Saturday, 6 December 2025

वीज वितरण प्रणालीमध्ये डिजिटल ट्वीन वापर करण्याची अतिशय नाविन्यपूर्ण संकल्पना

     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमेरिकेतील रॉकफेलर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजीव शाह यांची यावर्षी जानेवारीमध्ये यासंदर्भात चर्चा झाली. यामध्ये वीज वितरण प्रणालीमध्ये डिजिटल ट्वीन वापर करण्याची अतिशय नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे आली. ऊर्जा विभागही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे असून त्यांनी महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्राच्या दृष्टीने हा क्रांतिकारी निर्णय घेतला.

"आरएफ आणि जीईएपीपीसारख्या संस्थांच्या सहकार्यातून अत्याधुनिक एआय आधारित जागतिक दर्जाचा प्लॅटफॉर्म हा देशातील इतर वीज कंपन्यांसाठी आदर्श ठरेलवीज वितरण क्षेत्रातील कंपन्यासाठी हा एक आदर्श मानदंड असेलअसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

           रॉकफेलरचे अध्यक्ष डॉ. शाह यांच्या प्रतिसादाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. ग्राहक सेवा उन्नत करण्याकरिता आणि कालांतराने महावितरणला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता एआय-आधारित निर्णय-सहाय्यक साधने अत्यंत उपयुक्त आहेत. महावितरण कंपनीसाठी विकसित होणाऱ्या उपाययोजना वीज वितरण क्षेत्रातील दीर्घकालीनशाश्वत आणि परिणामकारक सहाय्यभूत असतीलअसा दृढ विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

      वीज वितरणमध्ये 'डिजिटल ट्वीनपद्धती विकसित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. नाविन्यपूर्ण एआय -आधारित उपक्रमातून शाश्वत पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढण्यासाठी ग्रामीण भागात मोठे बदल होतील.


ऊर्जा क्षेत्रात 'एआय' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरूवात

  

ऊर्जा क्षेत्रात 'एआयतंत्रज्ञानाच्या माध्यमातून

 पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरूवात

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • महावितरणमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय )आधारित डिजिटायझेशन
  • अमेरिकेच्या 'द रॉकफेलर फाउंडेशन', 'ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेटव ऊर्जा विभाग यांच्या सहकार्यातून उपक्रम

मुंबईदि. ४ :- राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या 'डिजिटल ट्वीनपद्धतीच्या माध्यमातून वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्यात येणार आहे. महावितरणमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहभागातून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय )आधारित डिजिटायझेशन उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे 'एआयतंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्रात पर्यावरणपूरक शाश्वत आर्थिक विकासाची सुरूवात होत असल्याचा विश्वास  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

            महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) 'द रॉकफेलर फाउंडेशन- आरएफ', 'ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट-जीईएपीपीआणि ऊर्जा विभाग यांच्या सहकार्यातून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय) आधारित डिजिटायझेशन उपक्रम राबविणार आहे. 

नोंदणी व मुद्रांक विभागात नवीन ९६५ पदनिर्मितीसह ३,९५२ पदे मंजूर

 नोंदणी व मुद्रांक विभागात नवीन ९६५ पदनिर्मितीसह ३,९५२ पदे मंजूर

-नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे

 

  • विभागाच्या सुधारित आकृतीबंधास शासनाची मंजुरी

 

पुणेदि. ४ : नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी देणारा शासन निर्णय महसूल व वन विभागाने जारी केला आहे. यामुळे विभागात नवीन ९६५ पदांच्या निर्मितीने मंजूर पदांची संख्या वाढून ३,९५२ झाली असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांनी दिली.

 

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशांची अंमलबजावणी करत मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागामध्ये ९६५ नवीन पदांची निर्मिती करून एकूण ३,९५२ पदांचा नवा आकृतीबंध ४ डिसेंबर २०२५ रोजी महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आला आहे. यात विद्यमान ३,०९४ मंजूर पदांपैकी १०७ पदे रद्द करण्यात आली आहेत.

    नवीन दुय्यम निबंधक कार्यालयांची निर्मितीदस्त संख्येत झालेली वाढ आणि वाढलेली कामकाजाची व्याप्ती लक्षात घेता अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले होते. सुधारित आकृतीबंध विभाग अधिक सक्षमकार्यक्षम आणि बळकट करण्यास उपयुकत ठरणार आहे. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाल्यामुळे शासनाकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या इष्टांकपूर्तीत सहाय्य होऊन राज्य महसूल वाढीस चालना मिळेल. तसेच नागरिकांना अधिक जलद व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या शासनाच्या उद्दिष्टपूर्तीतही या निर्णयामुळे महत्त्वाची भर पडेलअसा विश्वास नोंदणी महानिरीक्षक बिनवडे यांनी व्यक्त केला.

         नोंदणी व मुद्रांक विभाग हा राज्य शासनाला महसूल मिळवून देणाऱ्या विभागांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वपूर्ण विभाग असून आकृतीबंधातील सुधारणेची मागणी २०१६ पासून प्रलंबित होती असेही त्यांनी नमूद केले.

गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमनिमित्त खारघर येथील कार्यक्रमासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने सज्ज

 गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमनिमित्त खारघर येथील कार्यक्रमासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने सज्ज

     -जिल्हाधिकारी किशन जावळे

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ‘आरम्भता की अरदास

 

नवी मुंबईदि.4 :- हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 21 डिसेंबर 2025 रोजी खारघरनवी मुंबई येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने या कार्यक्रमास जिल्ह्यातील शीखसिकलीगरबंजारालबानामोहयालसिंधी समाजातील प्रतिनिधींनी यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात ‘आरम्भता की अरदास’ रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आली.   

            नवी मुंबई,  खारघर येथील कॉर्पोरेट पार्क येथे  21 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या शहिदी समागम शताब्दी  या कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी जावळे यांच्या हस्ते ‘आरम्भता की अरदास’ करुन करण्यात आली. यावेळी क्षेत्रिय आयोजन समितीनवी मुंबईचे अध्यक्ष अमरपाल सिंघ रंधावासुप्रीम कौन्सिलनवी मुंबई गुरुद्वाराचे अध्यक्ष जसपाल सिंग सिद्धूखारघर गुरुद्वाराचे अध्यक्ष परमजित सिंग  बल,  महाराष्ट्र राज्य सिख समन्वय समितीचे चरणदीप सिंग (हॅप्पी सिंघ)उपस्थित होते. सिंग समाजाचे अध्यक्ष लड् राम नागवाणीनिमंत्रक तथा राज्यस्तरीय समिती तथा कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पंजाब अकॅडमीचे मिंलकित सिंग बलउपजिल्हाधिकारी रायगड रविंद्र राठोडही उपस्थित होते.

                जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूरयांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 21 डिसेंबर 2025 रोजी खारघरनवी मुंबई येथे हा कार्यक्रम होत असूनया कार्यक्रमाचा आयोजनाची संधी आपल्याला मिळाली आहे. या कार्यक्रमाला शिखसिकलीगरबंजारालबानामोहयाल, *वाल्मिकी, भगत नामदेव परंपरा* आणि सिंधी समाजातील प्रतिनिधींची उपस्थिती असणार आहे. प्रशासनाच्या समन्वयाने कार्यक्रम नियोजनबद्धपणे पार पडेल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या शौर्याचा आणि श्रध्देचा गौरव करण्यात येणार आहे. या  कार्यक्रमामुळे  समाजाच्या गौरवशालीपराक्रमी आणि धर्मनिष्ठ इतिहासाला नवे बळ मिळणार असून बंधुत्वाचा पवित्र वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे जावळे यांनी सांगितले.

               यावेळी बलकित सिंग म्हणाले कीयुवा पिढीपर्यंत श्री गुरु तेग बहादूर यांचे कार्य पोहोचविण्यासाठी राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व  "हिंद-की-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त राज्यातील नांदेडनागपूरनवी मुंबई येथील खारघर येथे हा कार्यक्रम होणार आहे.  सर्वांच्या समन्वयाने कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

सौर ऊर्जा उपलब्धतेमुळे विजेच्या दरात कपात करणार,मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद

 सौर ऊर्जा उपलब्धतेमुळे विजेच्या दरात कपात करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·        मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद

 

 

छत्रपती संभाजीनगरदि.५:- देशात महाराष्ट्र सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगावॅट निर्मिती करु. त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी ३ टक्के कपात करुन ग्राहकांना स्वस्त वीज देऊ शकतो,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            'मागेल त्याला सौर कृषीपंपयोजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला आहे. महावितरणने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषीपंप स्थापित करण्याचा उच्चांक गाठला. या विक्रमाची गिनिज बुकमध्ये नोंद झाली. गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये ऑरिक सिटी मैदानावर पार पडला. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. या विश्वविक्रमाची घोषणा करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे कार्ल सॅबेले यावेळी उपस्थित होते.

Friday, 5 December 2025

नर्सिंग व आरोग्यसेवा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी आराखडा

 मंत्री मॅनफ्रेड लुखा म्हणालेदोन्ही राज्यादरम्यान नर्सिंग व आरोग्यसेवा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. कौशल्याधारित आरोग्यसेवेचा विस्तार करणेसंशोधनाला चालना देणे तसेच परदेशी रोजगार संधी उपलब्ध करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. या सहकार्यामुळे तरुणांना विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळ अधिक प्रशिक्षित व सक्षम होईल.

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी

 नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी

    -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

·        महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त करार

मुंबईदि. ०५ :- महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन-वुटेमबर्ग राज्यादरम्यान नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण संयुक्त करार करण्यात आला आहेयामुळे महाराष्ट्रातील नर्सिंग विद्यार्थ्यांनी जर्मनीत प्रशिक्षण घेऊन करिअरची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असल्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि बाडेन-वुटेमबर्ग राज्याचे मंत्री मॅनफ्रेड लुखा यांनी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमारवैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉ. अनिल भंडारीवैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवालेवैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरातयांच्यासह अर्चना बडेधीरेंद्र रामटेकेतसेच बाडेन-वुटेमबर्ग राज्य येथील सामाजिक व्यवहारआरोग्य आणि एकात्मता मंत्रालयाचे उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ तसेच वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्याया करारानुसार भाषा प्रशिक्षणप्रगत कौशल्य विकासप्रमाणपत्र मान्यतेची प्रक्रिया सुलभ करणेतसेच जर्मनीत नोकरी स्वीकारणाऱ्या नर्सेसच्या सन्मान व संरक्षणासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. उच्च दर्जाच्या आरोग्यसेवेच्या दृष्टीने प्रशिक्षित नर्सिंग मनुष्यबळाची निर्मिती हा या कराराचा केंद्रबिंदू असणार आहे. दोन्ही राज्यांतील नर्सिंग शिक्षण संस्थाविद्यापीठे व प्रशिक्षण केंद्रांदरम्यान विद्यार्थीप्राध्यापक आदानप्रदानसंयुक्त प्रशिक्षणअभ्यासदौरे आणि संशोधन उपक्रम राबवून शिक्षणाची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा उद्देश आहे.

Featured post

Lakshvedhi