॅकर्डच्या अध्यक्ष पॅट्रिका रुसो आणि वरिष्ठ उपाध्यक्ष भावना अग्रवाल यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. सुरक्षाविषयक बाबींमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आणि डिजिटायझेशन इत्यादी बाबत अधिक सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा झाली.


अँटोरा एनर्जीचे सीईओ अँड्र्यू पॉनेक यांच्याशी थर्मल एनर्जी साठवणूक सोल्यूशन्स, झिरो कार्बन इंडस्ट्रियल हीट इत्यादींबाबत चर्चा झाली. एमआयटी मीडिया लॅबच्या कार्यकारी संचालक जेसिका रोसेनवर्सेल यांचीही त्यांनी भेट घेतली.

येणाऱ्या काळात 5 नवीन ईव्ही मॉडेल्स आणणार

 ह्युंदाईचे अध्यक्ष सुंग किम यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्रात असणे हे आमच्यासाठी आनंददायी आहेअशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. राज्य सरकारने जाहीर केलेले ईव्ही धोरण अतिशय चांगले असून येणाऱ्या काळात 5 नवीन ईव्ही मॉडेल्स आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. ह्युंदाई सीएसआर क्षेत्रात सुद्धा मोठे काम करीत असून शिक्षणप्रशिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रात अधिक सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. ह्युंदाईच्या पुणे येथील प्रकल्पाच्या उद्घाटनाचे निमंत्रण सुद्धा यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले.

बर्मुडाचे पंतप्रधान बर्ट यांच्याशी संवाद

 बर्मुडाचे पंतप्रधान बर्ट यांच्याशी संवाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बर्मुडाचे पंतप्रधान डेव्हिड बर्ट यांची भेट झाली. या भेटीत उभयतांनी विविध विषयांवर चर्चा केली. सर्वसमावेशक विकासलोकाभिमूखता आणि विकास क्षेत्रातील नाविन्यपूर्णता या अनुषंगाने धोरणात्मक चर्चा झाली. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी आणि जगभरातील विविध घटकांच्या दृष्टीने स्वागतशील भूमिका घेऊन सज्ज आहे. यातून पारदर्शकविश्वासार्ह आणि दीर्घकालीन अशी व्यवस्था निर्माण होणे अपेक्षित आहे. अशा संवादातून एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील दृढ संबंध प्रस्थापित होतील.

Featured post

Lakshvedhi